या निवेदनात असे कळविले आहे की, महाराष्ट्राच्या मातीत वर्षानुवर्षे अत्यंत सलोख्याने राहणारे विविध जाती धर्माचे लोक आपआपसातील ऋणानुबंध टिकवून आहेत, गुण्यागोविंदाने एकमेकांचा आदर करुन रहात आहेत. परंतू अलीकडच्या कालावधीत काही राजाश्रय प्राप्त संघटनांकडून हिंदु-मुस्लिम एकोपा बिघडवून त्यांच्यात वाद निर्माण करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.
प्रेम ही प्रत्येकाची वैयक्तिक खाजगी बाब आहे. १८ वर्षे वय पूर्ण केलेल्या व्यक्तीने कुणावर करावे हा त्याचा / तिचा वैयक्तिक अधिकार आहे. यात कधी मुलगी हिंदु व मुलगा मुस्लिम राहु शकतो. तर कधी मुलगी मुस्लिम व मुलगा हिंदु असू शकतो. अशा प्रकरणांना धामिक रंग देऊन एकाच धर्माच्या लोकांवर दोष मढण्याचे षडयंत्र सुरु आहे. विशेषतः प्रेमप्रकरणात मुलगा मुस्लिम असेल तर अस्तित्वात नसलेल्या 'लव जिहाद' वगैरे काल्पनिक नाव देऊन संपूर्ण मुस्लिम समाजाला उघड उघड शिव्याशाप, दुषणे देण्याचे काम सुरु आहे. समाजातील तरुणांची माथी भडकावून त्यांना संपूर्ण मुस्लिम समाजा विरोधात भूमिका घेण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुस्लिमां विरुध्द हिंसाचार करणे, त्यांच्या धार्मिकस्थळांचे नुकसान करणे, त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे अशी कृत्ये केली जात आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना भुषणावह नक्कीच नाहीत. सामाजिक सलोखा, सामाजिक सौहार्द टिकणे आणि त्यात वाढ होणे हाच त्यावरील उपाय आहे. वैयक्तिक प्रेमप्रकरणाचे राजकारण करुन विष पेरणाऱ्या लोकांना प्रतिबंध करावा हे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
घटना घडलेल्या ठिकाणी दोन्हीकडील लोकांना विश्वासात घेऊन, गुन्हेगारांवर योग्य कार्यवाही करुन सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्याकामी प्रयत्न व्हावेत. दोषी व्यक्तींवर योग्य ती कारवाई होत असतानाच ज्यांचा काही संबंध नाही अशा संपूर्ण अल्पसंख्य समाजाला वेठीस धरण्याचे हेतुपुरस्सर होणारे प्रयत्न हाणून पाडण्यात यावेत या संदर्भात शासनाकडून प्रयत्न व्हावेत असे मा. तहसिलदार साहेबांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
निवेदनावर सर्वश्री नजीरभाई शेख, हाजी रफिक पोपटिया, जैनुद्दीन जहागिरदार, तन्वीर गुलाम हुसेन, अन्वरभाई फिटर, वासुदेव सैंदाणे, चाँदखान पठाण, बुऱ्हान जमादार, खलीलभाई मोमीन, समीर शेख, फहिमखान, डॉ. जब्बार पटेल, डॉ. इशान शेख, अश्पाकभाई आदिंच्या सह्या आहेत.
Post a Comment