बेलापुर (प्रतिनिधी )-येथील सामाजिक कार्यकर्ते, बिनधास न्यूजचे कार्यकारी संपादक देविदास देसाई यांचा सपत्नीक सन्मान राज्याचे महसुल , पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्या सत्काराचे निमित्तही तसेच होते सामाजिक कार्य करताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते परंतु बेलापुरात सतत सामाजिक कार्यात तसेच पत्रकारीता क्षेत्रात आघाडीवर राहुनही देविदास देसाई यांनी आपल्या कुटुंबाकडेही तितकेच लक्ष दिले त्यामुळेच त्यांची दोन्ही मुले एमपीएससी परिक्षेच्या माध्यमातून आज शासकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहे त्यांचा मोठा मुलगा अनिरुद्ध देसाई हा बिड येथे सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहे तर दुसरा मुलगा अभिषेक देसाई हा जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात कार्यरत आहे तिनही मुलांना उच्चशिक्षित करुन दोन मुले एमपीएससी परिक्षेच्या माध्यमातून आज शासकीय सेवेत आहेत त्यामुळेच दोन शासकीय अधिकाऱ्याचे माता- पिता होण्याचा बहुमान मिळविणाऱ्या या अवलीयांचा सन्मान राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालेला आहे देविदास देसाई यांनी जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामही बऱ्याच वर्ष केलेले होते जिल्ह्यात अंनिसची चळवळ सुरु करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता त्यांनी अनेक बुवाबाजी करणाऱ्या बुवांचा भांडाफोड केलेला होता. अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम पहात आहे सीमा सुरक्षा दल BSF बाँर्डर सिक्युरीटी फोर्स मध्येही त्यांनी पाच वर्ष देशसेवा केलेली आहे . तसेच बेलापुर व परिसरातील घडणाऱ्या सर्व घटनां वृत्तपत्र तसेच घडामोडी गृपवर तातडीने पाठविण्याचे काम ते जागृक पत्रकार म्हणून ते सतत करत असतात.बेलापुर गावातही ते सामाजिक कार्यात नेहमी अघाडीवर असतात. गावात सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे म्हणून त्यांची ओळख आहे .बेलापुर गावाला १२६ कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजुर झाली त्या योजनेच्या उद़्घाटन कार्यक्रमात संयोजकांनी देसाई दांम्पत्यांचा सन्मान घडवून आणला .चांगल्या उपक्रमात चांगल्या व्यक्तीचा सन्मान चांगल्या व्यक्ती नामदार विखे पाटील यांच्या शुभहस्ते केल्याबद्दल संयोजकांनाही बिनधास न्युजच्या वतीने धन्यवाद.
Post a Comment