बेलापुरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
बेलापूर प्रतिनिधी-पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तरली आहे असे ठणकावून सांगणारे, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे, बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती बेलापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समता स्पोर्ट क्लब, आर एस ग्रुप, ग्रामपंचायत व बेलापुर सेवा संस्था यांच्या वतीने येथील विजयस्तंभ चौकामध्ये सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी जयंती कृती समिती व आर एस ग्रुपच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी सर्व समाज बांधवांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, जि प सदस्य शरद नवले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, भारतीय जनता पार्टीचे नेते सुनील मुथा, बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, जनता विकास आघाडीचे अध्यक्ष रवींद्र खटोड, माजी सरपंच भरत साळुंके, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, पत्रकार ज्ञानेश गवले, विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, सुहास शेलार, पो कॉ संपत बडे, पो कॉ भारत तमनर, ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक, मुस्तक शेख, मेजर सुजीत शेलार, प्रकाश कुऱ्हे, भास्कर बंगाळ, संजय शेलार, बंटी शेलार, रमेश शेलार, विजय शेलार, तानाजी शेलार, बाबासाहेब शेलार, अक्षय शेलार, रोहित शेलार, डॅनियल शेलार, बाळासाहेब शेलार, निलेश शेलार, राहूल शेलार, अशोक अंबिलवादे, भाऊसाहेब राक्षे, बाबुलाल पठाण,अल्ताफ शेख, संकेत शेलार यांचे सह अनेक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता स्पोर्ट क्लब व आर एस ग्रुपच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने सर्व वेगवेगळ्या पक्षाची नेतेमंडळी तसेच सर्व कार्यकर्ते गट तट सोडून एकाच व्यासपिठावर आले होते अशाच प्रकारे सर्व जण एकत्र येवुन सण उत्सव साजरे करुन गावाचा सन्मान वाढवावा अशी अपेक्षा अनेक जेष्ठांनी व्यक्त केली आहे
Post a Comment