राज्यातील सर्व दुकानदारांच्या मागण्या एकच,अधिवेशन संपल्यानंतर राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार-. राज्याचे पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ
श्रीरामपुर (प्रतिनिधी )-राज्यातील सर्व दुकानदारांच्या मागण्या एकच असुन अधिवेशन संपल्यानंतर राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेवुन दुकानदारांच्या उचित मागण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे अश्वासन राज्याचे पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळास दिले राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्या संदर्भात अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे पुरवठा मंत्री नामदार छागन भुजबळ यांना निवेदन देण्यात आले संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की दुकानदारांना दिली जाणारे कमिशन हे तुटपुंजे असुन कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी दुकानदारांनी मोफत वितरीत केलेल्या धान्याचे कमिशन दर महा दुकानदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे प्रति क्विंटल एक किलो प्रमाणे घट मंजुर करण्यात यावी धान्याप्रमाणेच साखरेलाही १५० रुपये मार्जिन देण्यात यावी तसेच मागील साखरेच्या मार्जिनचा फरकही देण्यात यावा कोरोना काळात वितरीत केलेल्या कँरी फाँरवर्ड धान्याचे मार्जिन त्वरीत मिळावे माहे नोव्हेंबर डिसेंबर २०२२ महीन्यात धान्याचे पैसे भरले परंतु ते धान्य जानेवारी महीन्यात प्राप्त झाले असुन त्याचे वितरण मोफत करण्यात आले त्यामुळे चलनाने भरलेलै पैसे त्वरीत मिळावे पाँज मशिन जुन्या झाल्यामुळे बिल करताना वारवार अडथळे येतात त्यामुळे हाय स्पिडचे नविन पाँज मशिन देण्यात यावे दुकानदारांना धान्य मोजुनच दिले जावे सहकारी संस्थांच्या सेल्समन यांनाही वाटप केलेल्या कमिशनचा लाभ मिळावा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या या वेळी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई जिल्हा सचिव रज्जाक पठाण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरगे अनिल मानधने दिलीप गायके संगमने तालुध्यक्ष काशिनाथ आरगडे नानासाहेब चौधरी नितीन गोरे सुखदेव खताळ सुर्यभान दिघे अशोक कानवडे आदिचा शिष्टमंडळात समावेश होता
Post a Comment