Latest Post

श्रीरामपूर: दिनांक २२ व २३ जुलै २०२३ रोजी सोमैय्या विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कुल,कोपरगाव येथे स्वातंत्र्यसंग्रामाचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत जवळजवळ ४३ शाळांच्या ८६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. 
      त्यात श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम अकॅडमी शाळेच्या इयत्ता १० वीची विद्यार्थीनी ऋत्वि शरद पाटील व इयत्ता ८ वीचा विद्यार्थी नमिश परेश अग्रवाल या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. सहभागी विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्या जयश्री पोटघन व विषय शिक्षिका प्रियांका सबनीस यांचे मोलाचे मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे,पालकांचे व मार्गदर्शक शिक्षिकेचे संस्थेचे अध्यक्ष राम टेकावडे, सचिव जन्मेजय टेकावडे,गव्हर्निंग काऊन्सिल सर्व सदस्य, ऍडव्हायझरी कमिटीचे सर्व सदस्य व शिक्षकवृंदानी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

👉 राज्यभरातून ८६ स्पर्धकांचा सहभाग! कोपरगाव(गौरव डेंगळे)२३/७:

सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये "पद्मभूषण श्री करमसीभाई सोमैया" राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे तिसऱ्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथे दिनांक २२ व २३ जुलै २०२३ रोजी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये निपून वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे त्यांच्यातील श्रवण क्षमतेचा विकास व्हावा,त्यांना आपले विचार मुद्देसूदपणे मांडण्याची कला अवगत व्हावी,त्यांच्यातील भाषण कौशल्य विकसित व्हावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील ४३ शाळेतील ८६ उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आपले वकृत्व सादर करून स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.सदर स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासंगी व्यक्तिमत्व असलेले प्राध्यापक संतोष पद्माकर पवार,रावबहादुर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर यांची उपस्थिती लाभली. बक्षीस वितरण समारंभासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व गोदावरी बायोरिफाइनरीज लिमिटेड साकरवाडीचे संचालक सुहास गोडगे यांनी उपस्थिती दर्शवून सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र सांगळे ही या स्पर्धेसाठी उपस्थित होते.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य के.एल.वाकचौरे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले होते.श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे कुमारी ईश्वरी आव्हाड व प्रथमेश पाटील या विद्यार्थ्यांसोबतच सर्व यशस्वी स्पर्धकांचे शालेय व्यवस्थापन व सर्व कर्मचारी वृंद यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.


👉 स्पर्धेचा अंतिम निकाल!

👉 *प्रथम क्रमांक* 

श्री.शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव ₹ ७,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *द्वितीय क्रमांक*

प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज लोणी ₹ ५,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *तृतीय क्रमांक* 

श्रीराम अकॅडमी,श्रीरामपूर

₹ ३,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

👉 *उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक*

मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल,अकोले ₹ १०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक*

ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल अहमदनगर ₹ १०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक*

 श्री साईबाबा कन्या विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज शिर्डी.

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ चतुर्थ पारितोषिक*

बागलाण एज्युकेशन सोसायटी चे इंग्लिश मीडियम स्कूल सटाणा.

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ पाचवे पारितोषिक*

श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन चे सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल नगर ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

श्रीरामपुर प्रतिनिधी-संविधान बचाव समिती तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यान करीता श्री. ॳॅड, असीम सरोदे साहेब व जेष्ठ विधीतज्ञ मा. ना. सुप्रीम कोर्ट तसेच आर्किटेक्ट श्री, अर्शद  शेख थोर विचारवंत अहमदनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम हे

प्रियदर्शिनी इंदिरा गांधीं मंगल कार्यालय श्रीरामपूर   येथे दिनांक २४/०७/२०२३ सोमवार रोजी दुपारी २-०० वाजता आयोजित करण्यात आले आहे

तरी शहरातील सर्व नागरिकांनी व तमाम समाज बांधवांनी विद्यार्थी तसेच पालक वर्गांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती संविधान बचाव समितीच्या वतीने करण्यात आली आहे 

कोपरगाव: २३/७ (प्रतिनिधी)के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव येथील खेळाडू श्री.अक्षय मधुकर आव्हाड यास सन २०२१-२२ साठी बेसबॉल खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्‍याबद्दल महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सवोच्‍च पुरस्कार ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड झाल्याबद्दल कोपरगावच्या श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचा वतीने शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे,राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री राजेंद्र कोहकडे, शाळेचे क्रीडा संचालक श्री धनंजय देवकर,शाळेचे जनसंपर्क अधिकारी श्री दत्ता सांगळे,क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे आदींच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना अक्षयने सांगितले की,बेसबॉल हा एक लोकप्रिय खेळ आहे ज्याचा इतिहास मोठा आहे.या खेळाचा उगम १९व्या शतकाच्या मध्यात युनायटेड स्टेट्समध्ये झाला,जरी त्याचे नेमके मूळ अस्पष्ट आहे.गेल्या काही वर्षांमध्ये, व्यावसायिक संघ,लीग आणि खेळाडूंनी व्यापक प्रसिद्धी आणि ओळख मिळवून,बेसबॉल हा एक प्रिय मनोरंजन आणि एक प्रमुख खेळ बनला आहे.भारतामध्ये देखील हा खेळ लोकप्रिय होत असून जास्तीत जास्त खेळाडूंनी या मनोरंजक खेळाकडे वळावे. पुढे बोलताना अक्षय म्हणाला की ग्रामीण भागातून मी या बेसबॉल खेळाची सुरुवात केली आणि ६ वेळा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या राज्याला पहिल्या तीन संघांमध्ये स्थान पटकावून दिले.तरी भविष्यात ग्रामीण भागातून जास्तीत जास्त खेळाडूंनी बेसबॉल खेळावे व राज्याचं,देशाचं प्रतिनिधित्व करावे असे तो म्हणाला.माझा सत्कार केल्याबद्दल मी सोमय्या विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो असे तो म्हणाला.

बेलापुर (प्रतिनिधी )-आपल्याला भविष्यात काय व्हायचे हे  निश्चित करुन ते मिळविण्यासाठी कठोर परिश्रम व जिद्द चिकाटी या बळावर  येथील अभिषेक दिलीप दुधाळ याने   युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवुन तालुक्यातील पहीला आयएएस होण्याचा बहुमान मिळवीला आहे .                  नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससीच्या निकालात २७८ क्रमांकाने अभिषेक दुधाळने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवीला होता                                  अभिषेक दिलीप दुधाळ याने यापूर्वी वयाच्या २३ व्या वर्षी युपीएससी परिक्षा उत्तीर्ण  झाला होता त्या वेळी त्याला ६३७ रँंक मिळाली होती त्याला इंडीयन रेल्वे ट्रँफीक सर्व्हीस आयआरटीएस गृप ए हे पद मिळाले होते  या ठिकाणी सेवेत हजर होवुन पुन्हा परीक्षा देण्याचा त्याने निर्णय घेतला अन  दररोज सात तास नियमित अभ्यास सुरु ठेवला .म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर त्याप्रमाणे त्याने २०२० मध्ये दिलेल्या युपीएससी परिक्षेत देशात ४६९ वा रँंक मिळवीला  इंडीयन पोलीस सर्व्हीस हे पद मिळवुन हैद्राबाद येथे प्रशिक्षण सुरु झाले यावरही समाधान मानेल तो अभिषेक कसला त्याने पुन्हा नियमित अभ्सास सुरुच ठेवला अन पुन्हा  परिक्षा दिली.कारण त्याला जिल्हाधिकारी हे मानाचे पद मिळवायचे होते  नुकताच युपीएससी परिक्षेचा निकाल जाहीर झाला असुन त्यात त्याला २७८ रँक मिळाले आता त्यांची आयएएस म्हणून निवड झाली आहे  सलग तिन वेळा परिक्षा देवुन तिनही वेळेस वरची रँक मिळवुन जिल्हाधिकारी होणारे अभिषेक दुधाळ यांचे प्राथमिक शिक्षण बेलापुर तसेच जेटीएस हायस्कूल बेलापुर  येथे झाले  त्यापुढील शिक्षण मुंबई येथील वीर जिजामाता अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत पुर्ण केले  माहीती व तंत्रज्ञान विभागात पदवी प्राप्त केली आयटी क्षेत्रातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून प्रशासकीय सेवेत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला याकरीता वडील दिलीप व आई संगीता दुधाळ यांची तसेच गुरुजन वर्ग तसेच मित्रांची मोलाची साथ मिळाली  दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जेएनयू एमए अर्थशास्र विभागासाठी प्रवेश घेतला त्याकरीता खाजगी शिकवणी लावली नंतर स्वंय अध्यापन करण्याचा निर्णय घेतला व कठोर अशी मेहनत घेवुन सलग तिसऱ्यांदा युपीएससी परीक्षेत यश मिळवुन तालुक्यातील पहीले आयएएस हे पद भूषविणारे अभिषेक दुधाळ हे पहीलेच होत  याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

बेलापूर- (प्रतिनिधी  )-मा. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून बेलापूर ग्रामपंचायती अंतर्गत बेलापूर व ऐनतपूर महसुली गावांसाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनेंतर्गत प्रत्येकी ५९ लाख रुपये असा एकूण सुमारे १ कोटी १८ लाख रुपये खर्चाचा घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यामुळे प्रवरा नदी शुध्द होण्यास मदत होणार असल्याची माहिती गावकरी मंडळाचे नेते शरद नवले , सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंंडागळे यांनी दिली आहे. 

या बाबत बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने माहीती देताना नवले साळवी व खंडागळे यांनी सांगितले की बेलापूर येथे बाजारतळ, स्मशानभूमी, केशव गोविंद मंदिर व महादेव मंदिर परिसरातून वाहणार्‍या छोट्या ओढ्यांमधून सांडपाणी व इतर मलमुत्र प्रवरा नदीत जाते. त्यामुळे प्रवरा नदी अशुध्द व दूषित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नद्या शुध्दीकरण महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. त्यात बेलापूरची प्रवरा नदी स्वच्छ करण्यासाठी १ कोटी १८ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यामध्ये ऐनतपूरसाठी सुमारे ५९ लाख रुपये, तर बेलापूरसाठी ५९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येकी नऊ कंपोस्ट टँक, टायगर बायोफिल्टर प्लॅन्ट उभारला जाणार आहे. यामधून नदीला जाणारे अशुध्द पाणी शुध्द केले जाणार असून या पाण्याचा वापर शेती किंवा झाडांसाठी करता येणार आहे. 

दरम्यान दोन्हीही प्लान्टसाठी जागा निश्‍चित करण्याचे काम अद्याप सुरु आहे. ग्रामपंचायतीने ऐनतपूर प्लान्टसाठी स्मशानभूमिजवळ, तर बेलापूरच्या प्लान्टसाठी बाजारतळाजवळ जागा सुचविली आहे.  ऐनतपूरसाठी मंजूर झालेला प्लॅन्ट सप्टेंबर अखेर तर बेलापूरचा ऑक्टोबर अखेर पूर्ण करावयाचा आहे. 

बेलापूरच्या चार भागातून नदीपात्रात सांडपाणी जाते. या दोन्ही प्रकल्पांतर्गत स्मशानभूमी व बाजारतळ परिसरातून नदी पात्रात सोडले जाणारे पाणी अडवून शुध्द केले जाणार आहे. मात्र केशव गोविंद व महादेव मंदिराच्या भागातून जाणारे पाणी दुसर्‍या टप्प्यात एकत्रित करुन शुध्द करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या दोन प्रकल्पांतर्गत किमान ६० टक्के पाणी शुध्द होणार असल्याचे माजी जि प सदस्य शरद नवले  सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले

श्रीरामपूर प्रतिनिधी:मोहर्रम सण उत्सव मोठ्या गुण्यागोविंदाने तथा शांततेने साजरा व्हावा या करीता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये काल दि.१८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ वा. येथील नुतन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे आणि पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहर्रम उत्सव कमेटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे व पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सर्व शान ए करबला मोहर्रम कमिटीचे पदाधिकारी सदस्य यांना मोहर्रम सण साजरा करताना घ्यावयाची काळजी व शहरात जातिय सलोखा कसा अबाधित राहील याकरीता घ्यावयाचा पुढाकार याबरोबरच शहरात भाईचारा आणी शांतता टिकून रहावी याकरीता घ्यावयाची खबरदारी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी शहर व परिसरातील शान ए करबला मोहर्रम कमिटीचे पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.या वेळी प्रथमता श्रीरामपुरच्या परंपरे प्रमाणे आपल्या विभागाचे नुकतेच पदभार स्वीकारलेले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांना शान ए करबला कमिटी श्रीरामपूर यांच्या वतीने पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागतपर सत्कार करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


या नंतर यंदा होणाऱ्या १९ जुलै ते २९ जुलै मोहरम नियोजन संदर्भात शान ए करबला कमिटी चे अध्यक्ष आसलम बिनसाद यांनी माहिती दिली,यावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले,शहरात धार्मिक,सांस्कृतिक उत्सव अशी कार्यक्रमे ही झालीच पाहिजे ज्यामुळे सामाजात एकोपा निर्माण होतो, मात्र अशी कार्यक्रम करताना जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्थाही जपली पाहिजे असे ते म्हणाले.श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी म्हणाले की, मोहर्रम उत्सव कमेटीद्वारे होणाऱ्या कार्यक्रमांची  सर्वानी पोलिसांना आधीच सूचना द्यावी, दरवर्षी प्रमाणे परवानगी दिली जाईल, कोणीही पुर्व परवानगी न घेता कामे करू नये, जेणेकरून आपल्या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही अशा सूचनाही त्यांनी दिल्या.यावेळी शान ए करबला कमिटीचे अध्यक्ष आसलम बिनसाद, पदाधिकारी रहेमानअली शाह (बादशहा बाबा),तमन्ना सुरय्या नायक, अजीज अहेमद शेख (भैय्याभाई) सर्व कमिटी सदस्य तसेच शहर हद्दीतील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांचे पो.नि.हर्षवर्धन गवळी यांनी शेवटी आभार मानले.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget