अक्षय आव्हाडचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नगरी सत्कार.

कोपरगाव: २३/७ (प्रतिनिधी)के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव येथील खेळाडू श्री.अक्षय मधुकर आव्हाड यास सन २०२१-२२ साठी बेसबॉल खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्‍याबद्दल महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सवोच्‍च पुरस्कार ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड झाल्याबद्दल कोपरगावच्या श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचा वतीने शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे,राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री राजेंद्र कोहकडे, शाळेचे क्रीडा संचालक श्री धनंजय देवकर,शाळेचे जनसंपर्क अधिकारी श्री दत्ता सांगळे,क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे आदींच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना अक्षयने सांगितले की,बेसबॉल हा एक लोकप्रिय खेळ आहे ज्याचा इतिहास मोठा आहे.या खेळाचा उगम १९व्या शतकाच्या मध्यात युनायटेड स्टेट्समध्ये झाला,जरी त्याचे नेमके मूळ अस्पष्ट आहे.गेल्या काही वर्षांमध्ये, व्यावसायिक संघ,लीग आणि खेळाडूंनी व्यापक प्रसिद्धी आणि ओळख मिळवून,बेसबॉल हा एक प्रिय मनोरंजन आणि एक प्रमुख खेळ बनला आहे.भारतामध्ये देखील हा खेळ लोकप्रिय होत असून जास्तीत जास्त खेळाडूंनी या मनोरंजक खेळाकडे वळावे. पुढे बोलताना अक्षय म्हणाला की ग्रामीण भागातून मी या बेसबॉल खेळाची सुरुवात केली आणि ६ वेळा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या राज्याला पहिल्या तीन संघांमध्ये स्थान पटकावून दिले.तरी भविष्यात ग्रामीण भागातून जास्तीत जास्त खेळाडूंनी बेसबॉल खेळावे व राज्याचं,देशाचं प्रतिनिधित्व करावे असे तो म्हणाला.माझा सत्कार केल्याबद्दल मी सोमय्या विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो असे तो म्हणाला.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget