Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथे उर्दू माध्यमातून इयत्ता पहीली ते बारावी पर्यंत शिक्षण दिले जात असुन उर्दू माध्यमाची अंगणवाडी सुरु करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने शिक्षण विभागाकडे करण्यात आलेली आहे                    या बाबत मुस्लिम समाजाच्या वतीने माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की बेलापुर गावात पाच दे सात हजार मुस्लिम बांधव रहात असुन येथे मुलांना उर्दू माध्यमातून शिक्षण घेता यावे या करीता इयत्ता पहीली ते बारावी पर्यंतचे वर्ग आहे मात्र मराठी माध्यमातून अंगणवाडीत शिक्षण घेतलेल्या मुलांना इयत्ता पहीलीचे उर्दू माध्यमाचे शिक्षण अतिशय अवघड वाटते त्यामुळे मुलांना अंगणवाडीतुनच उर्दू माध्यमाचे शिक्षण मिळाल्यास त्यांची अधिक प्रगती होईल त्या करीता बेलापुर येथे जागा देखील उपलब्ध आहे तसेच मुलांना शिकविण्यासाठी उर्दू माध्यमाची शिक्षीका देखील आहे तरी शासनाने आमच्या योग्य मागणीची योग्य ती दखल घेवुन तातडीने अंगणवाडी सुरु करण्यास परवानगी द्यावी आशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर सर्वश्री आसीफ शेख ,शफिक आत्तार ,मोहसीन सय्यद ,अजिज शेख उर्फभैय्या   ,जब्बार आतार , शफीकं बागवान ,हाजी ईस्मईल शेख ,समिर जहागीरदार सर्फराज सय्यद मुश्ताक आतार ,जावेद पिंजारी ,फिरोज कुरेशी ,रियाज तांबोळी ,इरफान पठाण ,अकिल पटेल जब्बार वाघवाले ,बाबा सय्यद आदिंच्या सह्या आहेत.

हरेगाव : दि. ८ जुलै २०२३ रोजी संत तेरेजा गर्ल्स हायस्कूल येथे वृक्षदिंडी वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला.

वनविभाग हरित सेना यांच्या सहकार्याने विद्यालयात गेल्या 23 वर्षापासून हा उपक्रम राबविला जातो, संत तेरेजा मुलींच्या विद्यालयाची यासाठी वनविभागाकडून निवड करण्यात आली आहे वनविभागाचे वनरक्षक श्री  के निर्वाण, श्री जाधव व श्री आहेर व श्री कानडे याप्रसंगी उपस्थित होते.जागतिक तापमान वाढ, पावसाचे घटत असलेले प्रमाण, वाढते प्रदूषण या समस्यांसाठी "झाडे लावणे" अत्यंत महत्त्वाचे असून वसुंधरा स्वच्छ, सुंदर व सुरक्षित ठेवण्यासाठी मानवाची भूमिका व जबाबदारी अत्यंत  महत्त्वाची आहे. "झाडे लावा व निसर्गाचा समतोल" सांभाळा असा संदेश श्री जाधव साहेब यांनी याप्रसंगी मुलींना दिला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सिस्टर ज्योती सर्व शिक्षक व विद्यार्थिनी यांनी रोपे हाती घेऊन घोष फलकासह ग्रामस्थांना वृक्ष लागवडीसाठी  प्रेरणा दिली. अतिशय उत्साहात घोषणा देत वृक्ष दिंडी काढून जनजागृती केली. "पर्यावरण सांभाळा झाडे लावा" असा संदेश दिला. याप्रसंगी पालकांना रोपे वाटप करण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते मुलींना सुमारे पाचशे रोपांचे वितरण करण्यात आले. हरित सेनेचे ववनाधिकारी, माननीय मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती व विद्यार्थिनी यांच्या शुभहस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पारंपारिक वेशभूषेत मुलींनी दिंडीत सहभागी होत आपले वृक्ष प्रेम घोषणा देत व्यक्त केले व आपल्याला मिळालेले रोप वाढविण्याची जबाबदारी घेतली. या वृक्षदिंडीचे व वृक्षारोपण समारंभाचे प्रास्तविक श्री सुहास ब्राह्मणे यांनी केले, व विद्यालयाच्या वतीने माननीय वनाधिकाऱ्यांचा सत्कार श्री आदिनाथ आघाव यांनी केला. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला झाला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -  एखाद्या खाजगी शाळेत असणाऱ्या सर्व सुविधा नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुलहमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये निर्माण करण्यात आल्या आहेत.शाळेचा शैक्षणिक दर्जा उत्तम आहे. या शाळेच्या कार्याचे इतर शाळांनी अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः जिल्ह्यातील सर्व उर्दू शाळांनी शाळा क्रमांक पाचचा आदर्श घेऊन काम करावे.

शाळेचे पालक म्हणून या शाळेच्या प्रगतीचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन संविधान बचाव समितीचे अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे नेते अहमदभाई जहागीरदार यांनी केले.

पालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक पाचचा ३७ वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून श्री जहागीरदार बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रमजान पठाण,सामाजिक कार्यकर्ते साजिद मिर्झा, जलीलभाई काझी, हाजी युसूफभाई, विजय शेलार,आयाज तांबोळी, सरवरअली सय्यद मास्टर,सलाउद्दीन शेख, पंचायत समितीचे साधन व्यक्ती शाहीन शेख, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख, उपाध्यक्ष अजीम शेख, शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन,शिक्षक सचिन शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य शबाना राजमोहम्मद शेख, नगरसेवक कलीमभाई कुरेशी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते साजिद मिर्झा यांनी शाळा क्रमांक पाच ने उत्तम प्रगती केली असून या शाळेमध्ये सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत.ही नगरपालिका विभागातील जिल्ह्यातील एक प्रमुख आदर्श शाळा आहे. शाळेचे सर्व शिक्षक हे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत.मुलांसाठी सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.शैक्षणिक दर्जा देखील उत्तम आहे.हीच कामगिरी पुढील काळातही कायम राहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सेवा दलाचे मास्टर सरवरअली सय्यद यांनी माझ्या कुटुंबातील सर्व मुले या शाळेत शिकली आहेत.येथील शिक्षक अतिशय कष्टाळू आहेत याचा मला अभिमान वाटतो.पालकांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन येथे केले जाते तसेच मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते त्याबद्दल शाळेच्या सर्व शिक्षक वर्गाला धन्यवाद दिले.

काँग्रेस नेते विजय शेलार यांनी आपल्या भाषणातून नगरपालिकेची जिल्ह्यातील एक नावाजलेली शाळा म्हणून या शाळेचा सर्व श्रीरामपूरकरांना अभिमान आहे. समाजातील गोरगरीब मुलांचे जीवन घडविण्याचे कार्य खऱ्या अर्थाने या शाळेत सुरू आहे असे सांगून शाळेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन यांनी नगर जिल्ह्यातील नगरपालिका विभागातील सर्वात मोठी शाळा आणि सर्व सोयी सुविधा असणारी शाळा म्हणून शाळा क्रमांक पाचचा जिल्हाभरामध्ये उल्लेख केला जातो. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे कार्य मोलाचे आहे असे सांगून प्रशासन अधिकारी राजेश डामसे यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी १ जुलै १९८७ साली शाळा अस्तित्वात आल्यानंतर आजपर्यंत सव्वाचार हजार विद्यार्थी या शाळेत शिकून गेले आहेत.शाळेमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा असून प्रत्येक वर्गात आता डिजिटल पॅनल बोर्ड खासदार निधीतून उपलब्ध झाले आहेत.शाळेची सुसज्ज अशी संगणक प्रयोगशाळा,विज्ञान प्रयोगशाळा,खेळाचे भरपूर साहित्य या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडविण्याचे कार्य आमचा शिक्षक वर्ग करीत आहे. या कार्याला पालकांची देखील चांगली साथ मिळते.पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे साहेब यांचे विशेष सहकार्य आम्हाला मिळत असते.या शाळेचे विद्यार्थी आज समाजामध्ये उत्तम प्रकारे आपले सेवा कार्य करीत आहेत याबद्दल समाधान व्यक्त केले.

हाजी युसुफ शेख यांनी देखील याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांचा तसेच शाळेच्या सर्व शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीतर्फे वर्धापन दिनानिमित्त यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास पालक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेचे इमारतीवर तसेच प्रत्येक वर्गात आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शिक्षिका वहिदा सय्यद,नसरीन इनामदार,शाहीन शेख, अल्ताफ शाह,अस्मा पटेल,निलोफर शेख, बशिरा पठाण,मिनाज शेख,एजाज चौधरी, रिजवाना कुरेशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ शहा यांनी केले तर आभार एजाज चौधरी यांनी मानले.

                    *चौकट*

उर्दू शाळा क्रमांक पाच चे विद्यमान मुख्याध्यापक सलीमखान पठाण हे या महिना अखेर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या काळामध्ये शाळेची मोठी भरभराट झाली.भविष्य काळात त्यांच्या नंतरही शाळेच्या प्रगतीची ही वाटचाल अशीच सुरू राहावी अशी अपेक्षा सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली.

दरवर्षी शाळेचा वर्धापन दिन अनोख्या पद्धतीने साजरी करणारी जिल्ह्यातील उर्दू शाळा क्रमांक पाच ही एकमेव शाळा आहे.यानिमित्ताने शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो.याबद्दल पालकांनी शाळेच्या शिक्षक वर्गाचे विशेष अभिनंदन केले.

बेलापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपुर शहर व  तालुक्यासह १४ तालुके व अहमदनगर शहर असे एकुण १६४ नविन स्वस्त धान्य दुकानाचे जाहीरनामे काढण्यात आले असुन दुकान घेणाऱ्यांनी दिनांक ३१ जुलैपर्यत संबधीत तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत अर्ज करावा असे अवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी केले आहे                                 अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यात नविन स्वस्त धान्य दुकाने मंजुर करण्यात येणार असुन ग्रामिण भागात १४७ तसेच अहमदनगर शहरात १७ नविन स्वस्त धान्य दुकान सुरु करण्यात येणार आहे श्रीरामपुर तालुक्यातील वांगी , रामपुर तसेच कडीत बु!! या गावाकरीता नविन स्वस्त धान्य दुकान मंजुर करण्यात येणार आहे तसेच श्रीरामपुर शहरात रद्द झालेले एस के गुप्ता ,एस एस डोळस ,सर्व्हंट को आँप सोसायटी ,प्रगत प्राथमिक  ,अहमदनगर जिल्हा सेवक युनियन ,मातापुर बिग बागायतदार सोसायटी असे सहा व ग्रामिण भागातील तीनअसे एकुण ९ नविन स्वस्त धान्य दुकान मंजुर करण्यात येणार आहे नविन स्वस्त धान्य दुकान घेवु इच्छिणाऱ्या महीला बचत गट पुरुष बचत गट विविध संस्था व्यक्ती यांनी संबधीत तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेशी संपर्क साधावा या बाबतची सविस्तर माहीती अहमदनगरच्या अधिकृत संकेत स्थळावरही( wwwahmednagar.nic.in) उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे

बेलापुर (प्रतिनिधी  )-येथील प्रतिथयश व्यापारी राजकुमार बाठीया यांनी गावातील दोन मंदिराच्या बांधकामासाठी "५२ हजार रुपयांचे देणगी दिली आहे                            येथील प्रतिथयश व्यापारी राजकुमार मिलनकुमार बाठीया यांनी बाजारवेस हनुमान मंदिर जिर्णोद्धार कामासाठी रुपये २१ हजार तसेच बेलापुरचे ग्रामदैवत भगवान श्री हरिहर केशव गोविंद मदिरांच्या कामासाठी रुपये ३१ हजार असे एकुण ५२ हजार रुपयांची देणगी राजेश खटोड यांच्याकडे सुपूर्त केली या वेळी सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड ,विजया कटारीया ,बाळासाहेब दायमा , पत्रकार दिलीप दायमा, राहुल दायमा उपस्थित होते

बेलापुर (प्रतिनिधी )-महीनाभर पांडूरंग श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालणाऱ्या वारकऱ्यासाठी जनसेवा पतसंस्थेने परतीच्या प्रवासासाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे वारकऱ्यांना परतीचा प्रवासही सुखकर झाला आहे .                                              येथील जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक सुवालाल लुक्कड नेहमीच पतसंस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.गावातील स्मशानभूमी असो वा दशक्रियाविधीचा घाट असो किंवा गावातील मंदिरे असो या सर्व कामात सुवालाल लुक्कड हे जनसेवा पतसंस्थेच्या माध्यमातून कार्य करत असतात जेष्ठ नागरीकांच्या सहलीचेही ते आयोजन करत असतात वारकरी महीनाभर चालत पायी वारी करत असतात .विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर वारकरी परतीच्या प्रवासाला निघतात.त्यामुळे त्यांचे होणारे हाल लक्षात घेवुन जनसेवा पतसंस्थेने या वर्षी वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासाची मोफत व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या सत्कार्यास सर्व संचालक मंडळाने होकार दिला ,अन पंढरपुरहुन परत फिरणाऱ्या वारकऱ्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली मोफत प्रवासा बरोबरच प्रवासाच पतसंस्थेच्या वतीने जेवणही  देण्यात आले या कामी प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड पवन चौधरी गणेश अग्रवाल  नंदकुमार गोरे रविंद्र कोळपकर आदिंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले जनसेवा पतसंस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक सुवालाल लुक्कड चेअरमन प्रविण लुक्कड व्हा चेअरमन प्रकाश कोठारी संचालक अमीत लुक्कड दिपक वैष्णव विक्रम हरकुट योगेश कोठारी सुनिल शेजुळ सौ नंदा खंडागळे सौ सुवर्णा मुंडलीक मनोज कांबळे  सुरेश बाठीया व बँकेचे व्यवस्थापक राहुल दायमा आदिंचे वारकऱ्यांनी आभार मानले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उन्मती फाउंडेशनच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ शिक्षक हेमंत सोलंकी यांना शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उन्मती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सोहेल शेख,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव जन्मजय टेकावडे,शाहानवाज शेख,पत्रकार नितीन चित्ते,प्राचार्य डॉ योगेश पुंड यांच्या उपस्थितीत सोलंकी यांना शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्रीरामपूर तालुक्यातील नामवंत शाळांमध्ये ३० वर्षे  शिक्षक म्हणून सेवा केली.जिथे गेले तिथे समरस झाले.नवनवीन उपक्रम राबविले.सध्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सुपरवायझर पदावर कार्यरत आहेत. श्रीरामपूरचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये श्री सोलंकी यांचं खूप मोठे योगदान आहे.त्यांचे अनेक विद्यार्थी डॉक्टर,इंजिनिअर,पोलिस, शासकीय अधिकारी,शिक्षक व इतर ठिकाणी देश व सामाजिक सेवेत अग्रेसर आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget