श्रीरामपूर तालुक्यातील नामवंत शाळांमध्ये ३० वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली.जिथे गेले तिथे समरस झाले.नवनवीन उपक्रम राबविले.सध्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सुपरवायझर पदावर कार्यरत आहेत. श्रीरामपूरचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये श्री सोलंकी यांचं खूप मोठे योगदान आहे.त्यांचे अनेक विद्यार्थी डॉक्टर,इंजिनिअर,पोलिस, शासकीय अधिकारी,शिक्षक व इतर ठिकाणी देश व सामाजिक सेवेत अग्रेसर आहेत.
हेमंत सोलंकी यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान.
श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उन्मती फाउंडेशनच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ शिक्षक हेमंत सोलंकी यांना शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उन्मती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सोहेल शेख,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव जन्मजय टेकावडे,शाहानवाज शेख,पत्रकार नितीन चित्ते,प्राचार्य डॉ योगेश पुंड यांच्या उपस्थितीत सोलंकी यांना शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Post a Comment