Latest Post


बेलापुरा (प्रतिनिधी  )-कुरणपुर तालुका श्रीरामपुर येथील प्रवरा नदीपात्रातील अनेक शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल एका रात्रीत चोरीला गेल्या असुन दिड महीन्यापूर्वीही अशाच प्रकारे केबल व मोटारी चोरीस गेलेल्या होत्या या बाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लोणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे                                              कुरणपुर येथील शेतकऱ्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी प्रवरा नदी पात्रात वीज मोटारी टाकून शेतीला पाण्याची व्यवस्था केली होती. परवा रात्रीच्या वेळेस अनेक शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल चोरीस गेलेल्या आहे. यात दत्तात्रय लक्ष्मण महानोर यांची साधारण तीनशे फुट काँपर केबल अंदाजे किंमत ९००० रुपये लक्ष्मण  रामजी चिंधे यांची साधारण ९००० हजार रुपये किमतीची तीनशे फुट काँपर केबल पंकज ज्ञानदेव हळनोर यांची रुपये ९००० किमतीची साधारण तीनशे फुट काँपर केबल नामदेव सहादु थोरात यांची रुपये ७००० किमतीची वीज मोटारीची काँपर केबल विठ्ठल सोपान व्यवहारे यांची तीनशे फुट काँपर केबल राजेंद्र सुखदेव हळनोर यांची तीनशे फुट काँपर केबल आण्णासाहेब सोन्याबपु जाटे यांची तीनशे फुट केबल विठ्ठल भागवत देठे यांची तीनशे फुट केबल दत्तात्रय भानुदास राऊत यांची तीनशे फुट केबल जयवंत नारायण देठे यांची तीनशे फुट केबल सतीश चंद्रभान हळनोर यांची वीज मोटारीवरील केबल आबासाहेब आण्णासाहेब पारखे यांची वीज मोटारीवरील तीनशे फुट केबल अशा एकुण बारा शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल अंदाजीत किंमत एक लाख रुपये किमतीच्या चोरीस गेल्या असुन एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल व तीन शेतकऱ्यांच्या विज मोटारी चोरीस गेलेल्या होत्या त्या चोरीचा तपास लागला नाही केबल चोरीसा गेलेल्या शेतकऱ्यांनी नविन केबल खरेदी करुन शेती वीज पंप सुरु केले होते पुन्हा तसाच प्रकार घडला असुन या बाबत सर्व शेतकऱ्यांनी लोणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असुन या चोरांचा तातडीने छडा लावावा व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे


श्रीरामपूर-शितल ही सकाळी 11/00 वा.चे सुमारास  लोणी PMT दवाखान्यामध्ये जात असुन सायंकाळी 04/00 ते 05/00 वा.चे सुमारास घरी येईल असे सांगुन मुलगा अशिष वय 05 वर्षे यास घेवुन गेली आहे. तरी ती संध्याकाळ पर्यत घरी आली नाही
 तीचे वर्णन पुढील प्रमाणे
नाव शितल फ्रान्सीस श्री सुंदर वय 23 वर्षे रा. गोंधवणी वार्ड न 01 श्रीरामपुर उंची 5 फुट 5 इंच, रंग -सावळा,बांधा- सडपातळ, चेहरा- गोल, केस काळे लांब, नेसणीस - गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात चप्पल तसेच मुलगा नामे आशिष वय 5 वर्षे उंची 3 फुट, रंग- गोरा, बांधा मजबुत पायात चप्पल, नेसणीस जीन्स पॅन्ट व रंगीत शर्ट
तरी दि05/06/2023 रोजी सकाळी 11/00 वा.चे सुमारास माझी पत्नी शितल फ्रान्सीस श्रीसुंदर व मुलगा आशीष फ्रान्सीस श्रीसुंदर हे लोणी PMT दवाखान्यामध्ये जात आहे असे शेजारी राहणारे ताई हीस सांगुन निघुन गेली आहे तीचा शोध लागल्यास विनंती.
संपर्क करा
अंमलदार
श्रीरामपूर शहर पो.स्टे. 02422-222666
पती फ्रान्सीस राँबेल श्रीसुंदर  - 84598 99182


बेलापुर  (प्रतिनिधी  )-गैरसमज झाल्यामुळे आज माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस  प्रवेश करण्याचे निश्चित झालेले बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी पुन्हा घुमजाव करत गावकरी मंडळात प्रवेश केला असुन महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा .यांनी आपला गैरसमज दुर केला असुन आता आपण गावाकरी मंडळाबरोबरच कायम स्वरुपी राहणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच महेंद्र साळवी यांनी दिली आहे .                      आपल्याला दबावाखाली काम करावे लागत असल्याचे कारण सांगून सरपंच महेंद्र साळवी यांनी काँग्रेस पक्षात जाहीरपणे प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता .त्या निर्णयाचे काँग्रेस गोटातुन जोरदार स्वागत केले . त्या वेळी फटाक्याची मोठी अतिषबाजीही करण्यात आली होती काहींनी पेढेही वाटले होते परंतु त्यांचा आनंद दिर्घकाळ टिकला नाही तिसऱ्याच दिवशी सरपंच महेंद्र साळवी यांनी पत्रकारासमक्ष गावकरी मंडळात पुन्हा प्रवेश करत असल्याचे जाहीर केले भरत साळूंके व सुधीर नवले यांनी आपला बुद्धीभेद केला. तुमच्यावर अविश्वास आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. असे भासविले त्यामुळे गैरसमजातुन आपण काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु खरी वस्तूस्थिती समजल्यावर झालेली चुक लक्षात आली त्यामुळे लगेच ती चुक सुधारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच महेंद्र साळवी यांनी सांगितले या वेळी जि प सदस्य शरद नवले यांनी सरपंच महेंद्र साळवी यांचेशी महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचेशी बोलणे करुन दिले .गावाचा विकास करण्यासाठी आपल्याला सर्वाना बरोबर घेवुन जायचे आहे .बेलापुरच्या विकासासाठी मी आपल्या बरोबर आहे असे नामदार विखे यांनी सांगताच सरपंच महेंद्र साळवी यांनी आपला निर्णय  बदलला व गावाच्या विकासासाठी मी गावकरी मंडळाबरोबरच असल्याचे जाहीर केले    त्यामुळे तीन दिवसापासुन गावात चाललेल्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे .या वेळी बोलताना गावकरी मंडळाचे नेते शरद नवले म्हणाले की काहींनी सरपंच महेंद्र साळवी यांना चुकीची माहीती देवुन आपल्या जाळ्यात ओढले परंतु खरी वस्तुस्थिती लक्षात आल्यावर सरपंच स्वगृही परतले सरपंचाना आपल्या पार्टीत घेण्याचे असुरी स्वप्न पहाणारांची आता झोपच उडाली आहे  त्यांनी फोडलेले फटाके फुसकेच निघाले गावाच्या विकासाचे काय होईल अशी दोन दिवस गावात चर्चा सुरु होती पण भगवान श्री हरिहर केशव गोविंदिंना देखील ते मान्य नव्हते महसुल मंत्री  नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरपंच  साळवी यांचा गैरसमज दुर केला त्यामुळे ते गावकरी मंडळातही आले तसेच सरपंच  पदाचा राजीनामाही दिला आहे.राजकारणात लोकांनी नाकारलेल्यांनी खेळलेला कुटील डाव फसला असल्याचेही नवले म्हणाले         *माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सरपंच महेंद्र साळवी यांचा काँग्रेस प्रवेश करण्याचे निश्चित झाले होते आमदार बाळासाहेब थोरात त्या करीता ग्रामपंचायत कार्यालयातही आले परंतु कार्यालयात सरपंच नव्हते ते नाँट रिचेबलश आल्यामुळे  तो कार्यक्रम स्थगीत झाला*


श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मुस्लिम बांधवांचा मोठा सण असलेली बकरी ईद व हिंदू धर्मीय बांधवांची आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करीत आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद मधील महत्त्वपूर्ण असलेला कुर्बानीचा विधी त्या दिवशी न करण्याचा निर्णय श्रीरामपूर येथील मुस्लिम समाजाने घेतला आहे.या निर्णयाचे सर्वत्र व्यापक प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे.

येथील जामा मशिदीच्या हॉलमध्ये शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व त्यांचे सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम समाजातील धार्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली जमा मशिदीचे प्रमुख धर्मगुरू मौलाना अल्हाज मोहम्मद ईमदाद अली,माजी उपनगराध्यक्ष हाजी मुजफ्फर शेख, नगरसेवक मुख्तार शाह, अदमदभाई जहागिरदार, मुन्ना पठाण,साजिद मिर्झा आदींसह विविध मशिदींचे मौलाना तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीसाठी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मुस्लिम समाजाचे प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी संघटनेचे नेते अहमदभाई जहागीरदार यांनी आपल्या मनोगतातून श्रीरामपूर शहर हे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी सुप्रसिद्ध आहे. दोन्ही समाजाचे संबंध खूप चांगले आहेत. श्रीरामपूरच्या शांततेला गालबोट लावण्याचे अनेक प्रयत्न आत्तापर्यंत झाले. मात्र दोन्ही समाजातील समंजस कार्यकर्त्यांमुळे इथली शांतता टिकून आहे.भविष्यात देखील हेच वातावरण कायम राहण्यासाठी एकमेकांच्या भावनांचा आदर राखून वागण्याची गरज आहे असे सांगून आषाढी एकादशीचे असलेले महत्त्व लक्षात घेता श्रीरामपूरच्या मुस्लिम समाजाने त्या दिवशी ईद उल अज्हा निमित्त होणारे कुर्बानीचे विधि न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपस्थित सर्व समाज बांधवांच्या वतीने जाहीर केले. या निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत केले.

पोलीस निरीक्षक गवळी यांनी श्रीरामपूरच्या मुस्लिम समाजाने नेहमी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे असे सांगून शासनाच्या निर्देशाप्रमाणे ईद आणि आषाढी एकादशी एकत्र येत असल्याने कुठेही शांतता भंग होऊ नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. आपण घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून श्रीरामपूरची एकात्मता राज्यामध्ये प्रसिद्ध आहे.ती अबाधित ठेवण्याचे कार्य आपण सर्वांनी मिळून करू या असे आवाहन केले.

याप्रसंगी जामा मशिदीचे मौलाना मोहम्मद ईमदाद अली यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि आमच्या पैगंबरांनी शांतता, बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला आहे.श्रीरामपूरात सर्व हिंदू ,मुस्लिम, शीख, इसाई एकोप्याने राहतात. हीच श्रीरामपूरची ओळख आहे. ती ओळख कायम ठेवण्याचे काम आपण सर्वांना करावयाचे आहे.मुस्लिम समाजाने नेहमी शांततेचा पुरस्कार केला आहे. यावेळी सुद्धा ईद आणि आषाढी शांततेत साजरी होईल अशी मला आशा आहे.

याप्रसंगी अलहाज मौलाना इमदाद अली,हाफिज जोहर अली,अहमदभाई जहागीरदार, हाजी मुजफ्फर  शेख, रईस जहागीरदार साजीद मिर्ज़ा, मुख्तार शाह, मुन्ना पठान,नज़ीरभाई मुलानी, हाजी एजाज़ बारूदवाला,फिरोज खान,सलीम जहागीरदार, तौफिक शेख,अकील कुरेशी,

इलाहीबक्श कुरेशी, जोएफ जमादार,आरिफ बागवान,वजीरभाई शाह,अहमद शाह,

आमीन शाह,रशीद कुरेशी,अबुल मन्यार , रज़ा शकूर शेख,हाजी जलालुद्दीन पीरजादे, हाजी इब्राहीम कुरेशी,

अकबर खान,गफ्फार पोपटिया,रियाज़ पठान, रज्जाक पठान, इफ्तिखार शेख, सरवर अली मास्टर,नदीम तंबोली,जावेद तंबोली, कलीम कुरेशी,मोहम्मद तनवीर रजा,मौलाना नुरुल हसन,काझी हसन रजा, मौलाना कैसर,मौलाना अब्दुल लतीफ, मौलाना तौकीर रजा, सलीम रिज्वी,

याकूब शाह, हाजी अब्दूल रहेमान, इम्तियाज हसन खान, अजीम शेख आदिसह शहरातील सर्व मशिदींचे मौलाना मशीदींचे विश्वस्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी हाजी साजिद मिर्झा यांनी आभार मानले.


बेलापुर (प्रतिनिधी  )-सत्तेच्या लालसेपोटी या गटातुन त्या गटात कोलांट उड्या मारणाऱ्या  तसेच एका मागासवर्गीय सरपंचाला कारभार पाहु न देणाऱ्या बिनपदाच्या पदाधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून मी काँग्रेस व जनता विकासअघाडीत जाहीर प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया सरपच महेंद्र साळवी यांनी दिली आहे             या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सरपंच महेंद्र साळवी यांनी पुढे म्हटले आहे की पाच वर्षाच्या कार्यकाळात ठेकेदारी मलाच मिळाली पाहीजे या भावनेतुन काम करणाऱ्या जि प सदस्यांनी सर्व सदस्यांना बाजुला ठेवुन केवळ पैसे मिळवीणे हाच उद्देश समोर ठेवुन दादागीरी व दहशत सुरु केली जि प सदस्य मलाच मिळावे या करीता सारा खटाटोप चालला असुन काय चालले हे पक्ष श्रेष्ठीसह एकाही सदस्याला माहीत नाही याच सदस्याने २००७ला मुरकुटे व जनता अघाडी अशी युती करुन सरपंच झाले  सन२००८ ला अशोक सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक निमित्त पुढे करुन राजीनामा न देता ससाणे गटाबरोबर युती केली व एकट्यानेच प्रवेश करुन पुन्हा वीस महीने सत्ता बळकावीली व आशोक गवते यांना सरपंचपदापासुन दुर ठेवले याचा आपणास विसर पडला का ?  तसेच २०१० मध्ये कै ससाणे साहेबांचा विश्वासघात करुन ग्रामपंचायतला स्वतंत्र पँनल करुन पराभव झाला. परत २०१२ ला जि प निवडणूकीत पुन्हा मुरकुटे बरोबर युती करुन जी प सदस्यपद मिळवीले त्यानतर २०१४ ला सभापतीपदही मिळवीले २०१७ ला महाविकास अघाडीकडून मुरकुटे व राम शिंदे यांच्या गटाकडून निवडून आले अन त्याच वेळी आमदार राम शिंदे व मुरकुटे यांना टाळून विखेंशी हातमिळवणी केली अन या वेळेस गावकरी मंडळाच्या नेत्यांचाही विश्वासघात केला तसेच मिस्टर शेलार व कै जबाजी अमोलीक यांचाही विश्वासघात कुणी केला हे आठवा  अशा कोलांटउड्या मारणारांनी दुसऱ्याला तत्वज्ञान पाजाळू नये मला सत्तेची लालसा नव्हती म्हणून मीच तीन बैठका घेतल्या त्या वेळी सदस्यांचा कल उपसरपंच पदाच्या बदलाकडे  असल्याचे जाणवले त्यावरुन उपसरपंच खंडागळे याना मी त्यांच्या विरोधात काम करतो असे वाटले १५ १५ महीने असा कार्यकाल ठरला आसताना माझे काम यांच्या सांगण्यानुसार होत होते तो पर्यत यांना माझी कुठलीही आडचण झाली नाही श्रेष्ठींनीही माझा राजीनामा मगीतला नाही पण मी माझ्या कार्यकर्त्याला दोन कामे दिली तर यांच्या पोटात गोळा उठु लागला अन तेथुनच खरी सुरुवात झाली .काही ठिकाणी मी सह्या करण्याचे नाकारलै त्यामुळे तर त्यांचा माथा आणखीनच भडकला आडीच वर्ष तुमच्या मनाप्रमाणे वागलो ते चालले अन आता लगेच अविश्वास ठराव सरपंच बदलाचे वारे का वाहु लागले हे गावालाही समजले पाहीजे अजुन बरेच काही आहे वेळ आली तर  तुम्हाला सर्वासमोर उघडे करण्याचे काम मी  करेल मला संपविण्यासाठी यांनी विरोधकांशी हात मिळवणी केली तर चालते यांनी पुढील जी प व प स निवडणुकीत नवले व खंडागळे यांना सोडून गावकरी मंडळाच्या सदस्यांना उमेदवारी देवुन दाखवावी मी लगेच राजीनामा देतो मला सत्तेची लालसा नव्हती व नाही .श्रेष्ठींनी सांगावे मी कुठे चुकलो  उपसरपंच खंडागळे यांनाही सर्व पदेही मलाच पाहीजे नवले व खंडागळे यांनाच सर्व पदे हवीत श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीत सुधीर नवले सभापती झाले ते ही काहींच्या पचनी पडले नाही त्यांना सह्याचे अधीकार मिळू नये यासाठी जीवाचा आटापीटा कोणी केला हे ही तालुक्याला माहीत आहे गावाला पद मिळाले या पेक्षा सुधीर नवलेंना मिळाले यांचे दुःख झाले होते  माझी भावजयी निरक्षर आहे तसेच अमोलीक ताई नोकरी करते त्यामुळे त्यांना नामधारी पदे देवुन आपली पोळी भाजण्याचे षडयंत्र फिसकटले म्हणून यांचा तिळपापड झाला असल्याचेही सरपंच साळवी यांनी शेवटी म्हटले आहे


बेलापुर  (प्रतिनिधी  )-गेल्या काही दिवसापासून साई मंदिर बेलापुर येथे बिबट्याचे वास्तव्य असुन अनेकांना त्याचे दर्शन झालेले आहे .त्यामुळे अनुचित घटना घडण्याआगोदर वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी बेलापुर ग्रामस्थांनी केली आहे .                                 रात्रीच्या वेळेस हा बिबट्या साई मंदिराकडून रस्ता ओलांडून नाईक पाटील यांच्या शेताकडे जाताना अनेकांनी पाहीला आहे हा रस्ता सतत रहदारीचा असुन पहाटे व सायंकाळी अनेक नागरीक फिरण्यासाठी जात असतात ज्यांना बिबट्याचे दर्शन झाले त्यांनी तातडीने उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना कळवीले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी तातडीने या बाबत वन परिक्षेत्र अधीकारी कोपरगाव यांना कळविले त्यांनी लेखी अर्ज करणे बाबत सांगितले  यापूर्वी मगणी करताच पिंजरा लावला जात असताना आता अर्ज देण्याचा नियम केव्हापासून झाला यांची विचारणा खंडागळे यांनी उपवन संरक्षक अधीकारी सुवर्णा माने यांच्याशीही चर्चा केली त्यांनी देखील अर्ज द्या शहापुर येथे घडलेल्या घटनेपासुन आम्ही अर्ज घेतल्याशिवाय पिंजरा लावत नाही असे सांगून अर्ज करा लगेच पिंजरा लावला जाईल असेही श्रीमती माने यांनी सांगितले आता पिंजरा केव्हा लागतो याची बेलापुरकरांना प्रतिक्षा आहे मात्र पिंजरा लावाण्याआगोदर काही घटना घडली बिबट्याने कुणावर हल्ला केला तर जबाबदार कोण राहील असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत


बेलापुर  (प्रतिनिधी  )-मुस्लिम धर्मियांचा बकरीईद सण व हिंदु धर्मियांची आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असुन मुस्लिम बांधवांनी हिंदु बांधवांच्या भावनांचा सन्मान करत बकरीईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. बेलापुर येथे नुकतीच शांतता कमीटीची बैठक संपन्न झाली. त्यात सर्व मुस्लीम बांधवांनी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले असुन त्यांच्या निर्णयाचे हिंदु बांधवांनी तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे .                            बेलापुर  येथे नुकतीच शांतता कमीटीची बैठक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मुस्लीम बांधवाचा सण बकरीईद तसेच हिंदू बांधवांचा पवित्र आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असुन त्या दिवशी काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता कमीटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने काही सुचना करण्याच्या आगोदरच मुस्लीम बांधवांनी जाहीरपणे सांगितले की आम्ही सर्व जण कायमच एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत आहोत. आषाढी एकादशी हा हिंदु बांधवांचा मोठा व पवित्र सण आहे. या दिवशी सर्व हिंदु बांधव पुजाअर्चा करुन उपवास करतात. याच दिवशी मुस्लीम बांधवांचा कुर्बानी देण्याचा सण बकरीईद येत आहे. त्यामुळे हिंदु बांधवांच्या भावनांचा आदर करुन  दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णय आम्ही सर्व मुस्लीम बांधवांनी सर्वानुमते घेतला असल्याचे हाजी ईस्माईल शेख, मोहसीन सय्यद, बाबुलाल शेख, अयाजअली सय्यद, जाकीर शेख ,अजीज शेख यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांनी हा ऐतिहासीक निर्णय घेतला असुन या निर्णयांचे हिंदु बांधवाच्या तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. बेलापुर गावाने नेहमीच समाजापुढे आदर्श ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. सर्वात प्रथम विना पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडण्याचा यशस्वी निर्णय घेतला. त्यानंतर गाव सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याचा धाडसी निर्णय गावाने घेतला होता. गावाने दिपावली निमित्त आपली खरेदी आपल्या गावातच हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला  तसेच राम मंदिराचे कोषाध्यक्ष बेलापूर गावचे वैभव आचार्य गोविंददेवगीरीजी महाराज यांच्याकडे राम मंदिर उभारणीसाठी ७५ हजार रुपये  देण्याचा देशातील पहीला मान बेलापुरच्या मुस्लीम बांधवांनी मिळवीला तसेच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे मुस्लीम बांधवांनी जागोजागी स्वागत केले आता आषाढी एकादशी व द्वादशी या दोन दिवस कुर्बानी न देण्याचा धाडसी निर्णय बेलापुरच्या मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.  राज्यात नव्हे देशात असा निर्णय घेणारे बेलापुर हे पहीले गाव ठरले आहे. या वेळी जि प सदस्य शरद नवले ,उपसरपंच अभिषेक खंडागळे ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक ,मोहसीन सय्यद, प्रफुल्ल डावरे, हाजी ईस्माईल शेख, पास्टर अलिशा जोगदंड, एकनाथ नागले, देविदास देसाई, शिवसेनेचे अशोक पवार, विष्णूपंत डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले समाजापुढे आदर्श ठेवण्याचे काम नेहमीच या गावाने केले असुन सण उत्सव शांततेत पार पाडा या करीता घेण्यात आलेल्या शांतता समीतीच्या बैठकीत मुस्लीम बांधवांनी एक वेगळाच आदर्श घालुन दिला असल्याचे मत पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी व्यक्त केले या वेळी बेलापुरात नुकत्याच झालेल्या राजकीय भूकंपावरुन शरद नवले अरुण पा नाईक अभिषेक खंडागळे यांनी भाषणात केलेल्या शेरेबाजीमुळे उपस्थितामध्ये हशा पिकला ग्रामपंचायत सदर रविंद्र खटोड, अशोक गवते, मुस्ताक शेख,रमेश आमोलीक ,मिस्टर शेलार ,जिना शेख दादा कुताळ, जाफरभाई आतार, जब्बार आतार, गोपी दाणी रफीक शेख, प्रदीप शेलार, अकीला पटेल, ईस्माईल आतार, सागर ढवळे ,किशोर महापुरे, फतेमोहंमद ईनामदार, हाफीज शेख, कासम शेख सहाय्यक फौजदार सुधीर हापसे ,हवालदार सोमनाथ गाडेकर ,हवालदार शफीक शेख पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ,नंदकिशोर लोखंडे आदिसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास देसाई यांनी केले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे यांनी आभार मानले.                  *आमच्या शेजारीच हिंदु बांधव राहतात आषाढी एकादशीला ते धार्मिक विधी पुजाअर्चा करुन उपवास करतात.त्याच दिवशी बकरीईद आली असुन त्यांच्या धर्माचा धार्मिक भावनांचा आदर करुन त्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे* शफीक आतार                         *या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असुन येथील मंदिर व मस्जिदची एकच भिंत आहे. मुस्लीम बांधवांनी आषाढी एकदशीच्या दिवशीच येणाऱ्या बकरीईदला कुर्बानी न देण्याचा धाडसी निर्णय घेतला असुन दोन समाजात सामंजस्य, प्रेम, सदभावना वाढविण्याच्या दृष्टीने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे*.*आणखी एक विनंती आहे की* *कुर्बानी देताना गाय किंवा गोवं जनावरांची* *कुर्बानी देवु* *नये* पंडीत महेश व्यास

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget