Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-जिद्द चिकाटी व  कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते हेच अभिषेक दुधाळ याने दाखवुन दिले असुन आजच्या तरुणासमोर अभिषेक एक आदर्श असल्याचे मत उपविभागीय अधिकारी किरण सांवत पाटील यांनी व्यक्त केले बेलापुर येथील अभिषेक दुधाळ याने युपीएससी परिक्षेत सलग तिन वेळेस घवघवीत यश मिळवीले नुकत्याच झालेल्या परिक्षेत त्याने देशात२७८ वी रँक मिळवीली त्याबद्दल श्रीरामपुर महसुल विभागाच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते उपविभागीय अधीकारी किरण सावंत पुढे म्हणाले की तरुणांनी आगोदर आपले ध्येय निश्चित करावे व ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी अनेक जण प्रयत्न न करता नशिबाला दोष देतात परंतु प्रयत्नवादी रहा यश तुमच्या पायाशी लोटांगण घेईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिषेक दुधाळ असल्याचेही सावंत पाटील म्हणाले या वेळी प्रभारी तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनीही अभिषेक दुधाळ याचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या वेळी बोलताना अभिषेक दुधाळ याने मी घेतलेले कष्ट व त्याला मिळालेले आई वडील गुरुजन वर्ग मित्र परिवार या सर्वांचे आशिर्वाद व प्रेम  यामुळेच हे शक्य झाले असल्याचे मत व्यक्त केले या वेळी योगेश भालेकर रामेश्वर शेले सावळे भाऊसाहेब सय्यद भाऊसाहेब धनवटे भाऊसाहेब अभया राजळव शारदा वाघ मिलींद दुधाळ पत्रकार देविदास देसाई आदि  मान्यवर उपस्थित होते

श्रीरामपूर :-येथील श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजने आपली १००% टक्के निकालाची परंपरा यंदा सलग १८ व्या वर्षीही कायम राखली.यावर्षी शाळेतून एकूण ६३ विद्यार्थी बसले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले.धनश्री चौधरी ही विद्यार्थिनी ९०.४०%  टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आली. विभूती गुप्ता व मल्हार पवार दोघांनीही ९०.२०% टक्के गुण मिळवून द्वितीय तर ऋषिता सोनत्तके ८९.८० % गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे, खजिनदार जन्मजय टेकावडे, सदस्य सुरेश ओझा, विधीज्ञ दादासाहेब औताडे, प्राचार्य डॉ योगेश पुंड, शाळेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा.

बेलापूरःबेलापूरबु-ऐनतपूर गावच्या जलजीवन मिशन अंतर्गतच्या १२६ कोटी खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी शेती महामंडळाची साडे आठ एकर जमिन विनामुल्य देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत झाला.सदरची जमिन विनामुल्य मिळवून दिल्याबद्दल राज्याचे महसूलमंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा बेलापूर बु-ऐनतपूर ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.                            बेलापूर-ऐनतपूरच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी मंञीमंडळाच्या बैठकीत शेती महामंडळाची साडे आठ एकर जमिन देण्याचा निर्णय झाला होता.यासाठी जमिनीच्या  किमतीच्या दहा टक्के म्हणजे ३० लाख रुपये इतके जमिनीचे मुल्यांकन ठारविण्यात आले होते.तथापि महसूल मंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी सदरची जमीन गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी द्यायची असून लोकहिताच्या कामासाठी देणार असल्याने  सदरची जमिन विनामुल्य देणेबाबत आग्रही मागणी मुख्यमंञी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळ बैठकीत केली.सदरची विनंती मान्य करुन सदर जमिन विनामुल्य देण्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.यामुळे ग्रापंचायतीला भरावे लागणारे ३० लाख रुपये वाचले आहेत.                   सदर जमिन विनामुल्य मिळवून दिल्याबद्दल महसूल मंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांचा ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, अशोक कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जालिंदर कुऱ्हे,सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,भाजपा  सरचिटणीस प्रफुल्ल डावरे, हाजी इस्माईल शेख,तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरषोत्तम भराटे,तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ उर्फ लहानू नागले,अँड.अरविंद साळवी,पत्रकार दिलीप दायमा,प्रभात कुऱ्हे,शफिक बागवान,मोहसीन सय्यद,भाऊसाहेब तेलोरे,महेश कुऱ्हे,प्रशांत मुंडलिक,बाबुलाल पठाण,गोपी दाणी,दादासाहेब कुताळ,शशिकांत तेलोरे,सुनिल शहाणे,मास्तर हुडे,टिंकू राकेचा,राम कुऱ्हे,प्रभाकर लोखंडे आदी उपस्थित होते.

बेलापूरःबेलापूर-ऐनतपूर गावच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गतच्या १२६ कोटी रुपये खर्चाच्या  पाणीपुरवठा  योजनेच्या साठवण तलावासाठी शेती महामंडळाची साडे आठ एकर जमिन देण्यास महसूल मंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या प्रयत्नाने व जि.प.सदस्य शरद नवले यांच्या सततच्या पाठपुराव्याने राज्य मंञी मंडळाने मंजुरी दिल्याची माहिती सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली.                              बेलापूर-ऐनतपूरची १२६ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.या योजनेसाठीच्या साठवण तलावासाठी जागा नव्हती.त्यामुळे सध्याच्या साठवण तलावांच्या लगतचीच शेती महामंडळाची जमिन मिळावी असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता.तसेच यासाठी महसूल मंञी नामा.राधाकृष्ण विखे पा.यांचे माध्यमातून  जि.प. सदस्य शरद नवले,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उपअभियंता भिमगिरी कांबळे, शाखा अभियंता सुनिल हरदास यांनी सकारात्मक पाठपुरवठा केला होता.अखेर या प्रयत्नास यश येवून राज्य मंञी मंडळाने साठवण तलावासाठी शेती महामंडळाची सुमारे चार कोटी  किमतीची साडे आठ एकर जमिन अंदाजे ३०लाख किमतीत देण्यास मंजुरी दिली.                             सदर साठवण तलावाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागल्याने गावक-यांना १००दिवस पुरेल एवढ्या क्षमतेच्या सिमेंट काँक्रेटच्या साठवण तलावाची स्वप्नपूर्ती होणार आहे.यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी जागा मिळण्यासाठी पाठपुरावा केला म्हणून जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला तसेच ग्रामपंचायत सदस्य व प्रशासनाला धन्यवाद दिले.सदरचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंञी नाम.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंञी नाम.देवेन्द्र फडणवीस,महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे,पाणी पुरवठा मंञी नाम.गुलाबराव पाटील,खासदार सुजय विखे,खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहु कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आदिंसह महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाचे  उपअभियता भिमगिरी कांबळे,शाखा अभियंता सुनील हरदास तसेच शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद  दिले आहेत.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, जालिंदर कुऱ्हे,रणजीत श्रीगोड, मारुतीराव राशिनकर, देविदास देसाई, भाऊसाहेब कुताळ,ग्रा.प.सदस्य मुस्ताक शेख, चंद्रकांत नवले, प्रभात कुऱ्हे, शफिक बागवान, सचिन अमोलिक, अरविंद साळवी,भरत साळुंके, रविंद्र खटोड, प्रफुल्ल डावरे, लहानू नागले,बाळासाहेब दाणी,रावसाहेब अमोलिक,पुरुषोत्तम भराटे, भाऊसाहेब तेलोरे,प्रल्हाद अमोलिक,भैय्या शेख,शफिक आतार, जनार्दन ओहोळ, सचिन वाघ, विशाल आंबेकर, अमोल गाढे, किशोर महापुरे, गणेश मगर,मास्टर हुडे, प्रशांत मुंडलिक,गोपी दाणी,प्रशांत लढ्ढा, सद्दाम शेख, जिना शेख, दादासाहेब कुताळ,सागर ढवळे, बाबुराव पवार,शरद अंबादास नवले, दिलीप अमोलिक, किरण गागरे, विजय अमोलिक,लक्ष्मण रशिनकर,अन्सार पटेल,राजेंद्र फुंदे,बबन मेहेत्रे,प्रविण बाठीया, बाळासाहेब शेलार आदी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-वारसा हक्काने वाट्यास आलेल्या जमीनीची फेरफार नोंद मंजुर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागीतल्यावरुन बेलापुर येथील मंडलाधिकारी सारीका भास्कर वांढेकर व त्यांचा मदतनीस बाबासाहेब बाबुराव कदम यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या बाबत समजलेली माहीती आशी की तक्रारदार हे ऐनतपुर येथील शेतकरी असुन ऐनतपुर शिवारात गट नंबर २१ मधील ०.३५ हेक्टर क्षेत्र हे वारसा हक्काने तक्रारदार यांच्या वाट्यास आलेले होते .त्याची फेरफार नोंद बेलापुर मंडलाधिकारी यांच्याकडे प्रलंबीत होती तक्रारदार यांनी फेरफार नोंद मंजुर व्हावी या करीता बेलापुर  मंडलाधिकारी कार्यालयात अनेक चकरा मारल्या अखेर मंडलाधिकारी सारीका वांढेकर यांनी नोंद मंजुर करण्यासाठी दोन हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले आपली वारसा हक्काने मिळणारी जमिन असुन नोंद मंजुरीसाठी  पैसे देण्याचे मान्य नसल्यामुळे तक्रारदार यांनी अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे  पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे उपअधिक्षक प्रवीण लोखंडे पोलीस नाईक रमेश चौधरी महीला पोलीस नाईक संध्या म्हस्के पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक चालक दशरथ लाड आदिनी मंडलाधिकारी कार्यालय बेलापुर येथे सापळा लावला मंडलाधिकारी सारीका वांढेकर यांचा मदतनीस बाबासाहेब बाबुराव कदम यास मंडलाधिकारी वाढेकर यांच्याकरीता दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले त्यानुसार मंडलाधिकारी सारीका भास्कर वांढेकर व त्यांचा मदतनीस बाबासाहेब बाबुराव कदम यांचेविरुद्ध श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे  सारीका वांढेकर यांची कारकीर्दच सतत वादग्रस्त ठरलेली आहे त्या बेलापुरला रुजु झाल्यापासुन सतत कार्यालयात येणाऱ्याशी वाद घातल असत काम अडवुन ठेवणे व मागणी पुर्ण झाल्यावरच काम करणे अशी त्यांच्या कामाची पद्धत होती कामाबाबत एखादा तक्रारदार वरीष्ठाकडे अथवा राजकीय व्यक्तीकडे गेल्यास कुठेही जा तुझे कामच होणार नाही असे त्या ठणकावून सांगत असत कित्येक वेळा काम घेवुन जाणाऱ्या राजकीय वा सामाजिक कार्यकर्त्यांनाही त्या दबाव आणू नका माझ्या पद्धतीनेच काम होईल असे सांगत असत या बाबत तत्कालीन तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडेही अनेक तक्रारी करण्यात आलेल्या होत्या .त्यामुळे काम असुनही त्या कार्यालयाकडे कुणीही फिरकत नसे  यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जाहीर अवाहन करण्यात आले असुन त्यात कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्याचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्यूरो अहमदनगर दुरध्वनी क्रमांक ०२४१-२४२३६७७ वर संपर्क साधावा असे अवाहन करण्यात आलेले आहे.

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-शहरातील म्हसोबा चौक, पुर्णवादनगर परिसरातील नव्याने वसलेल्या परिसराला गुलमोहर कॅालनी नाव देण्याचा सर्वानुमते निर्णय घेत गुलमोहर कॅालनी, श्री साई रोड, वॅार्ड न.७, श्रीरामपूर फलकाचे अनावरण ज्येष्ठ नागरीक बाबुराव घोडेकर व गंगूबाई घोडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आल्याची माहीती युवक नेते, गुलमोहर हौसिंग को-ॲाप. सोसायटीचे मुख्य प्रवर्तक केतन खोरे यांनी दिली.

       यावेळी बोलताना केतन खोरे म्हणाले कि, शहरातील प्रत्येक परिसरातील नागरीकांना सुखसुविधा उपलब्ध करून देणे हि नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रत्येक नागरीकाने आपल्या नागरी वसाहतीतील आपल्या हक्काचे ओपन स्पेस जतन करणे गरजेचे आहे. अशा ओपन स्पेसवर ले आऊटमधील भुखंडधारकांचा पहिला हक्क असतो. प्रत्येक कुटुंबातील लहान मुले, महिलांसाठी हक्काचे छोटेखानी मैदान प्रत्येक परिसरात असणे गरजेचे आहे. गुलमोहर कॅालनीच्या सर्वांगीण विकासासाठी व हक्काचा ओपन स्पेस ताब्यात घेण्याच्या लढाईत पुर्ण ताकदीने लढणार असून शहरात ओपन स्पेस विषयाबाबत प्रभागातील नागरीकांमध्ये जनजागृती करणार असल्याचे प्रतिपादन केतन खोरे यांनी केले. गुलमोहर कॅालनीचे अध्यक्ष अण्णासाहेब पंडीत यांनी प्रस्ताविक केले.    

        याप्रसंगी मा.नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे, किशोर चौधरी, पटारे काका, प्रद्या उनवणे, संतोष घोडेकर, विवेक भोईर, संतोष होते, विनायक जाधव, ओमप्रकाश लढ्ढा, तागड सर, मयूर न्हावले, सुरेंद्र गोरे, अमोल माळवे, संजय नारंग, स्वप्निल उनवणे, कुणाल दहीटे, प्रमोद फणसे, सविता घोडेकर, संगिता पंडीत, मनिषा बर्डे, वर्षा भोईर, विद्या गागरे, पटारे ताई आदींसह कॅालनीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण दादा ससाणे यांच्या  मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीत पारदर्शी व स्वच्छ कारभार करण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही सभापती सुधीर नवले यांनी दिली. बेलापुर सेवा संस्थेच्या तसेच ग्रामस्थ व पत्रकारांच्या वतीने सभापती सुधीर नवले यांचा सत्कार करण्यात आला होता त्यावेळी सत्काराला उत्तर देताना सभापती सुधीर नवले म्हणाले की माझ्या रुपाने  ७० वर्षानंतर बेलापुर गावाला सभापतीपद मिळाले आहे  त्यामुळे गाव व परिसराला अतिशय आनंद झाला परंतु गावातील काहींना फार दुःख झाले मी सभापती होवु नये म्हणून काहींनी देव पाण्यात बुडवुन ठेवले होते आमचे नेते  भानुदास मुरकुटे तसेच करण ससाणे यांच्या शुभाशिर्वादामुळे मिळालेल्या पदाचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच बाजार समीतीच्या भल्यासाठी करणार असुन बाजार समीतीत चुकीचे काम करणार नाही तसेच चुकीचे काम होवु देणार नाही.  श्रीरामपुर बाजार समीतीत माल आणताना शेतकऱ्यांना देखील विश्वास वाटला पाहीजे ही काळजी व्यापाऱ्यांनी घेतली पाहीजे. शेतकऱ्यांच्या  मालाला योग्य भाव देणे हेच आपले पहीले कर्तव्य आहे. श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या उपबाजार असणाऱ्या बेलापुर व टाकळीभान येथेही मालाची आवक वाढविण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल शेतकऱ्यांनी आपला माल श्रीरामपुर बाजार समीतीतच विक्रीसाठी आणावा असे अवाहन सभापती सुधीर नवले यांनी केले आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget