ओपन स्पेसवर ले आऊटमधील नागरीकांचा प्रथम हक्क- केतन खोरे

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-शहरातील म्हसोबा चौक, पुर्णवादनगर परिसरातील नव्याने वसलेल्या परिसराला गुलमोहर कॅालनी नाव देण्याचा सर्वानुमते निर्णय घेत गुलमोहर कॅालनी, श्री साई रोड, वॅार्ड न.७, श्रीरामपूर फलकाचे अनावरण ज्येष्ठ नागरीक बाबुराव घोडेकर व गंगूबाई घोडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आल्याची माहीती युवक नेते, गुलमोहर हौसिंग को-ॲाप. सोसायटीचे मुख्य प्रवर्तक केतन खोरे यांनी दिली.

       यावेळी बोलताना केतन खोरे म्हणाले कि, शहरातील प्रत्येक परिसरातील नागरीकांना सुखसुविधा उपलब्ध करून देणे हि नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रत्येक नागरीकाने आपल्या नागरी वसाहतीतील आपल्या हक्काचे ओपन स्पेस जतन करणे गरजेचे आहे. अशा ओपन स्पेसवर ले आऊटमधील भुखंडधारकांचा पहिला हक्क असतो. प्रत्येक कुटुंबातील लहान मुले, महिलांसाठी हक्काचे छोटेखानी मैदान प्रत्येक परिसरात असणे गरजेचे आहे. गुलमोहर कॅालनीच्या सर्वांगीण विकासासाठी व हक्काचा ओपन स्पेस ताब्यात घेण्याच्या लढाईत पुर्ण ताकदीने लढणार असून शहरात ओपन स्पेस विषयाबाबत प्रभागातील नागरीकांमध्ये जनजागृती करणार असल्याचे प्रतिपादन केतन खोरे यांनी केले. गुलमोहर कॅालनीचे अध्यक्ष अण्णासाहेब पंडीत यांनी प्रस्ताविक केले.    

        याप्रसंगी मा.नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे, किशोर चौधरी, पटारे काका, प्रद्या उनवणे, संतोष घोडेकर, विवेक भोईर, संतोष होते, विनायक जाधव, ओमप्रकाश लढ्ढा, तागड सर, मयूर न्हावले, सुरेंद्र गोरे, अमोल माळवे, संजय नारंग, स्वप्निल उनवणे, कुणाल दहीटे, प्रमोद फणसे, सविता घोडेकर, संगिता पंडीत, मनिषा बर्डे, वर्षा भोईर, विद्या गागरे, पटारे ताई आदींसह कॅालनीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget