बेलापुर (प्रतिनिधी )-वारसा हक्काने वाट्यास आलेल्या जमीनीची फेरफार नोंद मंजुर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागीतल्यावरुन बेलापुर येथील मंडलाधिकारी सारीका भास्कर वांढेकर व त्यांचा मदतनीस बाबासाहेब बाबुराव कदम यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या बाबत समजलेली माहीती आशी की तक्रारदार हे ऐनतपुर येथील शेतकरी असुन ऐनतपुर शिवारात गट नंबर २१ मधील ०.३५ हेक्टर क्षेत्र हे वारसा हक्काने तक्रारदार यांच्या वाट्यास आलेले होते .त्याची फेरफार नोंद बेलापुर मंडलाधिकारी यांच्याकडे प्रलंबीत होती तक्रारदार यांनी फेरफार नोंद मंजुर व्हावी या करीता बेलापुर मंडलाधिकारी कार्यालयात अनेक चकरा मारल्या अखेर मंडलाधिकारी सारीका वांढेकर यांनी नोंद मंजुर करण्यासाठी दोन हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले आपली वारसा हक्काने मिळणारी जमिन असुन नोंद मंजुरीसाठी पैसे देण्याचे मान्य नसल्यामुळे तक्रारदार यांनी अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे उपअधिक्षक प्रवीण लोखंडे पोलीस नाईक रमेश चौधरी महीला पोलीस नाईक संध्या म्हस्के पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक चालक दशरथ लाड आदिनी मंडलाधिकारी कार्यालय बेलापुर येथे सापळा लावला मंडलाधिकारी सारीका वांढेकर यांचा मदतनीस बाबासाहेब बाबुराव कदम यास मंडलाधिकारी वाढेकर यांच्याकरीता दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले त्यानुसार मंडलाधिकारी सारीका भास्कर वांढेकर व त्यांचा मदतनीस बाबासाहेब बाबुराव कदम यांचेविरुद्ध श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सारीका वांढेकर यांची कारकीर्दच सतत वादग्रस्त ठरलेली आहे त्या बेलापुरला रुजु झाल्यापासुन सतत कार्यालयात येणाऱ्याशी वाद घातल असत काम अडवुन ठेवणे व मागणी पुर्ण झाल्यावरच काम करणे अशी त्यांच्या कामाची पद्धत होती कामाबाबत एखादा तक्रारदार वरीष्ठाकडे अथवा राजकीय व्यक्तीकडे गेल्यास कुठेही जा तुझे कामच होणार नाही असे त्या ठणकावून सांगत असत कित्येक वेळा काम घेवुन जाणाऱ्या राजकीय वा सामाजिक कार्यकर्त्यांनाही त्या दबाव आणू नका माझ्या पद्धतीनेच काम होईल असे सांगत असत या बाबत तत्कालीन तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडेही अनेक तक्रारी करण्यात आलेल्या होत्या .त्यामुळे काम असुनही त्या कार्यालयाकडे कुणीही फिरकत नसे यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जाहीर अवाहन करण्यात आले असुन त्यात कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्याचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्यूरो अहमदनगर दुरध्वनी क्रमांक ०२४१-२४२३६७७ वर संपर्क साधावा असे अवाहन करण्यात आलेले आहे.
Post a Comment