Latest Post

बेलापूरःबेलापूर-ऐनतपूर गावच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गतच्या १२६ कोटी रुपये खर्चाच्या  पाणीपुरवठा  योजनेच्या साठवण तलावासाठी शेती महामंडळाची साडे आठ एकर जमिन देण्यास महसूल मंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या प्रयत्नाने व जि.प.सदस्य शरद नवले यांच्या सततच्या पाठपुराव्याने राज्य मंञी मंडळाने मंजुरी दिल्याची माहिती सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली.                              बेलापूर-ऐनतपूरची १२६ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.या योजनेसाठीच्या साठवण तलावासाठी जागा नव्हती.त्यामुळे सध्याच्या साठवण तलावांच्या लगतचीच शेती महामंडळाची जमिन मिळावी असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता.तसेच यासाठी महसूल मंञी नामा.राधाकृष्ण विखे पा.यांचे माध्यमातून  जि.प. सदस्य शरद नवले,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उपअभियंता भिमगिरी कांबळे, शाखा अभियंता सुनिल हरदास यांनी सकारात्मक पाठपुरवठा केला होता.अखेर या प्रयत्नास यश येवून राज्य मंञी मंडळाने साठवण तलावासाठी शेती महामंडळाची सुमारे चार कोटी  किमतीची साडे आठ एकर जमिन अंदाजे ३०लाख किमतीत देण्यास मंजुरी दिली.                             सदर साठवण तलावाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागल्याने गावक-यांना १००दिवस पुरेल एवढ्या क्षमतेच्या सिमेंट काँक्रेटच्या साठवण तलावाची स्वप्नपूर्ती होणार आहे.यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी जागा मिळण्यासाठी पाठपुरावा केला म्हणून जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला तसेच ग्रामपंचायत सदस्य व प्रशासनाला धन्यवाद दिले.सदरचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंञी नाम.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंञी नाम.देवेन्द्र फडणवीस,महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे,पाणी पुरवठा मंञी नाम.गुलाबराव पाटील,खासदार सुजय विखे,खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहु कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आदिंसह महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाचे  उपअभियता भिमगिरी कांबळे,शाखा अभियंता सुनील हरदास तसेच शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद  दिले आहेत.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, जालिंदर कुऱ्हे,रणजीत श्रीगोड, मारुतीराव राशिनकर, देविदास देसाई, भाऊसाहेब कुताळ,ग्रा.प.सदस्य मुस्ताक शेख, चंद्रकांत नवले, प्रभात कुऱ्हे, शफिक बागवान, सचिन अमोलिक, अरविंद साळवी,भरत साळुंके, रविंद्र खटोड, प्रफुल्ल डावरे, लहानू नागले,बाळासाहेब दाणी,रावसाहेब अमोलिक,पुरुषोत्तम भराटे, भाऊसाहेब तेलोरे,प्रल्हाद अमोलिक,भैय्या शेख,शफिक आतार, जनार्दन ओहोळ, सचिन वाघ, विशाल आंबेकर, अमोल गाढे, किशोर महापुरे, गणेश मगर,मास्टर हुडे, प्रशांत मुंडलिक,गोपी दाणी,प्रशांत लढ्ढा, सद्दाम शेख, जिना शेख, दादासाहेब कुताळ,सागर ढवळे, बाबुराव पवार,शरद अंबादास नवले, दिलीप अमोलिक, किरण गागरे, विजय अमोलिक,लक्ष्मण रशिनकर,अन्सार पटेल,राजेंद्र फुंदे,बबन मेहेत्रे,प्रविण बाठीया, बाळासाहेब शेलार आदी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-वारसा हक्काने वाट्यास आलेल्या जमीनीची फेरफार नोंद मंजुर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागीतल्यावरुन बेलापुर येथील मंडलाधिकारी सारीका भास्कर वांढेकर व त्यांचा मदतनीस बाबासाहेब बाबुराव कदम यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या बाबत समजलेली माहीती आशी की तक्रारदार हे ऐनतपुर येथील शेतकरी असुन ऐनतपुर शिवारात गट नंबर २१ मधील ०.३५ हेक्टर क्षेत्र हे वारसा हक्काने तक्रारदार यांच्या वाट्यास आलेले होते .त्याची फेरफार नोंद बेलापुर मंडलाधिकारी यांच्याकडे प्रलंबीत होती तक्रारदार यांनी फेरफार नोंद मंजुर व्हावी या करीता बेलापुर  मंडलाधिकारी कार्यालयात अनेक चकरा मारल्या अखेर मंडलाधिकारी सारीका वांढेकर यांनी नोंद मंजुर करण्यासाठी दोन हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले आपली वारसा हक्काने मिळणारी जमिन असुन नोंद मंजुरीसाठी  पैसे देण्याचे मान्य नसल्यामुळे तक्रारदार यांनी अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे  पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे उपअधिक्षक प्रवीण लोखंडे पोलीस नाईक रमेश चौधरी महीला पोलीस नाईक संध्या म्हस्के पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक चालक दशरथ लाड आदिनी मंडलाधिकारी कार्यालय बेलापुर येथे सापळा लावला मंडलाधिकारी सारीका वांढेकर यांचा मदतनीस बाबासाहेब बाबुराव कदम यास मंडलाधिकारी वाढेकर यांच्याकरीता दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले त्यानुसार मंडलाधिकारी सारीका भास्कर वांढेकर व त्यांचा मदतनीस बाबासाहेब बाबुराव कदम यांचेविरुद्ध श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे  सारीका वांढेकर यांची कारकीर्दच सतत वादग्रस्त ठरलेली आहे त्या बेलापुरला रुजु झाल्यापासुन सतत कार्यालयात येणाऱ्याशी वाद घातल असत काम अडवुन ठेवणे व मागणी पुर्ण झाल्यावरच काम करणे अशी त्यांच्या कामाची पद्धत होती कामाबाबत एखादा तक्रारदार वरीष्ठाकडे अथवा राजकीय व्यक्तीकडे गेल्यास कुठेही जा तुझे कामच होणार नाही असे त्या ठणकावून सांगत असत कित्येक वेळा काम घेवुन जाणाऱ्या राजकीय वा सामाजिक कार्यकर्त्यांनाही त्या दबाव आणू नका माझ्या पद्धतीनेच काम होईल असे सांगत असत या बाबत तत्कालीन तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडेही अनेक तक्रारी करण्यात आलेल्या होत्या .त्यामुळे काम असुनही त्या कार्यालयाकडे कुणीही फिरकत नसे  यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जाहीर अवाहन करण्यात आले असुन त्यात कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्याचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्यूरो अहमदनगर दुरध्वनी क्रमांक ०२४१-२४२३६७७ वर संपर्क साधावा असे अवाहन करण्यात आलेले आहे.

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-शहरातील म्हसोबा चौक, पुर्णवादनगर परिसरातील नव्याने वसलेल्या परिसराला गुलमोहर कॅालनी नाव देण्याचा सर्वानुमते निर्णय घेत गुलमोहर कॅालनी, श्री साई रोड, वॅार्ड न.७, श्रीरामपूर फलकाचे अनावरण ज्येष्ठ नागरीक बाबुराव घोडेकर व गंगूबाई घोडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आल्याची माहीती युवक नेते, गुलमोहर हौसिंग को-ॲाप. सोसायटीचे मुख्य प्रवर्तक केतन खोरे यांनी दिली.

       यावेळी बोलताना केतन खोरे म्हणाले कि, शहरातील प्रत्येक परिसरातील नागरीकांना सुखसुविधा उपलब्ध करून देणे हि नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रत्येक नागरीकाने आपल्या नागरी वसाहतीतील आपल्या हक्काचे ओपन स्पेस जतन करणे गरजेचे आहे. अशा ओपन स्पेसवर ले आऊटमधील भुखंडधारकांचा पहिला हक्क असतो. प्रत्येक कुटुंबातील लहान मुले, महिलांसाठी हक्काचे छोटेखानी मैदान प्रत्येक परिसरात असणे गरजेचे आहे. गुलमोहर कॅालनीच्या सर्वांगीण विकासासाठी व हक्काचा ओपन स्पेस ताब्यात घेण्याच्या लढाईत पुर्ण ताकदीने लढणार असून शहरात ओपन स्पेस विषयाबाबत प्रभागातील नागरीकांमध्ये जनजागृती करणार असल्याचे प्रतिपादन केतन खोरे यांनी केले. गुलमोहर कॅालनीचे अध्यक्ष अण्णासाहेब पंडीत यांनी प्रस्ताविक केले.    

        याप्रसंगी मा.नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे, किशोर चौधरी, पटारे काका, प्रद्या उनवणे, संतोष घोडेकर, विवेक भोईर, संतोष होते, विनायक जाधव, ओमप्रकाश लढ्ढा, तागड सर, मयूर न्हावले, सुरेंद्र गोरे, अमोल माळवे, संजय नारंग, स्वप्निल उनवणे, कुणाल दहीटे, प्रमोद फणसे, सविता घोडेकर, संगिता पंडीत, मनिषा बर्डे, वर्षा भोईर, विद्या गागरे, पटारे ताई आदींसह कॅालनीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण दादा ससाणे यांच्या  मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीत पारदर्शी व स्वच्छ कारभार करण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही सभापती सुधीर नवले यांनी दिली. बेलापुर सेवा संस्थेच्या तसेच ग्रामस्थ व पत्रकारांच्या वतीने सभापती सुधीर नवले यांचा सत्कार करण्यात आला होता त्यावेळी सत्काराला उत्तर देताना सभापती सुधीर नवले म्हणाले की माझ्या रुपाने  ७० वर्षानंतर बेलापुर गावाला सभापतीपद मिळाले आहे  त्यामुळे गाव व परिसराला अतिशय आनंद झाला परंतु गावातील काहींना फार दुःख झाले मी सभापती होवु नये म्हणून काहींनी देव पाण्यात बुडवुन ठेवले होते आमचे नेते  भानुदास मुरकुटे तसेच करण ससाणे यांच्या शुभाशिर्वादामुळे मिळालेल्या पदाचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच बाजार समीतीच्या भल्यासाठी करणार असुन बाजार समीतीत चुकीचे काम करणार नाही तसेच चुकीचे काम होवु देणार नाही.  श्रीरामपुर बाजार समीतीत माल आणताना शेतकऱ्यांना देखील विश्वास वाटला पाहीजे ही काळजी व्यापाऱ्यांनी घेतली पाहीजे. शेतकऱ्यांच्या  मालाला योग्य भाव देणे हेच आपले पहीले कर्तव्य आहे. श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या उपबाजार असणाऱ्या बेलापुर व टाकळीभान येथेही मालाची आवक वाढविण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल शेतकऱ्यांनी आपला माल श्रीरामपुर बाजार समीतीतच विक्रीसाठी आणावा असे अवाहन सभापती सुधीर नवले यांनी केले आहे

शेवगांव-अविनाश देशमुख:-शेवगाव पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत तब्बल १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गु.र.नं ४४२/२०२३, आणि गु.र.नं ४३७/२०२३ कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि २६/05/2023 रोजी सकाळी ९:१० वाजता मुंडे चौक बोधेगाव येथे एक टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा एम एच क्रमांक ३२ क्यु ३७७२ डंपर रोडवरून जात असताना त्यास थांबविले असता डंपर चालकास ताब्यात घेऊन त्यांस नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव एकनाथ पांडुरंग मिसाळ वय ३४ वर्षे राहणार बोधेगाव तालुका शेवगाव असे सांगितले सदर डंपर चालकास वाळू वाहतूकीच्या परवाना बाबत माहिती विचारली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही.सदर डंपर चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर वाळू वाहतूक केली असल्याने शेवगाव पोलिस स्टेशन येथे सदर डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच  दि २४/05/2023 रोजी भगतसिंग चौक शेवगाव या ठिकाणाहून टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा एम एच क्रमांक १७ ए जी ५०५० डंपर चालकास वाळू वाहतूक सदर डंपर चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर वाळू वाहतूक केली असल्याने शेवगाव पोलिस स्टेशन येथे सदर डंपर चालकावर गुन्हा दाखल परवाना संदर्भात माहिती विचारली असता सदर डंपर चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर वाळू वाहतूक केली असल्याने शेवगाव पोलिस स्टेशन येथे सदर डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे *या दोन्ही कारवाईमध्ये तब्बल १५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कौतुकास्प़द कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला सो ,मा.अप्प़र पोलीस अधिक्षक सो श्री. प्रशांत खैरे साहेब , मा.उपविभागीय  पोलीस अधिकारी श्री.संदिप मिटके सो श्रीरामपुर विभाग चार्ज शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.विलास पुजारी,सपोनि/आशिष शेळके,चापोना/ रविंद्र शेळके,चापोना/बाळासाहेबनागरगोजे   ,पोकॉ/ बप्पासाहेब धाकतोडे,पोकॉ/  राहुल खेडकर यांनी सदरची कामगिरी  केली आहे.

बेलापुर (प्रतिनिधी )-येथील अभिषेक दिलीप दुधाळ याने जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिसऱ्यांदा युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवीले असुन नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससीच्या निकालात २७८ क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवीला आहे                                  अभिषेक दिलीप दुधाळ याने यापूर्वी वयाच्या २३ व्या वर्षी युपीएससी परिक्षा उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवीला होता त्या वेळी त्याला ६३७ रँंक मिळाली होती त्याला इंडीयन रेल्वे ट्रँफीक सर्व्हीस आयआरटीएस गृप ए हे पद मिळाले या ठिकाणी सेवेत हजर होवुन पुन्हा परीक्षा देण्याचा त्याने निर्णय घेतला अन अभ्यास सुरुच ठेवला दररोज सात तास नियमित अभ्यास सुरु ठेवला म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर त्याप्रमाणे त्याने २०२० मध्ये दिलेल्या युपीएससी परिक्षेत देशात ४६९ वा रँंक मिळवीला  इंडीयन पोलीस सर्व्हीस हे पद मिळवुन हैद्राबाद येथे प्रशिक्षण सुरु झाले यावरही समाधान मानेल तो अभिषेक कसला त्याने पुन्हा नियमित अभ्सास सुरुच ठेवला अन पुन्हा  परिक्षा दिली व नुकताच युपीएससी परिक्षेचा निकाल जाहीर झाला असुन त्यात त्याला २७८ रँक मिळाले आहे सलग तिन वेळा परिक्षा देवुन तिनही वेळेस वरची रँक मिळवीणारे अभिषेक दुधाळ यांचे प्राथमिक शिक्षण बेलापुर तसेच जेटीएस हायस्कूल बेलापुर  येथे झाले  त्यापुढील शिक्षण मुंबई येथील वीर जिजामाता अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत माहीती व तंत्रज्ञान विभागात पदवी प्राप्त केली आयटी क्षेत्रातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून प्रशासकीय सेवेत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला याकरीता वडील दिलीप व आई संगीता दुधाळ यांची तसेच गुरुजन वर्ग तसेच मित्रांची मोलाची साथ मिळाली  दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जेएनयू एमए अर्थशास्र विभागासाठी प्रवेश घेतला त्याकरीता खाजगी शिकवणी लावली नंतर स्वंय अध्यापन करण्याचा निर्णय घेतला व कठोर अशी मेहनत घेवुन सलग तिसऱ्यांदा युपीएससी परीक्षेत यश मिळवीले याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे राज्यातील वातावरण खराब करायचा प्रयत्न काही प्रतिगामी शक्ती करीत आहेत. अकोला, शेवगाव येथे हे प्रयोग झालेले आहेत. श्रीरामपूर सुद्धा अशा पद्धतीने अशांत करून श्रीरामपूरची शांतता धोक्यात आणून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा डाव वेळोवेळी आखला जात असतो.यातूनच काल हजरत काजीबाबा उर्सानिमित्ताने निघालेल्या चादरीवर गोंधवणी गावांमध्ये दगडफेक करून वातावरण खराब करायचा प्रयत्न काही समाजकंटक यांनी केला. मात्र कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम,पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व त्यांच्या टीमने अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळली व शहराच्या शांततेला गालबोट लावण्याचा करण्यात आलेला प्रयत्न हाणून पाडला.एवढेच नव्हे तर ज्या दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली होती ती त्यांना तातडीने उघडायला लावली तसेच काजी बाबांच्या कव्वालीच्या कार्यक्रमात कोणताही खंड न पडू देता सुरळीतपणे रात्री बारा वाजेपर्यंत ती पार पडली. त्यामुळे ज्या ठिकाणी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असतात तिथली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाते याचा प्रत्येक काल श्रीरामपूरकरांना आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम या स्वतः हेल्मेट लावून बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरल्या आणि शहराचं वातावरण खराब करणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड केला. त्याबद्दल सर्व शहरवासीय त्यांना धन्यवाद देत आहेत.

दंगलीसाठी बऱ्याचदा शुल्लक कारणे देखील पुरेशी असतात. हजरत काजीबाबा म्हणजे श्रीरामपूरचे जिवंत प्रतीक होते. त्यांचा उरूस अतिशय भक्तिभावाने दरवर्षी साजरा केला जातो. पन्नास वर्षाची परंपरा या उरुसाला आहे. काजी बाबा उर्सानिमित्त होणाऱ्या कव्वाल्या या महाराष्ट्रभर गाजत असतात. काजीबाबांचा भक्त परिवार शहरात सर्वत्र असल्यामुळे विविध भागातून ऊर्सा निमित्ताने चादरी दर्ग्यावर येतात. अशीच एक चादर काल गोंधवणी गावातून येत असताना गोंधवणी रोड वरील गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी वाद घालून त्या ठिकाणी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. गोंधवणी रोडची ही गुंड टोळी पोलीस रेकॉर्डवर सुद्धा आहे.त्यांच्या गुंडगिरीने संपूर्ण परिसर, तेथील महिला भगिनी, तरुण मुली वैतागलेल्या आहेत. अशा या गुंड प्रवृत्तींनी काल चादरीचे निमित्त करून शहरात अशांतता निर्माण करण्याचा व दंगल सदृश्य परिस्थिती तयार केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून चादर काढणाऱ्या तरुणांनी सुद्धा माणसं गोळा करायचा प्रयत्न केला होता.हे प्रकरण जर वाढले असते तर श्रीरामपूरची शांतता काल बिघडली असती. परंतु सर्व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थिती अत्यंत कौशल्याने हाताळल्याने राज्यात होणारी संभाव्य एक दंगल टळली असे म्हणता येईल.

अलीकडच्या काही दिवसांमध्ये श्रीरामपूर शहराची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न होत आहेत. परराज्यातील माणसे बोलावून प्रक्षोभक वक्तव्य केली जात आहेत. श्रीरामपूरला शांततेची वेगळी परंपरा आहे. सर्व जाती-धर्माचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने येथे नांदतात. निवडणूक जवळ आली की काही लोकांच्या अंगात येते. कधी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तर कधी अन्य कारणावरून लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु शहरातील जनता अत्यंत सुज्ञ असल्यामुळे ती या माथेफिरूंच्या अशा प्रयत्नांना बळी पडत नाही. परंतु दरवेळी अशा पद्धतीने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काहीतरी कारण शोधून खोटे-नाटे प्रयत्न करून शहराची शांतता व सुव्यवस्था वेठीस धरली जाते.अशा गुंड प्रवृत्तींचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. सध्या श्रीरामपुरात गुंडांना महत्त्व आले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले गुंड उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांना सत्ताधारी राजकीय पक्षाचे काही लोक मदत करीत असल्याची खुली चर्चा शहरामध्ये आहे. नगरपालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्याचबरोबर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा हिंदू - मुस्लिम विरोधी वातावरण निर्माण करून,मते मिळवण्यासाठी धर्माचा आधार घेऊन लोकांची माथी भडकवण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र खरोखरच श्रीरामपूरकरांना धन्यवाद दिले पाहिजे कि ते अत्यंत समजूतदारपणे या लोकांच्या या प्रयत्नांना बळी पडत नाही. तरी सुद्धा भविष्य काळामध्ये श्रीरामपूरची शांतता अबाधित राखण्यासाठी दोन्ही बाजूला असणाऱ्या गुंड प्रवृत्तीचा बिमोड करून त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. शहरांमध्ये काही ठराविक गट असे निर्माण झाले आहेत कि ते राजरोसपणे दोन नंबरचे धंदे उजळ माथ्याने करीत आहेत. वाळू सम्राटांचे आता धाबे दणाणले आहेत. मटका जोरात आहे. हप्ते वसुली जोरात आहे.

पोलीस खात्याचे काही कर्मचारी या गुंडांचे हस्तक म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे गुंडांचे मनोबल वाढले आहे. सर्वसामान्य जनता मात्र त्यामुळे त्रासलेली आहे. सार्वजनिक उत्सवाच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी गोळा करून अनेक कार्यक्रम मागील दोन महिन्यात शहरात झालेले आहेत. थोडसं जरी कुठे खट्ट वाजलं तरी बाजारपेठेतील व्यापारी भीतीने आपली दुकाने बंद करतात.ही भीती दूर करण्याचे काम पोलीस प्रशासनाने केले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा याबाबत जागरूक होऊन लक्ष घालणे गरजेचे आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना श्रीरामपूरची सर्व परिस्थिती माहिती आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग शहर व तालुक्यामध्ये आहे. सर्व समाजामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांनी देखील श्रीरामपूरची शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची गरज आहे. त्यासाठी व्यापक स्वरूपामध्ये श्रीरामपूर शहरांमध्ये शांतता कमिटीची बैठक पालकमंत्र्यांचे उपस्थितीमध्ये होण्याची आवश्यकता आहे.

गुंड प्रवृत्तीचे लोक सर्वत्र असतात. दोन्ही बाजूने अशा गुंड लोकांचा बंदोबस्त होऊन शहरातील नागरिकांना शांततेत जीवन कसे जगता येईल, येणाऱ्या काळातील निवडणुकांना कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget