बेलापूरच्या अभिषेक दुधाळचे युपीएससी परिक्षेत तिसऱ्यांदा घवघवीत यश
बेलापुर (प्रतिनिधी )-येथील अभिषेक दिलीप दुधाळ याने जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिसऱ्यांदा युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवीले असुन नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससीच्या निकालात २७८ क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवीला आहे अभिषेक दिलीप दुधाळ याने यापूर्वी वयाच्या २३ व्या वर्षी युपीएससी परिक्षा उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवीला होता त्या वेळी त्याला ६३७ रँंक मिळाली होती त्याला इंडीयन रेल्वे ट्रँफीक सर्व्हीस आयआरटीएस गृप ए हे पद मिळाले या ठिकाणी सेवेत हजर होवुन पुन्हा परीक्षा देण्याचा त्याने निर्णय घेतला अन अभ्यास सुरुच ठेवला दररोज सात तास नियमित अभ्यास सुरु ठेवला म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर त्याप्रमाणे त्याने २०२० मध्ये दिलेल्या युपीएससी परिक्षेत देशात ४६९ वा रँंक मिळवीला इंडीयन पोलीस सर्व्हीस हे पद मिळवुन हैद्राबाद येथे प्रशिक्षण सुरु झाले यावरही समाधान मानेल तो अभिषेक कसला त्याने पुन्हा नियमित अभ्सास सुरुच ठेवला अन पुन्हा परिक्षा दिली व नुकताच युपीएससी परिक्षेचा निकाल जाहीर झाला असुन त्यात त्याला २७८ रँक मिळाले आहे सलग तिन वेळा परिक्षा देवुन तिनही वेळेस वरची रँक मिळवीणारे अभिषेक दुधाळ यांचे प्राथमिक शिक्षण बेलापुर तसेच जेटीएस हायस्कूल बेलापुर येथे झाले त्यापुढील शिक्षण मुंबई येथील वीर जिजामाता अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत माहीती व तंत्रज्ञान विभागात पदवी प्राप्त केली आयटी क्षेत्रातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून प्रशासकीय सेवेत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला याकरीता वडील दिलीप व आई संगीता दुधाळ यांची तसेच गुरुजन वर्ग तसेच मित्रांची मोलाची साथ मिळाली दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जेएनयू एमए अर्थशास्र विभागासाठी प्रवेश घेतला त्याकरीता खाजगी शिकवणी लावली नंतर स्वंय अध्यापन करण्याचा निर्णय घेतला व कठोर अशी मेहनत घेवुन सलग तिसऱ्यांदा युपीएससी परीक्षेत यश मिळवीले याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे
Post a Comment