Latest Post

श्रीरामपूर  : संपूर्ण राज्यात श्रीरामपूर शहराची ओळख,श्रीराम जन्मोत्सव व श्रीराम नवमी यात्रेमुळे निर्माण झालेली असल्याने. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यासह परराज्यातून,मोठ्या प्रमाणात व्यापारी तसेच रहाट पाळणे वाले येत असतात. परंतु यंदाच्या वर्षी अनेक वर्षांपासून परंपरेने चालत आलेल्या, श्रीराम जन्मोत्सव व श्रीराम नवमी यात्रेच्या नियोजन करतांना. प्रशासनाच्या बेजबाबदार व निष्काळजीपणाच्या भुमिकेमूळे,यात्रा भरणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना. रासकर नगर याठिकाणी,आनंद मेळा नावाने उत्सव भरविण्यात आला. मात्र केवळ गावातील काही विघ्नसंतोषी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी वारांवर प्रशासनावर दबाव आणल्याने, पालिका व पोलीस प्रशासनाला दडपशाही करून.१० दिवस चालणारी यात्रा चौथ्या दिवशी बंद पडली. त्यामुळे बाहेरून आलेले व्यापारी व रहाट पाळणे चालकांवर उपासमारीची वेळ आली असून. शहरातील सर्व सामान्य जनतेला यात्रेचा आनंद घेता आला नसल्याने, जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष व संतापाची लाट उसळल्याने. रहाट पाळणे सुरू करा या मागणी करिता. शहरातील जनता रस्त्यावर उतरली आहे. सदरच्या मागणी करिता भगवाधारी ग्रुप, बजरंग दल,विश्व हिंदू परिषद, शिवसेना ठाकरे गट, सिटीझन जस्टीस प्रेस कॉन्सिल,महाराष्ट्र  सर्वोदयोग कामागर कर्मचारी युनियन,भोईराज युवा प्रतिष्ठाण आदींसह विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी अनिल पवार,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे आदींना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रशासनामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जात असलेल्या व्यावसायिकांनी आशा प्रकारे त्रास होत असेल तर ,यापुढे श्रीरामपूरच्या यात्रेवर न येण्याचा निर्णय घ्यावा लागेल अशी भूमिका अधिका-यां समोर स्पष्ट केले. सदरच्या आंदोलनास सुरज यादव गौतम जावरे, सागर वाडीले,अर्जुन मापारी,यश बनसोडे,राहुल मापारी, रणरागिणीच्या सपनाताई थेटे,अमित मुथ्था, अनिल लगड,शक्तीराज सिंग,गणेश चव्हाण,अमोल सावंत,सेनेचे राहुल ,अकिल मानियार, नितीन बनसोडे, मच्छिंद्र शिंदे, सुनील डुकरे आदींसह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापुर (प्रतिनिधी  )-जगाला अहींसा व शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती बेलापुरात मोठ्या उत्सहात संपन्न झाली भगवान महावीरांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली जैन बांधव मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते जैन स्थानकापासून मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली बेलापुरच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला मिरवणूक जैन स्थानकात आल्यानंतर जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके आदिंनी सर्वांना भगवान महावीर जयंती निमित्त मनोगत व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या तालुक्याचे आमदार लहु कानडे तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक यांनीही जैन स्थानकात जावुन भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पुजन करुन जगाला मानवतेचा संदेश देणारे भगवान महावीरांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले या वेळी मा.जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले भास्कर बंगाळ पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा प्रकाश कुऱ्हे दत्ता कुऱ्हे सुवालाल लुंक्कड शांतीलाल हिरण सचिन कोठारी प्रविण बाठीया अभिजित राका सुभाष बोरा अमीत लुक्कड अतिश देसर्डा विजय कोठारी विजय कटारीया संजया बाठीया योगेश कोठारी सांतोष ताथेड मनिष मुथा संदीप देसर्डा शितल गंगवाल आदि उपस्थितीत  होते

श्रीरामपूर (प्रतिनिधी )-शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातुन मोफत गहु व तांदूळ वितरण करण्यात येत असल्यामुळे आनंदाचा शिधाही उधारीवर द्यावा अशी रांज्य संघटनेची मागणी शासनाने मान्य केली असुन जिल्ह्यात फक्त स्वयः घोषणापत्र घेवुन उधारीवर आनंदाचा शिधा दिला जात असल्यामुळे अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,पुरवठा मंत्री त्याचबरोबर  महसुल तथा पालकमंत्री यांना धन्यवाद दिले आहे                                           अहमदनगर जिल्ह्यातील १८८३ धान्य दुकानदारांमार्फत माहे जानेवारी २०२३ पासुन शासनाने  कार्डधारकांना मोफत गहु वा तांदूळ वितरीत करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दुकानदारांना मोफत आलेला माल मोफतच वितरीत करावा लागतो त्यातच शासनाने गुढी पाडवा व डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले परंतु दुकानदारांना मागील मोफत धान्य वितरीत केल्येल्या धान्याचे मार्जिन अद्याप मिळालेले नाही त्यामुळे दुकानदारांना आर्थिक अडचण आहे त्यामुळे आनंदाचा शिधा उधारीवर द्यावा अशी मागणी राज्य फेडरेशनच्या वतीने करण्यात आली होती त्या योग्य मागणीची  दाखल घेत शासनाने उधारीवर शिधा देण्याचे आदेश सर्व जिल्हा कार्यालयाला दिले असुन अहमदनगर जिल्ह्यात आनंदाचा शिधा पोहोच झाला असुन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांनी दुकानदाराकडून स्वयः घोषणापत्र भरुन उधारीवर आनंदाचा शिधा देण्याचे आदेश दिले असुन या आदेशामुळे दुकानदारांना दिलासा मिळाला आहे दुकानदारांना प्रथमच उधारीवर माल देण्यात आला असुन त्या बद्दल अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरवठा मंत्री नामदार रविंद्र चव्हाण महसुल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष गणपतराव डोळसे सचिव बाबुराव ममाणे अशोक ऐडके संजय पाटील संजय देशमुख आदिचे अभिनंदन केले आहे या पत्रकावर जिल्हाध्यक्ष देविदास देसाई सचिव रज्जाक पठाण तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे मंगेश छतवाणी बाबा कराड शिवाजी मोहीते कैलास बोरावके गणपतराव भांगरे  काशिनाथ अरगडे रावसाहेब भगत मुनिर देशमुख ज्ञानेश्वर वहाडणे अजीज शेख भाऊसाहेब वाघमारे राजेंद्र थोरात विश्वासराव जाधव प्रकाश भोसले आदिंच्या सह्या आहेत

श्रीरामपुर  ( प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यासाठी गुढी पाडवा व डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त देण्यात येणारा आनंदाचा शिधा श्रीरामपुर गोदामात आलेला असुन सोमवार दिनाक ३ एप्रिल पासुन तालुक्यात वितरण सुरु करण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे                                   या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात तहसीलदार पाटील यांनी पुढे म्हटले आहे की तालुक्यात सहकारी संस्था, महीला बचत गट, खाजगी व्यक्ती असे एकुण ११० स्वस्त धान्य दुकाने असुन तालुक्यात असणाऱ्या कार्डधारकासाठी तालुक्यासाठी एकुण ३६८४० आनंदाचा शिधा उपलब्ध झाला असुन सोमवार दिनांक ३ एप्रिल २०२३ पासुन शासकीय गोदामातुन हा शिधा दुकाननिहाय वितरीत करण्यात येणार आहे प्रति कार्ड एक या प्रमाणे हा शिधा वाटप करण्यात येणार असुन त्यात एक किलो साखर एक किलो चना डाळ एक लिटर पामतेल एक किलो रवा अशा प्रकारे हा शिधा वाटप करण्यात येणार आहे प्रति किटची किमत १०० रुपये असणार आहे तालुक्यातील कार्डधाराकांनी १०० रुपयात हा शिधा आपल्या जवळील रेशन दुकानातुन घेवुन जावा या बाबत कुणाची काही तक्रार असल्यास पुरवठा विभागाशी सांपर्क साधावा असे अवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे .

अहमदनगर प्रतिनिधी-पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने

पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन  नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/गणेश वारुळे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापु फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, भिमराज खर्से, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/विनोद मासाळकर, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ/संभाजी कोतकर व चापोहेकॉ/अर्जुन बडे अशांनी मिळून शेतकरी, शेतमजुर असे वेशांतर करुन
संशयीतास ताब्यात घेण्याचे तयारीत असताना तो पळुन जावु लागला अधिकारी व अंमलदारांनी संशयीताचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले याने त्याचे नाव 1) कयामुद्दीन ऊर्फ भैय्या कुतुबूद्दीन शेख, सांगीतले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली आसता अंगझडतीत एका राखाडी रंगाचे सॅकमध्ये 6 गावठी बनावटीचे कट्टे व 12 जिवंत काडतूस मिळून आले
बारकाईन चौकशी करता त्याने सदर गावठीकट्टे व जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने आणले असल्याचे सांगितले.
सदर घटने बाबत पोहेकॉ संदीप कचरु पवार, ने. स्थागुशा, अहमदनगर यांनी सोनई पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन सोनई  पोलीस स्टेशन गु.र.नं. 143/2023 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील कायदेशिर कार्यवाही सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बेलापुर प्रतिनिधी -जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, यांनी पोलीस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली दत्तात्रय डहाळे रा. शिर्डी हा त्याचे साथीदारासह गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी बाजारतळ, बेलापुर येथे येणार आहेत  अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने

 अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ / २१४५ मनोहर सिताराम गोसावी, पोहेकॉ / २१६४ दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे, पोहेकॉ/८७२ सुरेश माळी, पोहेकॉ/संदिप घोडके पोना / विशाल दळवी,पोना/ शंकर चौधरी,पोना/दिलीप शिंदे, पोना/संदिप  चव्हाण पोकों / सागर  ससाणे, पोकॉ/ रोहित येमुल पोकों / रणजित  जाधव व चापोहेकॉ उमांकात गावडे, चापोहेकॉ / अर्जुन बडे अशांनी मिळून वेशांतर करुन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने बेलापुर येथील बाजारतळ येथे जावुन सापळा लावुन 

 रेकॉर्डवरील इसम नामे दत्तात्रय डहाळे व त्याचे सोबत एक इसम बेलापुर बाजार वेशीतून बाजारतळाकडे पायी येतांना दिसल्याने पथकाची खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे (१) दत्तात्रय सुरेश डहाळे वय ३४ रा. श्रीराम नगर, शिर्डी, (२) सुलतान फत्तेमोहमद शेख वय २९ रा. महलगल्ली, बेलापुर असे असल्याचे सांगीतले.

त्यांचे अंगझडतीत एकुण १,४५,७००/- रु. किमतीचा मुददेमाल त्यात ०४ देशी बनावटीचे पिस्टल, ८ जिवंत काडतूसे असा मुद्देमाल वरील नमुद दोन्ही इसमांचे कब्जात मिळून आला आहे.

       दत्तात्रय सुरेश डहाळे वय ३४ रा. श्रीराम नगर, शिर्डी, ता. राहाता जि. अहमदनगर हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी औरंगाबाद जिल्हयात अग्नीशस्त्र सह एक तसेच खुनाचा प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर घटने बाबत पोहेकॉ / मनोहर सिताराम गोसावी नेम. स्थागुशा, अहमदनगर यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन आर्म अॅक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कायदेशिर कार्यवाही श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर विभाग श्रीरामपुर व श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदा यांनी केलेली आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्री  स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्र बेलापुर या ठिकाणी स्वामी समर्थ प्रगट दिन वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला.                स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त बेलापुर येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्रात सकाळी आरती त्यांनंतर स्वामी चरित्र वाचन नंतर आरती  व शेवटी सहभोजन सायंकाळी पत्रकार देविदास देसाई व प्रतिभा देसाई यांच्या हस्ते आरती असा कार्यक्रम संपन्न झाला स्वामी समर्थ महाराजाच्या प्रगट दिनास परिसरातील सेवेकरी महीला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी विठ्ठल गाढे यांनी सर्व सेवेकऱ्यांचे आभार मानले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget