श्रीरामपुर तालुक्यात सोमवारपासुन आनंदाचा शिधा किटचे वितरण सुरु -तहसीलदार पाटील
श्रीरामपुर ( प्रतिनिधी )-श्रीरामपुर तालुक्यासाठी गुढी पाडवा व डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त देण्यात येणारा आनंदाचा शिधा श्रीरामपुर गोदामात आलेला असुन सोमवार दिनाक ३ एप्रिल पासुन तालुक्यात वितरण सुरु करण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात तहसीलदार पाटील यांनी पुढे म्हटले आहे की तालुक्यात सहकारी संस्था, महीला बचत गट, खाजगी व्यक्ती असे एकुण ११० स्वस्त धान्य दुकाने असुन तालुक्यात असणाऱ्या कार्डधारकासाठी तालुक्यासाठी एकुण ३६८४० आनंदाचा शिधा उपलब्ध झाला असुन सोमवार दिनांक ३ एप्रिल २०२३ पासुन शासकीय गोदामातुन हा शिधा दुकाननिहाय वितरीत करण्यात येणार आहे प्रति कार्ड एक या प्रमाणे हा शिधा वाटप करण्यात येणार असुन त्यात एक किलो साखर एक किलो चना डाळ एक लिटर पामतेल एक किलो रवा अशा प्रकारे हा शिधा वाटप करण्यात येणार आहे प्रति किटची किमत १०० रुपये असणार आहे तालुक्यातील कार्डधाराकांनी १०० रुपयात हा शिधा आपल्या जवळील रेशन दुकानातुन घेवुन जावा या बाबत कुणाची काही तक्रार असल्यास पुरवठा विभागाशी सांपर्क साधावा असे अवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे .
Post a Comment