स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन बेलापूरात साजरा
बेलापुर (प्रतिनिधी )-श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्र बेलापुर या ठिकाणी स्वामी समर्थ प्रगट दिन वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला. स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त बेलापुर येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्रात सकाळी आरती त्यांनंतर स्वामी चरित्र वाचन नंतर आरती व शेवटी सहभोजन सायंकाळी पत्रकार देविदास देसाई व प्रतिभा देसाई यांच्या हस्ते आरती असा कार्यक्रम संपन्न झाला स्वामी समर्थ महाराजाच्या प्रगट दिनास परिसरातील सेवेकरी महीला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी विठ्ठल गाढे यांनी सर्व सेवेकऱ्यांचे आभार मानले
Post a Comment