रहाट पाळणे चालू करा श्रीरामपूरात जनता रस्त्यावर, श्रीरामाच्या रामनवमी उत्सवात राजकारण व्यवसायिकांची हाल बेहाल.
श्रीरामपूर : संपूर्ण राज्यात श्रीरामपूर शहराची ओळख,श्रीराम जन्मोत्सव व श्रीराम नवमी यात्रेमुळे निर्माण झालेली असल्याने. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यासह परराज्यातून,मोठ्या प्रमाणात व्यापारी तसेच रहाट पाळणे वाले येत असतात. परंतु यंदाच्या वर्षी अनेक वर्षांपासून परंपरेने चालत आलेल्या, श्रीराम जन्मोत्सव व श्रीराम नवमी यात्रेच्या नियोजन करतांना. प्रशासनाच्या बेजबाबदार व निष्काळजीपणाच्या भुमिकेमूळे,यात्रा भरणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना. रासकर नगर याठिकाणी,आनंद मेळा नावाने उत्सव भरविण्यात आला. मात्र केवळ गावातील काही विघ्नसंतोषी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी वारांवर प्रशासनावर दबाव आणल्याने, पालिका व पोलीस प्रशासनाला दडपशाही करून.१० दिवस चालणारी यात्रा चौथ्या दिवशी बंद पडली. त्यामुळे बाहेरून आलेले व्यापारी व रहाट पाळणे चालकांवर उपासमारीची वेळ आली असून. शहरातील सर्व सामान्य जनतेला यात्रेचा आनंद घेता आला नसल्याने, जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष व संतापाची लाट उसळल्याने. रहाट पाळणे सुरू करा या मागणी करिता. शहरातील जनता रस्त्यावर उतरली आहे. सदरच्या मागणी करिता भगवाधारी ग्रुप, बजरंग दल,विश्व हिंदू परिषद, शिवसेना ठाकरे गट, सिटीझन जस्टीस प्रेस कॉन्सिल,महाराष्ट्र सर्वोदयोग कामागर कर्मचारी युनियन,भोईराज युवा प्रतिष्ठाण आदींसह विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी अनिल पवार,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे आदींना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रशासनामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जात असलेल्या व्यावसायिकांनी आशा प्रकारे त्रास होत असेल तर ,यापुढे श्रीरामपूरच्या यात्रेवर न येण्याचा निर्णय घ्यावा लागेल अशी भूमिका अधिका-यां समोर स्पष्ट केले. सदरच्या आंदोलनास सुरज यादव गौतम जावरे, सागर वाडीले,अर्जुन मापारी,यश बनसोडे,राहुल मापारी, रणरागिणीच्या सपनाताई थेटे,अमित मुथ्था, अनिल लगड,शक्तीराज सिंग,गणेश चव्हाण,अमोल सावंत,सेनेचे राहुल ,अकिल मानियार, नितीन बनसोडे, मच्छिंद्र शिंदे, सुनील डुकरे आदींसह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment