श्रीरामपूर : तालुक्यातील प्रशासन नागरिकांसाठी आहे की, लोकांच्या जीवनाशी खेळणा-यांसाठी. असा प्रश्न पढेगाव येथील पडोळे कुटुंबाच्या व्यथेमुळे समोर आला आहे. शासन नियमानुसार लोकवस्ती पासून ५०० फूट अंतर सोडून, कुकुट पालनाचा व्यवसाय करण्याचा नियम असतांना देखील, तालुका तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या परवानगी न घेता. पडोळे यांच्या घरापासून १५० फुटावर कोंडीराम उंडे यांनी सुरू केलेल्या, कुकुट पालन शेड उभारल्यामुळे, २०२२ साला पासून पडोळे कुटुंबाला जीवन जगणे अवघड झाले असून. पोल्ट्री फॉर्ममुळे पडोळे यांच्या घरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्यांच्या घरात दुर्गंधी तसेच माशांचे साम्राज्य निर्माण झाल्याने. पडोळे कुटुंबातील सदस्यांना वारंवार उलटी,ताप,मळमळ यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. ३ वर्षांपासून होत असलेल्या शारिरीक,मानसिक त्रासाला कंटाळून, स्थानिक तसेच जिल्हा आरोग्य विभागास तक्रार करून देखील अद्याप कोणताही कारवाई न. झाल्याने,पडोळे कुटुंबियांचे आयुष्य जगणे कठीण झाले असून. प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
Post a Comment