बेलापूरात भगवान महावीर जयंती मोठ्या उत्सहात साजरी
बेलापुर (प्रतिनिधी )-जगाला अहींसा व शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती बेलापुरात मोठ्या उत्सहात संपन्न झाली भगवान महावीरांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली जैन बांधव मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते जैन स्थानकापासून मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली बेलापुरच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला मिरवणूक जैन स्थानकात आल्यानंतर जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके आदिंनी सर्वांना भगवान महावीर जयंती निमित्त मनोगत व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या तालुक्याचे आमदार लहु कानडे तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक यांनीही जैन स्थानकात जावुन भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पुजन करुन जगाला मानवतेचा संदेश देणारे भगवान महावीरांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले या वेळी मा.जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले भास्कर बंगाळ पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा प्रकाश कुऱ्हे दत्ता कुऱ्हे सुवालाल लुंक्कड शांतीलाल हिरण सचिन कोठारी प्रविण बाठीया अभिजित राका सुभाष बोरा अमीत लुक्कड अतिश देसर्डा विजय कोठारी विजय कटारीया संजया बाठीया योगेश कोठारी सांतोष ताथेड मनिष मुथा संदीप देसर्डा शितल गंगवाल आदि उपस्थितीत होते
Post a Comment