महाराष्ट्र पोलिस मेगासिटी निवडणुकीत जागृती पॅनेल विजयी
दि.११/१२/२०२२ रोजी पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, नागपूर व अमरावती या १० शहरांमध्ये मतदान होऊन दि. १३/१२/२०२२ रोजी शिवाजी मराठा हायस्कूल शुक्रवार पेठ पुणे येथे मतमोजणी झाली.
ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती निलम पिंगळे, उपनिबंधक सहकारी संस्था पुणे (२) यांच्या अधिपत्याखाली शांततापूर्वक पार पडली.
यापूर्वी असलेल्या संचालक मंडळाच्या गलथान व मनमानी कारभारामुळे मेगासिटी प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नसून गेल्या १० महिन्यांपासून संस्थेचा कारभार प्रशासकाचे ताब्यात होता. या निवडणुकीत संस्थेच्या जागरूक व समविचारी सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'जागृती' पॅनेलचे सर्व १९ उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले असून विरोधातील क्रांती व सावधान या दोन्ही पॅनलचा दारुण पराभव होऊन सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.अनामत गमावलेल्या पराभूत उमेदवारांमध्ये पुण्यातून नुकतेच बदलून गेलेले वाहतूक पोलिस उपायुक्त श्री राहुल श्रीरामे यांचाही समावेश आहे.
जागृती पॅनेलचे विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१) श्री प्रदीप देशपांडे, विशेष पोलिस महानिरीक्षक (नि)
२) श्री अरविंद पाटील, सहायक पोलिस आयुक्त (नि)
३) श्री राजेन्द्र मोरे, पोलिस उपअधीक्षक (नि)
४) श्री भारतकुमार राणे, पोलिस उपअधीक्षक (नि)
५) श्री सुरेश भामरे, सहायक पोलिस आयुक्त (नि) नाशिक
६) श्री बरकत मुजावर, पोलिस उपअधीक्षक (नि) पुणे
७) श्री नारायण इंगळे, पोलिस उपअधीक्षक, (नि) नाशिक
८) श्री किशोर जगताप, सहायक पोलिस आयुक्त (नि), मुंबई
९ ) श्री सतीश टाक पोलिस निरिक्षक ( नि) औरंगाबाद
१०) श्री अर्जुन गायकवाड पोलिस निरिक्षक (नि) नवी मुंबई ११ ) श्री दत्तात्रय दराडे पोलिस निरिक्षक (नि) मुंबई
१२) श्री पोपटराव आव्हाड, पोलिस निरीक्षक, मुंबई
१३) श्री धनंजय कंधारकर, पोलिस निरीक्षक, (नि) मुंबई
१४) श्री सुभाष भालसिंग, सहायक पोलिस उपनिरीक्षक, अहमदनगर
१५) श्री गणेश ठाकरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक (नि) पुणे
१६) श्री प्रल्हाद भोसले, पोलिस उपनिरीक्षक (नि) पुणे
१७) श्री शेळके मनीष बाबुराव, पुणे
१८) सौ.निलम बो-हाडे, पोलिस हवालदार, ठाणे
१९) सौ. वैशाली जगताप, वरिष्ठ लिपीक, पोलिस आयुक्तालय, पुणे.
निवडणूक प्रक्रिया चालू असताना या संस्थेच्या माजी सेक्रेटरी मोहंमद रफी खान यांनी प्रशासकाच्या अनुपस्थितीत संस्थेच्या कार्यालयात येऊन, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून, एक पोते भरुन काही महत्त्वाचे कागदपत्रे व फायली चोरून नेल्यामुळे त्याचे विरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात नुकताच एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या कमिटीच्या सभासदांनी गठित केलेल्या संपूर्ण पॅनेलचा पराभव झाल्यामुळे व संवेदनशील प्रामाणिक सभासदांनी संस्थेच्या कारभारात लक्ष घातल्याने गैरकारभारास जबाबदार असलेल्या जुन्या संचालकांचे आता धाबे दणाणले आहे. प्रकल्पातील एकही इमारत अद्याप पूर्ण झाली नसून संस्थेच्या कारभा-यांनी बिल्डर कंपनीला २७१ कोटी रुपये दिले आहेत, तरी एकाही सदस्याला घर मिळालेले नाही याबद्दल जबाबदार असलेल्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची भावना विजयी पॅनेलचे प्रवक्ते श्री अरविंद पाटील यांनी व्यक्त केली.