लग्न पत्रीकेचा फ्लेक्स लावून मेहेत्रे परीवाराकडून लग्नाचे जाहीर निमंत्रण
बेलापुर (प्रतिनिधी )-गावातील सामाजिक राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रात सतत अघाडीवर असणाऱ्या विलास मेहेत्रे यांनी उद्या होणाऱ्या आपल्या मुलांच्या विवाह सामरंभास उपस्थित राहण्यासाठी एकच लग्नपत्रीका तयार करुन बेलापुर गाव व पंचक्रोशितील सर्वांनाच उपस्थित राहण्याचे अवाहन केले आहे. पुर्वी लग्न म्हटले की लग्न पत्रीका छापुन घरोघर वाटण्याची प्रथा होती काल परत्वे मोबाईल आले मोबाईल वर निमंत्रण देण्याची प्रथा सुरु झाली मग व्हाटस्अप द्वारे निमंत्रण सुरु झाले पण आजही अनेकाकडे अँन्डाँइड मोबाईल नाही मग त्यांना निमंत्रण कसे जाईल गावातील सर्वच जण परिचीत आहे मग कसे निमंत्रण द्यावयाचे हा विचार चालु असतानाच इतर निवड वाढदिवस याचे फ्लेक्स लावतो मग आपण लग्न पत्रिकाचा फ्लेक्स करुन गाव व परिसरातील सर्वांनाच निमंत्रण देवु या उद्देशाने विलास मेहेत्रे यांनी लग्न पत्रीकेचा मोठा फ्लेक्स तयार करुन तो बेलापुरातील चौकात लावला बेलापुर गावात सावता फुल भांडारचे मालक व सर्वच क्षेत्रात कायम अघाडीवर असणारे विशेष करुन धार्मिक क्षेत्रात कायम अग्रभागी असणारे विलास मेहेत्रे याचा मुलगा विशाल याचा शुभविवाह भाऊसाहेब जेजुरकर यांची कन्या चि सौ का सीमा हीच्याशी उद्या उत्सव मंगल कार्यालयात संपन्न होत आहे त्या निमित्त सारा गाव व परिसर सुपरिचित असल्यामुळे मेहेत्रे परीवाराने लग्न पत्रीकेचा फ्लेक्स तयार करुन तो मुख्य चौकात लावला व लग्न पत्रीकेचा फ्लेक्स लावुन जाहीर निमंत्रण देण्याचा पहीला मान मिळवीला
Post a Comment