विशेषत:पोस्टाच्या मुख्य काउंटरच्या खिडकी क्रमांक दोन वरील सेवेबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
काल गुरुवारी या खिडकीवर आपली कामे घेऊन आलेल्या नागरिकांना सुमारे तीन तास ताटकळावे लागले. साडेबारा वाजता लाईन मध्ये लागलेल्या लोकांना एक वाजता जेवणाची सुट्टी झाली म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सांगितले. बरेच वेळ उभे असलेल्या नागरिकांनी त्यांना विनंती केली तरी त्यांनी आता माझी जेवणाची सुट्टी झाली आहे,एक वाजून गेला आहे. तुम्ही दोन वाजता या असे सांगून काम बंद केले. शहराच्या इतर भागातून व लांबवरच्या भागातून आलेले नागरिक त्याच ठिकाणी थांबले.दोन वाजता तेथे मोठी रांग लागली.परंतु अडीच वाजेपर्यंत संबंधित कर्मचारी जागेवर आले नव्हते.याबाबत नागरिकांनी काउंटरचे फोटो सुद्धा काढले आहेत. काही नागरिकांनी शेजारील कर्मचाऱ्यांना याबाबत तक्रार कुठे करावी अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी सुद्धा उत्तर देण्याचे टाळले. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर आतून एक कर्मचारी त्या ठिकाणी आला व संबंधित कर्मचारी आजारी पडला आहे आता व्यवस्था करतो असे सांगितले. त्यानंतर नवीन कर्मचाऱ्याकडे या खिडकीचा चार्ज देण्यात आला. त्यांनी मागील चार्ज घेण्यामध्ये अर्धा तास घालवला.त्यानंतर काम सुरू झाले.
दोन नंबरच्या खिडकीवर जनतेशी संबंधित सर्व कामांचे एकत्रीकरण करण्यात आल्याचे दिसून आले. रजिस्ट्रेशन पार्सल, मनीऑर्डर, तिकीट विक्री,पी एल आय या सर्वांशी संबंधित कामे या एकाच कर्मचाऱ्याकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे या खिडकीवर मोठी गर्दी होत असते. अशावेळी दुसरी खिडकी चालू करणे आवश्यक आहे. परंतु एक नंबरची खिडकी सदैव बंद असते. लोकांनी मागणी करूनही त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली नाही. पोस्टाचे इतर खिडक्यांवरील कर्मचारी मात्र वेळेवर आपले कामकाज करताना दिसून आले.काही कर्मचारी टेबलावर कोणतेही काम नसताना मोबाईल पाण्यात दंग असल्याचे दिसले अशावेळी त्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी आपले योगदान देणे अपेक्षित होते. सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कामकाजासाठी, माहिती अधिकाराच्या पत्रव्यवहारासाठी किंवा वर्तमानपत्राच्या कामासाठी पोस्टानेच पत्र व्यवहार करणे भाग आहे.कुरिअर सेवा चांगली असली तरी कायदेशीर अडचणीमुळे काही पत्रव्यवहार हा पोस्टानेच करावा लागतो.अशावेळी रजिस्टर पत्रे पाठवण्यासाठी या खिडकीवर मोठी गर्दी असते. तिकीट विक्रीची व्यवस्था सुद्धा याच ठिकाणी असल्याने एक रुपयाचे तिकीट घेण्यासाठी एक तास रांगेत उभे राहावे लागते असा अनुभव नेहमी येतो. त्यामुळे रजिस्टर पार्सल साठी स्वतंत्र खिडकी असावी तसेच तिकीट विक्री, मनीऑर्डर व इतर कामासाठी स्वतंत्र खिडकी असावी अशी नागरिकांची मागणी आहे. पोस्टाच्या अशा या जलतान कारभारामुळे लोकांनी पोस्टाच्या सेवेकडे पाठ फिरवली आहे.परंतु नाईलाजाने काही गोष्टींसाठी पोस्टातच जावे लागते. श्रीरामपूर पोस्ट ऑफिस ची एक वेगळी ओळख राज्यात नव्हे देशात आहे. परंतु सध्या येथील पोस्टमास्तरच्या गलथान कारभारामुळे पोस्टाची सेवा बदनाम झाली आहे. तेव्हा या ठिकाणी कार्यक्षम अशा पोस्टमास्तरची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
Post a Comment