स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३ गावठी कट्टे,३जिवंत काडतुसांसह ५ आरोपी जेरबंद.
अहमदनगर प्रतिनिधी- जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारा विरोधात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेने,एकाच आठवड्यात दुसरी कारवाई करत.३ गावठी कट्टे, ३ जिवंत काडतुसांसह ५ सराईत आरोपींना गजाआड केले आहे. ज्यात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे,कोल्हार बुद्रुक येथील राजवाडा गौतमनगर परिसरात सापळा रचून. बेकायदेशीर रित्या विक्रीच्या उद्देशाने आणलेल्या, दुर्गेश बापु शिंदे वय वर्ष ३५,रा. सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं.७, श्रीरामपूर, हारुण ऊर्फ राजु रशिद शेख, वय वर्ष ३१, रा.अहिल्यादेवी नगर, वॉर्ड नं.२, श्रीरामपूर, अश्पाक ऊर्फ मुन्ना रफिक पटेल, वय वर्ष २१, रा. बेलापुर रोड, शहानगर, कोल्हार ब्रुद्रुक, प्रसन्न विलास लोखंडे, वय वर्ष ३२, रा. गौतमनगर, राजवाडा, कोल्हार बुा, तालुका राहाता, सदानंद राजेंद्र मनतोडे, वय वर्ष २७, राहणार शिबलापुर, तालुका संगमनेर अशा ५ जणांना ताब्यात घेतले असून. आरोपीं विरोधात लोणी पोलीस ठाण्यात,आर्म ऍ़क्ट ३/२५, ७ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून. या प्रकारणाचा पुढील तपास लोणी पोलीस करत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक,श्रीमती. स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिक्षक, संजय सातव, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली,सहाय्यक फौजदारी मनोहर शेजवळ, भाऊसाहेब काळे,पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, दिलीप शिंदे, राहुल सोळुंके, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव,संभाजी कोतकर व भरत बुधवंत आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
Post a Comment