Latest Post

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- समिंद्रा फौंडेशन महाराष्ट्र राज्य याच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य,सायकल गरजु लाभार्थ्यांना कपडे अन्नधान्य तसेच माऊली वृद्धाश्रमाच्या वतीने उबदार कपड्याचे मोफत वितरण माऊली वृद्धाश्रम येथे संपन्न झाले  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भालचंद्र कुलकर्णी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार देविदास देसाई राष्ट्रपती  पुरस्कार विजेते बबनराव तागड भाऊसाहेब वाघमारे रज्जाक पठाण रमाताई भालेराव अशोक दिवे उपस्थित होते या वेळी बोलताना समिंद्रा फौंडेशनचे अध्यक्ष  सदाशिव थोरात म्हणाले की गेल्या दहा वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असुन गोरगरीबांना मोफत कपडे वाटप तसेच जिवनावश्यक वस्तुचे वाटप केले जाते कोरोना काळात अनेकांना या फौंडेशनच्या माध्यमातून  वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करण्यात आले होते महाराष्ट्रात अनेक शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करत आहेत त्या शेतकऱ्यांना आमचे जाहीर अवाहन आहे अडचण आली तरी आत्महत्येचा विचार कधीच करु नका समिंद्रा फौंडेशन तुमच्या पाठीशी आहे तुम्ही केव्हाही हाक द्या परंतु आत्महत्येचा विचार मनात आणू नका समाजात निराधार मुली असतील तर त्यांचा विवाह करण्याची जबाबदारी संमिद्रा फौंडेशन घेईल सर्व सामान्य गोरगरीबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत  समाज सेवेची प्रेरणा मला माझी आई लक्ष्मीबाई थोरात यांच्याकडून मिळाली असल्याचेही थोरात या वेळी म्हणाले या वेळी माऊली वृद्धाश्रमाचे सुभाष वाघुंडे म्हणाले कि अनेक दात्यांनी दाखविलेल्या दातृत्वामुळे कठीण असा हा अनाथ आश्रम चालविणे शक्य होत आहे आपण समाजाकडे सतत मगत असतो परंतु आपणही काही तरी दिले पाहीजे दान केले पाहीजे याच भावनेतुन आज समिंद्रा फौंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गरीब मुलांना शालोपयोगी साहीत्य तसेच गरम उबदार कपडे ब्लँकेट भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे .या वेळी भालचंद्र कुलकर्णी  जेष्ठ पत्रकार देविदास देसाई राष्ट्रपती पुरस्कार विजेते बबनराव तागड शंभुक वसतीगृहाचे अशोक दिवे सर रमाताई भालेराव रज्जाक पठाण भाऊसाहेब वाघमारे स्वाती बागुल आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी समिंद्रा फौंडेशनच्या वतीने तीन हजार कपडे २०० साड्या ९ सायकली ६० अन्नधान्य किट या साहीत्याचे मोफत वाटप करण्यात आले तर ५० विद्यार्थ्यांना वह्या ब्लँकेटचे वाटप करण्यात आले या वेळी बागुल सर श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे ह भ प कृष्णानंद महाराज फौंडेशनचे अध्यक्ष सदाशिवा थोरात यांच्या आई लक्ष्मीबाई थोरात स्वाती बागुल परवीन शहा आदिसह नागरीक उपस्थित  होते कार्याक्रमाचे सूत्रसंचलन शकील बागवान यांनी केले तर सौ कल्पना सुभाष वाघुंडे यांनी आभार मानले

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - येथील एसटी स्टँड शेजारी,नेवासा रोड वरील मुख्य पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांच्या मनमानी व गलथान कारभारामुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. पोस्टातील कर्मचारी आपल्या मर्जीने वागून काम करतात. नागरिकांच्या वेळेचे त्यांना भान देखील राहत नाही.त्यामुळे पोस्टाच्या या गैरकारभाराबद्दल शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून या ठिकाणी सक्षम पोस्ट मास्तरची नियुक्ती करून कर्मचाऱ्यांना व्यवस्थित काम करण्याचे प्रशिक्षण द्यावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

 विशेषत:पोस्टाच्या मुख्य काउंटरच्या खिडकी क्रमांक दोन वरील सेवेबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

काल गुरुवारी या खिडकीवर आपली कामे घेऊन आलेल्या नागरिकांना सुमारे तीन तास ताटकळावे लागले. साडेबारा वाजता लाईन मध्ये लागलेल्या लोकांना एक वाजता जेवणाची सुट्टी झाली म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सांगितले. बरेच वेळ उभे असलेल्या नागरिकांनी त्यांना विनंती केली तरी त्यांनी आता माझी जेवणाची सुट्टी झाली आहे,एक वाजून गेला आहे. तुम्ही दोन वाजता या असे सांगून काम बंद केले. शहराच्या इतर भागातून व लांबवरच्या भागातून आलेले नागरिक त्याच ठिकाणी थांबले.दोन वाजता तेथे मोठी रांग लागली.परंतु अडीच वाजेपर्यंत संबंधित कर्मचारी जागेवर आले नव्हते.याबाबत नागरिकांनी काउंटरचे फोटो सुद्धा काढले आहेत. काही नागरिकांनी शेजारील कर्मचाऱ्यांना याबाबत तक्रार कुठे करावी अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी सुद्धा उत्तर देण्याचे टाळले. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर आतून एक कर्मचारी त्या ठिकाणी आला व संबंधित कर्मचारी आजारी पडला आहे आता व्यवस्था करतो असे सांगितले. त्यानंतर नवीन कर्मचाऱ्याकडे या खिडकीचा चार्ज देण्यात आला. त्यांनी मागील चार्ज घेण्यामध्ये अर्धा तास घालवला.त्यानंतर काम सुरू झाले.

 दोन नंबरच्या खिडकीवर जनतेशी संबंधित सर्व कामांचे एकत्रीकरण करण्यात आल्याचे दिसून आले. रजिस्ट्रेशन पार्सल, मनीऑर्डर, तिकीट विक्री,पी एल आय या सर्वांशी संबंधित कामे या एकाच कर्मचाऱ्याकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे या खिडकीवर मोठी गर्दी होत असते. अशावेळी दुसरी खिडकी चालू करणे आवश्यक आहे. परंतु एक नंबरची खिडकी सदैव बंद असते. लोकांनी मागणी करूनही त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली नाही. पोस्टाचे इतर खिडक्यांवरील कर्मचारी मात्र वेळेवर आपले कामकाज करताना दिसून आले.काही कर्मचारी टेबलावर कोणतेही काम नसताना मोबाईल पाण्यात दंग असल्याचे दिसले अशावेळी त्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी आपले योगदान देणे अपेक्षित होते. सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कामकाजासाठी, माहिती अधिकाराच्या पत्रव्यवहारासाठी किंवा वर्तमानपत्राच्या कामासाठी पोस्टानेच पत्र व्यवहार करणे भाग आहे.कुरिअर सेवा चांगली असली तरी कायदेशीर अडचणीमुळे काही पत्रव्यवहार हा  पोस्टानेच करावा लागतो.अशावेळी रजिस्टर पत्रे पाठवण्यासाठी या खिडकीवर मोठी गर्दी असते. तिकीट विक्रीची व्यवस्था सुद्धा याच ठिकाणी असल्याने एक रुपयाचे तिकीट घेण्यासाठी एक तास रांगेत उभे राहावे लागते असा अनुभव नेहमी येतो. त्यामुळे रजिस्टर पार्सल साठी स्वतंत्र खिडकी असावी तसेच तिकीट विक्री, मनीऑर्डर व इतर कामासाठी स्वतंत्र खिडकी असावी अशी नागरिकांची मागणी आहे. पोस्टाच्या अशा या जलतान कारभारामुळे लोकांनी पोस्टाच्या सेवेकडे पाठ फिरवली आहे.परंतु नाईलाजाने काही गोष्टींसाठी पोस्टातच जावे लागते. श्रीरामपूर पोस्ट ऑफिस ची एक वेगळी ओळख राज्यात नव्हे देशात आहे. परंतु सध्या येथील पोस्टमास्तरच्या गलथान कारभारामुळे पोस्टाची सेवा बदनाम झाली आहे. तेव्हा या ठिकाणी कार्यक्षम अशा पोस्टमास्तरची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी )-गावातील सामाजिक राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रात सतत अघाडीवर असणाऱ्या विलास मेहेत्रे यांनी उद्या होणाऱ्या  आपल्या मुलांच्या विवाह सामरंभास उपस्थित राहण्यासाठी एकच लग्नपत्रीका तयार करुन बेलापुर गाव व पंचक्रोशितील सर्वांनाच उपस्थित राहण्याचे अवाहन केले आहे.               पुर्वी लग्न म्हटले की लग्न पत्रीका छापुन घरोघर वाटण्याची प्रथा होती काल परत्वे मोबाईल आले मोबाईल वर निमंत्रण देण्याची प्रथा सुरु झाली मग व्हाटस्अप द्वारे निमंत्रण सुरु झाले पण आजही अनेकाकडे अँन्डाँइड मोबाईल नाही मग त्यांना निमंत्रण कसे जाईल गावातील सर्वच जण परिचीत आहे मग कसे निमंत्रण द्यावयाचे हा विचार चालु असतानाच इतर निवड वाढदिवस याचे फ्लेक्स लावतो मग आपण लग्न पत्रिकाचा फ्लेक्स करुन गाव व परिसरातील सर्वांनाच निमंत्रण देवु या उद्देशाने विलास मेहेत्रे यांनी लग्न पत्रीकेचा मोठा फ्लेक्स तयार करुन तो बेलापुरातील चौकात लावला बेलापुर गावात सावता फुल भांडारचे मालक व सर्वच क्षेत्रात कायम अघाडीवर असणारे विशेष करुन धार्मिक क्षेत्रात कायम अग्रभागी असणारे विलास मेहेत्रे याचा मुलगा विशाल याचा शुभविवाह भाऊसाहेब जेजुरकर यांची कन्या चि सौ का सीमा हीच्याशी  उद्या उत्सव मंगल कार्यालयात संपन्न होत आहे त्या निमित्त सारा गाव व परिसर सुपरिचित असल्यामुळे मेहेत्रे परीवाराने लग्न पत्रीकेचा फ्लेक्स तयार करुन तो मुख्य चौकात लावला व लग्न पत्रीकेचा फ्लेक्स लावुन जाहीर निमंत्रण देण्याचा पहीला मान मिळवीला

बेलापुर (प्रतिनिधी  )-येथील जिल्हा परीषद मराठी मुलींच्या शाळेला गँलेक्सी लँबोरेटरीज प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या सहकार्याने तीन एलईडी संच व एक कलर प्रिंटर असा सुमारे एक लाख रुपये किमतीच्या वस्तू भेट स्वरुपात देण्यात आल्या         गँलेक्सी लँबोरेटरीज प्रायव्हेट लिमीटेड  नेवासा यांच्या वतीने सीएसआर फंडातुन  मिशन आपुलकी अंतर्गत बेलापुर येथील मराठी मुलींच्या शाळेला सुमारे एक लाख रुपये किमतीच्या तीन एलईडी संच व एक कलर प्रिंटर भेट देण्यात आला या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी गँलेक्सी लँबोरेटरी प्राईव्हेट लिमिटेड यां कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत देशमुख यांना धन्यवाद दिले असुन आपल्या व्यवसायातून मिळविलेल्या नफ्याचा काही भाग आपण समाज कार्यासाठी खर्च करता या बद्दल धन्यवाद व्यक्त केले या वेळी पत्रकार देविदास देसाई कंपनीचे मँनेंजर अनिल भोसले

यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी शाळा व्यवस्थापन समीतीचा अध्यक्ष अजीज शेख सुर्यकांत हुडे मुख्याध्यापक लता बनसोडे विजया दहीवाळ शितल गायकवाड लता परदेशी  राजेंद्र पंडीत देविदास कल्हापुरे हर्षदा पुजारी सुनिता सोर तरन्नुम खान राजाबाई कांबळे प्रदीप दळवी सौ उज्वला कुताळ शालेय व्यवस्थापन समीतीच्या उपाध्यक्षा सरीता मोकाशी आनिल मोकाशी आदीसह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेखा सोनवणे यांनी केले तर अजीज शेख यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर बस स्थानकाची भिंत अज्ञात इसमाने तोडली असुन संबधीतावर कारवाई करण्याची मागणी बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने एस टी महामंडळाकडे करण्यात आली असुन महामंडळाच्या अधीकाऱ्यांनी देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेवुन घटनास्थळी भेट देवुन गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत      कायम गजबजलेले असलेल्या बेलापुर बस स्थानकाची मागील बाजुस भिंतीस बसवीलेली खिडकी काही दिवसापूर्वी कुणीतरी तोडली होती त्यावर काहीच कारवाई न झाल्यावर काल रात्री कुणीतरी खोडसाळपणे भिंतीलाच मोठे भगदाड पाडले आहे ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या कानावर ही बाब घातली पत्रकार देविदास देसाई यांनी तातडीने आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांच्या कानावर ही बाब घातली श्रीरामपुर बस स्थानकाचे आगार प्रमुख राकेश शिवदे हे तातडीने बेलापुर येथे आले त्यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा यांच्या समवेत संबधीत ठिकाणी भेट दिली त्या वेळी अज्ञात इसमाने ही भिंत तोडली असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याच्या सूचना दिल्या या वेळी बसं स्थानकाचे कार्यालय कित्येक दिवसापासून बंद असल्याचे पत्रकार देसाई यांनी निदर्शनास आणून दिले असता लगेच या ठिकाणी कर्मचारी नियुक्त केला जाईल असे अश्वासन त्यांनी दिले तसेच तोडलेली भिंत तातडीने पुन्हा पूर्ववत केली जाईल या करीता ग्रामपंचायतीने सहकार्य करावे असे अवाहनही शिवदे यांनी केले त्या वेळी सरपंच व उपसरपंच यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन दिले गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात महीलाकरीता स्वच्छता गृहाची मागणी असुन निधीची देखील तरतुद केलेली असताना आपल्याकडून मंजुरी मिळाली नसल्याची बाब उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आगार प्रमुख शिवदे यांच्या निदर्शनास आणून दिली असता प्रस्ताव पाठविलेला आहे मंजुरी मिळताच आपणास कळवीण्यात येईल असेही शिवदे यांनी सांगितले या वेळी स्थानक प्रमुख वसंत लटपटे प्रवासी मित्र प्रतिक बोरावके सुरक्षा रक्षक प्रकाश मुठे प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड विलास कुऱ्हे  आदि उपस्थित होते

श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांना साहित्यिक रज्जाकभाई शेख (सर) आणि टीम संचलित दोस्ती फाऊंडेशन अहमदनगर यांच्यावतीने दिला जाणारा लोककलावंत पै. मजनूभाई शेख राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२२ या राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.लोककलावंत पै.मजनूभाई शेख यांच्या प्रथम स्मृती गौरव पुरस्कार सोहळ्यात श्रीरामपूर येथे दोस्ती फाऊंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात पत्रकार शौकतभाई शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ.एस.एन.पठाण (कुलगुरू नागपूर विद्यापीठ तथा उच्च शिक्षण संचालक (म.रा.), कार्यक्रमाचे उदघाटक  मा. बाबासाहेब सौदागर (चित्रपट गीतकार,सिनेअभिनेते), मा. वसुंधरा शर्मा (सिनेअभिनेत्री, नाट्यकर्मी), मा.डॉ.वंदनाताई मुरकुटे (साहित्यिका तथा सभापती पं.स. श्रीरामपूर), रमजानखान पठाण (उपशिक्षणाधिकारी),रामदास वाघमारे (मुख्य संपादक जीवन गौरव), रज्जाकभाई शेख अध्यक्ष दोस्ती फाऊंडेशन,सुभाष सोनवणे,प्राचार्या डॉ.गुंफाताई कोकाटे,सुनील गोसावी (संस्थापक शब्दगंध) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.श्री.शेख यांना मिळालेल्या या पुरस्काराबाबत त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छापर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,श्री.शौकतभाई शेख यांचे सामाजिक क्षेत्रासह पत्रकारीता क्षेत्रातही निस्पृह तथा उल्लेखनीय कार्य आहेत,राजकारण विरहित सर्वधर्मिय सेवाभावी संस्था असलेल्या समता फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आजवर जनसामान्यांबरोबर उपेक्षित घटकांतील दुर्लक्षितांकरीता विविध सामाजाभिमुख उपक्रम राबवून आपल्या निर्पेक्ष समाजसेवेचा ठसा उमटविला आहे,तसेच आपल्या सामाजाभिमुख पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक,शासकीय, प्रशासकीय, निमशासकीय, राजकिय आदि अशा विविध क्षेत्रातील बातम्या करताना त्यांनी सातत्याने नेहमी सत्य आणि पारदर्शी भुमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे व करत आहे, सोबतच स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश) या त्यांच्या पत्रकार/संपादकांच्या नोंदणीकृत सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील नवोदित पत्रकार, संपादकांना वर्तमानपत्र क्षेत्रातील शासकीय स्थरावरील येणाऱ्या विविध आडचणींना मार्ग काढत त्यावर यशस्वीरित्या मात करण्याकामी नेहमी सातत्याने मोलाचे व महत्वाचे मार्गदर्शन असते.त्यांच्या या संपादक संघात राज्यभरातील विविध जिल्ह्यात असलेल्या सदस्यांद्वारे आज विविध वर्तमानपत्र तथा इतर प्रसार माध्यमे मोठ्या दिमाखात नियमीतपणे प्रकाशित होत आहेत.सदैव मनमिळाऊपणा आणि मितभाषी असे हस्तमुख व्यक्तीमत्व असलेले शौकतभाई शेख यांना सर्वत्रच मोठ्या आदराने व सन्मानाने शौकतभाई शेख या नावानेच ओळखले तथा संबोधले जाते.अशी त्यांनी आपल्या कार्यगुणांच्या बळावर ख्याती प्राप्त केलेली आहे.कुठलाही भेद भाव,जाती -पाती,पंथ यापलिकडे जाऊन त्यांचा सर्वच जाती - धर्म, पंथात मोठा मित्र परिवार जोडला गेला असल्याने सर्वांशी त्यांचे प्रेम, स्नेह,आपुलकी आणि सलोख्याचे तथा जिव्हाळ्याचे संबध प्रास्तापित झालेले आहे,चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य,ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन,तथा महाराष्ट्रियन मुस्लिम विकास परीषद या संस्थेचे ते अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख देखील आहेत.आपल्या पत्रकारीतासोबतच  विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून त्यांचे निस्पृह सामाजाभिमुख समाजिक कार्य हे सातत्याने चालतच असतात आणि अशाच या त्यांच्या विविध कार्यांची दखल घेऊन दोस्ती फाऊंडेशनच्यावतीने त्यांना *राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार* देऊन जो त्यांचा सन्मान करण्यात आला ही खरोखरच शौकतभाईंना ही त्यांच्या कार्याची मिळालेली एक पावतीच असल्याचे अनेकांनी बोलून देखील दाखवले आहे.

श्रीरामपूर  प्रतिनिधी-  Dysp संदीप मिटके यांना घारगाव परिसरातील घाटात पोखरी शिवारात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने  वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली.  त्यावरून नाशिक ते पुणे जाणारे हायवे  परिसरातील घाटात पोखरी शिवारात  बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन दोन  परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. 

          एका महिला आरोपी विरुद्ध  घारगाव पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. 406/2022 कलम महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या कारवाईमुळे  टाकसेवाडी, पोखरी बाळेश्वर परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. 

सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला  पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI अरुण आव्हाड,   𝙰𝚙𝚒 ज्ञानेश्वर  थोरात,चा. पो. ना. मनोज पाटील पो.कॉ नितीन शिरसाठ म.पो.कॉ. मंगल जाधव यांनी केली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget