पत्रकार शौकतभाई शेख राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्काराने सन्मानित

श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांना साहित्यिक रज्जाकभाई शेख (सर) आणि टीम संचलित दोस्ती फाऊंडेशन अहमदनगर यांच्यावतीने दिला जाणारा लोककलावंत पै. मजनूभाई शेख राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२२ या राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.लोककलावंत पै.मजनूभाई शेख यांच्या प्रथम स्मृती गौरव पुरस्कार सोहळ्यात श्रीरामपूर येथे दोस्ती फाऊंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात पत्रकार शौकतभाई शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ.एस.एन.पठाण (कुलगुरू नागपूर विद्यापीठ तथा उच्च शिक्षण संचालक (म.रा.), कार्यक्रमाचे उदघाटक  मा. बाबासाहेब सौदागर (चित्रपट गीतकार,सिनेअभिनेते), मा. वसुंधरा शर्मा (सिनेअभिनेत्री, नाट्यकर्मी), मा.डॉ.वंदनाताई मुरकुटे (साहित्यिका तथा सभापती पं.स. श्रीरामपूर), रमजानखान पठाण (उपशिक्षणाधिकारी),रामदास वाघमारे (मुख्य संपादक जीवन गौरव), रज्जाकभाई शेख अध्यक्ष दोस्ती फाऊंडेशन,सुभाष सोनवणे,प्राचार्या डॉ.गुंफाताई कोकाटे,सुनील गोसावी (संस्थापक शब्दगंध) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.श्री.शेख यांना मिळालेल्या या पुरस्काराबाबत त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छापर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,श्री.शौकतभाई शेख यांचे सामाजिक क्षेत्रासह पत्रकारीता क्षेत्रातही निस्पृह तथा उल्लेखनीय कार्य आहेत,राजकारण विरहित सर्वधर्मिय सेवाभावी संस्था असलेल्या समता फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आजवर जनसामान्यांबरोबर उपेक्षित घटकांतील दुर्लक्षितांकरीता विविध सामाजाभिमुख उपक्रम राबवून आपल्या निर्पेक्ष समाजसेवेचा ठसा उमटविला आहे,तसेच आपल्या सामाजाभिमुख पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक,शासकीय, प्रशासकीय, निमशासकीय, राजकिय आदि अशा विविध क्षेत्रातील बातम्या करताना त्यांनी सातत्याने नेहमी सत्य आणि पारदर्शी भुमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे व करत आहे, सोबतच स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश) या त्यांच्या पत्रकार/संपादकांच्या नोंदणीकृत सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील नवोदित पत्रकार, संपादकांना वर्तमानपत्र क्षेत्रातील शासकीय स्थरावरील येणाऱ्या विविध आडचणींना मार्ग काढत त्यावर यशस्वीरित्या मात करण्याकामी नेहमी सातत्याने मोलाचे व महत्वाचे मार्गदर्शन असते.त्यांच्या या संपादक संघात राज्यभरातील विविध जिल्ह्यात असलेल्या सदस्यांद्वारे आज विविध वर्तमानपत्र तथा इतर प्रसार माध्यमे मोठ्या दिमाखात नियमीतपणे प्रकाशित होत आहेत.सदैव मनमिळाऊपणा आणि मितभाषी असे हस्तमुख व्यक्तीमत्व असलेले शौकतभाई शेख यांना सर्वत्रच मोठ्या आदराने व सन्मानाने शौकतभाई शेख या नावानेच ओळखले तथा संबोधले जाते.अशी त्यांनी आपल्या कार्यगुणांच्या बळावर ख्याती प्राप्त केलेली आहे.कुठलाही भेद भाव,जाती -पाती,पंथ यापलिकडे जाऊन त्यांचा सर्वच जाती - धर्म, पंथात मोठा मित्र परिवार जोडला गेला असल्याने सर्वांशी त्यांचे प्रेम, स्नेह,आपुलकी आणि सलोख्याचे तथा जिव्हाळ्याचे संबध प्रास्तापित झालेले आहे,चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य,ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन,तथा महाराष्ट्रियन मुस्लिम विकास परीषद या संस्थेचे ते अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख देखील आहेत.आपल्या पत्रकारीतासोबतच  विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून त्यांचे निस्पृह सामाजाभिमुख समाजिक कार्य हे सातत्याने चालतच असतात आणि अशाच या त्यांच्या विविध कार्यांची दखल घेऊन दोस्ती फाऊंडेशनच्यावतीने त्यांना *राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार* देऊन जो त्यांचा सन्मान करण्यात आला ही खरोखरच शौकतभाईंना ही त्यांच्या कार्याची मिळालेली एक पावतीच असल्याचे अनेकांनी बोलून देखील दाखवले आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget