
अहमदनगर प्रतिनिधी-अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करत आसतानापोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, कोल्हार बु, ता. राहाता येथे दोन इसम गावठी कट्टे व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी घेवुन येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/दिनकर मुंडे, पोसई/सोपान गोरे, सफौ/भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ, पोहेकॉ/विजय वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, रवि सोनटक्के, लक्ष्मण खोकले, संदीप दरदंले, पोकॉ/रणजीत जाधव व चापोना/भरत बुधवंत यांनी मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने गोसावी वस्ती, कोल्हार बुा, ता. राहाता येथील एका पत्र्याचे शेड जवळ सापळा लावुन थांबलेले असतांना दोन इसम पत्र्याचे शेडमध्ये बसलेले दिसले. बातमीतील वर्णना प्रमाणे संशयीत इसम असल्याची पथकाची खात्री होताच संशयीतांना ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना ते पळुन जावु लागले यावेळी पथकातील अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले
त्याचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्याचे नावे 1) रविंद्र भाऊसाहेब थोरात वय 30, रा. कुरणपुर, ता. श्रीरामपूर व 2) बाळासाहेब भिमराज थोरात वय 59, रा. कोल्हार बुा, ता. राहाता असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेता अंगझडतीमध्ये 3 गावठी बनावटीचे कट्टे व 6 जिवंत काडतूस मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील दोन्ही इसमांकडे गावठीकट्टे व काडतुस बाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईन तपास केला असता त्यांनी सदर गावठीकट्टे व जिवंत काडतुस हे विक्री करीता आणल्याचे सांगितले.ताब्यातील आरोपींकडे 3 गावठी कट्टे व 6 जिवंत काडतूस असा एकुण 91800/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर बाबत पोकॉ/2514 रणजीत पोपट जाधव ने. स्थागुशा, अहमदनगर यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. 608/2022 आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील कायदेशिर कार्यवाही लोणी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. संजय सातव साहेब, उविपोअ शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.