पोलीस बंदोबस्तात पालिकेची, संगमनेर वर अतिक्रमण विरोधी मोहिम.
श्रीरामपूर : शहरातील संगमनेर रस्त्यावर मागील काही आठवड्यांपूर्वी, रस्त्यावरील अतिक्रमनामुळे झालेल्या अपघातात. एका २१ वर्षीय फोटोग्राफी करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सदर घटनेनंतर, वाढलेल्या अतिक्रमणा विरोधात, जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याने. श्रीरामपूर पालिकेच्या वतीने, श्रीरामपूर - संगमनेर रस्त्यावरील अतिक्रमणा विरोधात. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. ज्यात नॉर्दन ब्रँच पासून, पालिका हद्दीतील संगमनेर नाक्या पर्यंत, वाहतुकीस अडथळा निर्माण होणारी अतिक्रमणे जमिनध्वस्त केली. सदरची अतिक्रमणे काढत असतांना, काही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमण काढून घेत. प्रशासनास सहकार्य केले. शहरातील संगमनेर रस्त्यावरील अतिक्रमण मोहीम, पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशावरून, पालिकेचे अतिक्रमण विभागाचे संजय शेळके, इंजिनिअर अनंत शेळके, बांधकाम विभागाचे राम सरगर ,नगर पालिकेचे कर्मचारी व शहर पोलीस ठाण्याचे, पोलीस नाईक शरद वांढेकर,सचिन बैसने, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड आदींच्या उपस्थितीत अतिक्रमणाच्या पहिल्या टप्प्यातील, अतिक्रमण काढण्यात आले.
Post a Comment