श्रीरामपूर शहर व तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद व्हावे; याकरीता समाजवादीचे साखळी उपोषण
या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, शहर व तालुक्यातील सर्वच अवैध व्यवसाय बंद व्हावे या मागणीसाठी आम्ही श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला दि. १०/११/२०२२ रोजी लेखी निवेदन नोंदवूनही संबंधित पोलिस प्रशासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे गुटखा,मटका , पत्त्यांचे क्लब,सोरट वगैरे असे विविध प्रकारचे सर्वच अवैध व्यवसाय हे सर्रासपणे खुलेआम सुरुच असल्यामुळे नाईलाजाने सोमवार दिनांक ०५ / १२ / २०२२ पासून येथील मेनरोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.तसेच यापासून उद्भवणाऱ्या बऱ्या व वाईट परिणामास संबंधित प्रशासनच जबाबदार राहील असेही श्री.जमादार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.या निवेदनाच्या प्रति.पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, मा.जिल्हाधिकारी अहमदनगर,जिल्हा पोलीस प्रमुख अहमदनगर,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर, पोलीस निरीक्षक,श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस स्टेशन, मुख्याधिकारी,श्रीरामपूर न.पा. श्रीरामपूर आदिंना पाठविण्यात आल्या आहेत.