Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-गौरव डेंगळे ऑकलॅण्ड (न्युझीलँड): राष्ट्रकुल पावर लिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने ऑकलँड न्यूझीलंड येथे राष्ट्रकुल पावरलिफ्टिंग स्पर्धा दिनांक २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान सुरू आहे.या स्पर्धेत ९३ किलो वजन गटात श्रीरामपूरचे प्रा सुभाष देशमुख यांनी ऐतिहासिक कामगिरी करत १६७.५ किलो वजन उचलून देशासाठी सुवर्णपदक पटकावले आहे.९३ किलो वजन गटात इंग्लंड,कॅनडा,पाकिस्तान,श्रीलंका दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड,बांगलादेश,आयर्लंड,ऑस्ट्रेलिया या देशातून ११ स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करताना प्रा देशमुख यांनी सुवर्णपदक पटकावले. न्यूझीलंडच्या खेळाडूला रोप्यपदक तर कॅनडाच्या खेळाडूला कांस्यपदक मिळाले. देशासाठी सुवर्णपदक मिळवायचे ही माझ्या वडिलांची इच्छा होती.आज मी वयाच्या ५७ व्या वर्षीशी मी ती पूर्ण केली असे प्रा देशमुख यांनी राष्ट्रकुल पावरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

अहमदनगर प्रतिनिधी-  पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एक मोठी कारवाई केली असून. ज्यात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे. नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई फाटा येथे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून. कमानी जवळ उभा असलेल्या, शुभम सुभाष सरोदे या २२ वर्षीय राहुरी येथील इसमास ताब्यात घेऊन झडती घेतली असता. त्याच्या जवळून, २ गावठी कट्टे, १ सिंगल बोर गावठी रिव्हॉल्वर व ५ जिवंत काडतुसे, असा ८६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीची विचारपूस केली असता. आरोपीने जप्त करण्यात आलेले घातक शस्त्र, बेकायदशिररित्या स्वत: तयार करुन विक्रीच्या उद्देशाने आल्याची माहिती समोर आल्याने. आरोपी विरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सुचणा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, फकिर शेख, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले व भरत बुधवंत आदींच्या पथकाने यशस्वी रित्या पारपडली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -  नगरपालिका शिक्षण मंडळामध्ये सध्या निवृत्तीचा ओघ लागला असून दर महिन्याला एक एक मोहरा निवृत्त होत आहे. एकीकडे चांगलं काम करणारे शिक्षक निवृत्त होत असतांना दुसरीकडे नवीन शिक्षक भरती होत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.यासाठी निवृत्त होणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींनी आमच्या शाळांमध्ये येऊन बाल गोपालांना ज्ञानदान करून सहकार्य करावे व बालगोपालांचे आशीर्वाद घ्यावेत. कारण सेवानिवृत्तांची संख्या वाढत असल्याने शालेय कामकाज चालवणे अवघड झाले आहे.आपली संपूर्ण सेवा ज्या शालेय विद्यार्थ्यांमुळे या ठिकाणी पूर्ण झाली. त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आपणही सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी केले.येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरपालिका शाळा क्रमांक सहा मधील उपशिक्षिका सौ अरुणा प्रकाश माने(लोखंडे) या आपल्या छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहे. त्यानिमित्ताने शाळेतर्फे त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री पटारे हे बोलत होते.व्यासपीठावर नगरसेवक संतोष कांबळे,निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी के टी निंभोरे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन लहुजी कोल्हे, सलीमखान पठाण, विद्यमान संचालक बाळासाहेब सरोदे, पेन्शनर संघटनेचे तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार,सुभाष तोरणे, अशोक बागुल,ॲड. रमेश कोळेकर,शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन आदी उपस्थित होते.

सौ अरुणा प्रकाश माने यांनी श्रीरामपुरातच शिक्षण घेऊन त्याच ठिकाणी आपली सेवा पूर्ण केली. नगरपालिकेच्या विविध शाळांमधून त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या. त्यांनी आपल्या सेवा काळात कधीही मुलांना शिक्षा केली नाही किंवा हातात छडी घेतली नाही याचा अनेक मान्यवरांनी आवर्जून उल्लेख केला.यावेळी विद्यार्थीनी सविता मोरे, दीप लोखंडे, मृण्मयी लोखंडे, तसेच पोपटराव वाघचौरे, अजय शिंदे, लता आवटी, मंदाकिनी गायकवाड, सचिन शिंदे आदींनी त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास सर्वश्री. लतीफ शेख, शब्बीर शेख, अशोकराव कानडे, संजय तुपे, सचिन डोळस, सचिन दळवी, मुख्याध्यापिका कृष्णा थोरे, कल्पना गायकवाड, प्रतिभा जयकर, आशाबाई शिंदे, नवनाथ अकोलकर, ताराचंद पगारे,अशोक गायकवाड, हर्षल माने, कल्पेश माने, वर्षा वाकचौरे, अमोल कल्हापुरे, संतोष लोखंडे, मंगेश लोखंडे, शुभांगी माने, सुरेखा डांगे, दिपाली शेळके, दिलावर भाई शेख, गणेश कानडे, विठ्ठल तुपे, नंदू तुपे, विनोद चतुर्भुज, मुख्याध्यापक बाबासाहेब पिलगर, दिगंबर तुपे, शंकरराव डहाळे, राजेंद्र तुपे, धनंजय तुपे, प्रकाश क्षीरसागर, योगेश शिरसागर, सविता मोरे, शरद नागरगोजे, भरत गिरी, संभाजी त्रिभुवन, सुरेश दळवी, गणेश वाकचौरे, सुमित माने, श्रीमंत चव्हाण, अजय धाकतोडे, सतीश खामकर, कांबळे टेलर  आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता मदने यांनी केले तर आभार प्रकाश माने यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन मुसळे, यास्मिन शेख, मनीषा सांगळे, सुनीता हंडाळ, मंदाकिनी गायकवाड, लता आवटी, अनिता बडे, सचिन शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

अहमदनगर- एसपी राकेश ओला यांच्या निर्देशाने जिल्हाभर अवैध व्यवसायावर धडक कारवाई सुरुच असून काल महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 8,000 (आठ हजार) किलो गोमांस, दोन आयशर टेम्पो व एक हुंडाई क्रेटा कार असा एकुण 34,00,000/- (चौस्तीस लाख रु) किंमतीचा मुद्देमाल जामखेड येथुन जप्त केले. स्थानिक गुन्हे शाखा यांनी ही कारवाई केली. धक्कादायक बाब म्हणजे या गोवंश जणावरांचे मांस तस्करीत युपी (उत्तर प्रदेश) चा एक परप्रांतीय आरोपी असून श्रीरामपुर व नगरचे आरोपी आहेत. या बाबात अधिक माहीती अशी की, कर्तव्यदक्ष एसपी राकेश ओला यांनी पोनि अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये पोनि अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/संदीप पवार, अमोल भोईटे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ/विनोद मासाळकर, जालिंदर माने, मयुर गायकवाड व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशांना बोलावुन घेवुन कळविले की, आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे तौफिक कुरेशी, अहमदनगर हा त्याचा हस्तक नामे मुक्तार शेख याचे मार्फत अहमदनगर कडुन जामखेडच्या दिशेने दोन आयशर ट्रक मधुन गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करुन गोमासची विक्री करण्याचे उद्देशाने दोन आयशर टेम्पोमधुन वाहतुक करत आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/ अनिल कटके यांनी लागलीच स्थागुशा पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जामखेड पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे मदतीने दोन पंचाना सोबत घेवुन जामखेड येथे जावुन देशी तडका हॉटेल जवळ रोडवर सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील नमुद दोन आयशर टेम्पो येताना दिसले. टेम्पो चालकास बॅटरीने लाईट दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्याने सदर दोन्ही टेम्पो चालकांनी टेम्पो रस्त्याचे कडेला उभे केले. लागलीच पथकातील अंमलदार यांनी टेम्पो चालकास व त्याचे शेजारी बसलेल्या इसमास ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मुक्तार अब्दुल करीम शेख वय 50, रा. वार्ड नं.2, श्रीरामपूर, 2) अल्तमश फैयाज चौधरी वय 24, रा. नालबंदखुट, अहमदनगर, 3) महेशकुमार जगदेव लोध वय 27, 4) सिराज अहमद कल्लु अन्सारी वय 28, 5) समी अहमद मुर्शरफ खान वय 28, सर्व रा. शंकरपुरमुका, ता. रिसीया, जिल्हा बहरुच, राज्य उत्तर प्रदेश हल्ली रा. अहमदनगर 6) सादीक सत्तार कुरेशी वय 38, रा. खर्डा रोड, जामखेड असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष दोन्ही आयशर टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशी जातीची जनावरांचे गोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे दिसली. त्याचेकडे गोवंश कत्तल व वाहतुकी बाबत विचारपुस करता त्याने सदर गाडीमध्ये भरलेले गोमस हे 7) तौफिक कुरेशी, अहमदनगर यांचे मालकीचे असुन गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करुन टेम्पो मधुन गोमास विक्री करीता 8) शेख अजहर आयुब वय 29, रा. खडकत, ता. आष्टी, जिल्हा बीड यांचेकडे जामखेड येथे पोहच करणेसाठी घेवुन चाललो असल्याची कबुली दिली. त्याचा शोध घेतला असता तो हुंडाई कंपनीचे क्रेटा कारसह पळुन जात असतांना त्याचा शिताफीने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तौफिक कुरेशी, (फरार) अहमदनगर याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- विजेचा शाँक लागुन पंधरा वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू झाला असुन या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे  या बाबत समजलेली माहीती अशी की विशाल भागीनाथ पिटेकर हा पंधरा वर्ष वयाचा मुलगा जे टी एस हायस्कूल येथे इयत्ता नववीत शिकत होता  त्याला अचानक विजेचा शाँक लागला तो लाबं फेकला गेला घरातील नातेवाईकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी विजेची बटन बंद केली व त्यास तातडीने दवाखान्यात हलविले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले बेलापुर येथील अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले  बेलापुर पोलीस स्टेशन समोरील संदीप ढोल पार्टीचे मालक नवनाथ धनवटे यांचा तो नातू होता आई वडीलांची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे नवनाथ धनवटे यांच्याकडे तो शिक्षण घेत होता

श्रीरामपूर - भारतीय संविधान दिन व आम आदमी पार्टी चा वर्धापन दिन च्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्याचे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व हनुमान मंदिर परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

श्रीरामपूर शहरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरलेले असताना  नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन आम आदमी पार्टीच्या वतीने श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यांवरची धुळीची विल्हेवाट लावण्याची विनंती केलेली असून सुद्धा शहरातील वाढत्या रस्त्यावरील माती धुळीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वारंवार सांगून देखील फक्त काम केल्याचा दिखावा करत नगरपालिका प्रशासनाकडून त्यावर कार्यवाही केली जात नसल्याचे लक्षात आल्याने आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर आम आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत श्रीरामपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ आणि हनुमान मंदिर परिसरात समोरील रस्त्यालगत  रस्त्यालगतची स्वच्छता करून तेथील माती, डिव्हायडर मधला कचरा, उचलून त्या ठिकाणी पाणी मारून स्वच्छता केली. या पुढील काळात आम आदमी पार्टीच्या वतीने श्रीरामपुरात स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष डुंगरवाल यांनी व्यक्त केला.यापुढे नगरपालिका प्रशासनाने शहरातील धूळ व कचरा व्यवस्थापनाच्या कामाकडे बारकाईने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन छेडून प्रशासनाला जाग आणण्याचे काम हाती घ्यावी लागेल असा इशारा यावेळी विकास डेंगळे व प्रवीण जमदाडे यांनी दिला. त्यानंतर संविधान दिनाच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे पुष्पहार अर्पण करून  पूजन केले यावेळी जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे ,भरत डेंगळे, जिल्हा प्रवक्ते एडवोकेट प्रवीण जमधडे, मार्गदर्शक श्रीधर कराळे, युवा चे अक्षय कुमावत ,यशवंत जेठे, विकी लोंढे, प्रशांत बागुल, दीपक परदेशी, बी एम पवार, विजय बारसे , दिलीप उबाळे ,राहुल लुक्कड, डॉक्टर प्रवीण राठोड, डॉक्टर सचिन थोरात,सलीम शेख, भैरव शेठ मोरे, आदी उपस्थित होते

प्रतिनिधी-Dysp संदीप मिटके यांना नेवासा फाटा परिसरात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने  वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली.  त्यावरून नेवासा फाटा परिसरात हॉटेल औदुंबर व  हॉटेल नमगंगा या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन पाच  पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे.  त्यानुसार आरोपी १ )विक्रम बाळासाहेब साठे वय 20 रा. जालना २) अमोल नामदेव पैठणे वय २५ रा.मुकिंदपुर यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारस प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला  पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI प्रताप दराडे, PI करे, Api मानिक चौधरीं, API थोरात, psi मोंढे,Asi राजेंद्र आरोळे, HC औटी,पोलीस कॉन्स्टेबल इनामदार,पाखरे, विकास साळवे ,सुहास गायकवाड ,ठोंबरे, कुदळे, गुंजाळ, करंजकर, इनामदार, Lpc  उंदरे व Lpc  जाधव यांनी केली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget