Latest Post

बेलापूर प्रतिनिधी-स्त्री - पुरुष समानता राहावी. याकरिता राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे अनेक महिला उच्च पदस्थांनी बसल्या आहेत. मात्र महिलांवर दबाव आणून, त्यांच्या कामात अडथळे ,तसेच नामधारी करून दुसरेच निर्णय घेत असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार श्रीरामपूर तालुक्यात ५ हजार लोकवस्तीच्या, बेलापूर खुर्द ग्रामपंचातीत समोर आला आहे. महिला सरपंच पदाचे आरक्षण पडल्याने,सौ वर्षा महाडिक ह्या बहुमताने पदस्त झाल्या. परंतु नामधारी सरपंच करून, होत असलेल्या भ्रष्टाचार सहन न झाल्याने. जनतेला दिलेले वाचनासाठी, स्वतः महिला सरपंच सौ महाडिक यांनी,पितळ उघडे केलं आहे.  अनेक वेळा विरोध करूनही, पाऊने ५ लाख रुपये खर्च करून. ग्रामपंचायतिच्या मागील बाजूस बांधण्यात आलेले शौचालायात ना पाण्याची सोय,ना प्रशस्त टाळी, त्यामुळे बंद असवस्थेतीत शौचालयाचा, ग्रामस्थांना वापर करता येत नसल्याने. ग्रामस्थ देखील संताप व्यक्त करीत असून. शौचालय सुरू करा नाहीतर पाडून तरी टाका अशी मागणी करीत आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या,शौचालयाच्या निकृष्ठ कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी. याकरिता महिला सरपंच सौ महाडिक आता, न्यायालयाचा दरवाजा ठोकणार असल्याची माहिती दिली आहे.







.

श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर, जिल्ह्यातील गुन्हेगारी तसेच पोलीस कारवाईचा आढावा घेण्यासाठी. पोलीस अधीक्षक राकेश ओला विविध पोलीस ठाण्यांना भेट दिली. यावेळी श्रीरामपूर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने, पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे स्वागत करण्यात आले. सदरच्या स्वागत कार्यक्रमा प्रसंगी तिरंगा न्यूजचे संपादक अस्लम बिनसाद,एस न्यूज मराठी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक जयेश सावंत, न्यूज सुपर वन चे अभिषेक सोनवणे  उपस्थितीत होते. सदरच्या स्नेह भेटी वेळी झालेल्या चर्चे दरम्यान, श्रीरामपूर येथील जुन्या आठवणींना उजाळा देत. अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी देखील उपस्थित होते.

अहमदनगर प्रतिनिधी-अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांची पुणे मेट्रो प्रकल्पामध्ये बदली झाली. त्यांच्या जागेवर सुहास मापारी यांची नियुक्ती झाली आहे. मापारी यांनी यापूर्वी महसूल उपजिल्हाधिकारी तसेच श्रीरामपूरला प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहे. अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर हे गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होते.यमगर हे पुणे जिल्ह्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यावेळेस त्यांना पुणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली नव्हती. यमगर नगर येथे एक वर्षभर कार्यरत होते. शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची प्रतिमा होती. शेवगाव तालुक्यातील बनावट बिगरशेती प्रकरणाचा तपास केला होता. सुहास मापारी हे नगरला उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली श्रीरामपूरचे प्रांताधिकारी म्हणून झाली. मापारी यांची अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 भागामध्ये असणाऱ्या उत्सव मंगल कार्यालयापुढे पूर्वेला १०० मीटर वर रोड जवळील चर/ओढ्याच्या जवळ असलेल्या विहिरीमध्ये आज शुक्रवारी सकाळी -सकाळी एका महिलेची अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील डेड बॉडी सापडली.येथे फिरायला येणाऱ्या काही नागरिकांना हे प्रेत तरंगतांना दिसले.  त्यानुसार त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना संपर्क केला आहे.यावर्षी पावसाळ्यात प्रचंड पाऊस झाल्यामुळे सर्व विहिरी तुडुंब भरल्या आहेत.ही देखील विहीर तुडुंब भरल्यामुळे विहिरीत विविध प्रकारची घाण ,कचरा गोळा झाला आहे.तरंगलेल्या या कचऱ्यातच ही महिलेची डेड बॉडी आज सकाळी दिसून आली.सदर मयत महिलेचे वय साधारण 40 ते 45 असल्याचे दिसून येत होते.हि महिला नेमकी कोण?या महिलेने आत्महत्या केली ?की हा घातपाताचा प्रकार आहे ? याबाबी लवकरच पोलीस तपासात स्पष्ट होतील.

श्रीरामपूर : विद्यार्थ्यांची शारिरीक व बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी, क्रीडा प्रशिक्षक नितीन बलराज, गौरव डेंगळे, नितीन गायधने यांनी, दिवाळीच्या सुट्टी निमित्त. शहरातील न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी. १५ दिवसांचे मैदानी  क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असून. या क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून, तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना. तालुका पातळी पासून, देश पातळीच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जात आहे. खेळा प्रमाणेच विद्यार्थ्यांना सामजिक, कला-क्रिडा, संस्कृती यासह विविध क्षेत्राचे ज्ञान व्हावे या उद्देशाने, विविध मान्यवरांना बोलावून मार्गदर्शन देखील केले जात आहे. ज्यात गेल्या १० दिवसात, योग प्रशिक्षक सुजाता शेडगे, आहार व स्पोर्ट इंज्युरी संदर्भात डॉ अमीत मकवना, कबड्डी विषयावर महेश कोल्हे, प्रोत्साहणात्मक विषयावर प्रवीण जमधाडे, तर शिबिराच्या १० व्या दिवशी  पत्रकार जयेश सावंत यांनी, क्रीडा पत्रकारिता व करिअर यासंदर्भात मार्गदर्शन करतांना. विद्यार्थ्यांनी एकाग्रता आत्मसाद केल्यास, जीवनात कोणतेही लक्ष साधता येते, विद्यार्थी दशा ही मातीच्या गोळ्या प्रमाणे असते ,याच वयात त्यांना आकार देऊन मुलांवर संस्कार घडविले जातात. भविष्यात समाजात चांगला व्यक्ती म्हणून जगण्यासाठी, आपण आपल्या पालकांसह शिक्षकांचा आदर केला तर, आपल्या जीवनात, संस्कार आणि आत्मविश्वासाचे कवच निर्माण होईल. याकरिता विद्यार्थी जिद्द आणि एकाग्रतेने शिक्षणासह,क्रीडा आणि कुटूंबातील जबाबदारी पार पाडावी असे आवाहन पत्रकार सावंत यांनी विद्यार्थ्यांना करून. क्रीडा शिबिरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.  दिवाळी सुट्टी निमित्त आयोजित १५ दिवसांच्या क्रिडा शिबिरात,रोलबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल,स्केटिंग व क्रिकेट या खेळाचे प्रशिक्षण दिले जात असून. क्रीडा प्रशिक्षक नितीन बलराज, गौरव डेंगळे, नितीन गायधने यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे,भविष्यात श्रीरामपूरातून अनेक खेळाडू राज्य तसेच देश पातळीवर आपले व शहराचे नाव चमकवून, उज्वल भविष्य घडवतील असा विश्वास पालक वर्गातून व्यक्त केला जात आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहर व परिसरात नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हातभट्टीची गावठी दारु बनविण्याच्या चार ठिकाणी छापे टाकून त्या ठिकाणाहून पोलिसांनी 4 आरोपीविरुध्द कारवाई करत सुमारे 1,45,000/- रुपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने, 2,300 लि. कच्चे रसायन व 300 लि.तयार दारु स्थानिक गुन्हे शाखेने नष्ट केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी गुन्हे शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदिप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे आकाश काळे, शिवाजी ढाकणे, महिला पोलीस

कॉन्स्टेबल ज्योती शिंदे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल अंबादास पालवे या पथकाने काल सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं. 7 मधील दोन ठिकाणी त्यानंतर भैरवनाथनगर येथे दोन ठिकाणी अशा चार गावठी हातभट्टी दारु बनविण्याच्या ठिकाणी छापे टाकून हे दारु अड्डे उद्ध्वस्त करुन गावठी हातभट्टी दारु व त्याचे कच्चे रसायन नष्ट केले. या छाप्यात पोलिसांनी 1,45,000/- रुपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने, 2,300 लि. कच्चे रसायन व 300 लि.तयार दारु स्थानिक गुन्हे शाखेने नष्ट केली आहे. यात चार महिला आरोपींविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 989/2022 नुसार एका महिलेविरुध्द मु. प्रो. ऍ़. क. 65 (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी या ठिकाणाहून 25 हजार रु.किमतीचे 500 लि. कच्चे रसायन 10 हजार /- रु.किमतीची 100 लि. तयार दारु नष्ट केली.दुसर्‍या फिर्यादित श्रीरामपूर शहर ठाण्यात 990/2022 नुसार एका महिलेविरुध्द मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ)अन्वये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी या ठिकाणाहून 25 हजार रुपये किमतीचे 500 लि. कच्चे रसायन 5 हजार रुपये किची 50 लि. तयार दारु नष्ट केली.तिसर्‍या फिर्यादित श्रीरामपूर शहर ठाण्यात 991/2022 नुसार एका महिलेविरुध्द मु. प्रो .ऍ़. क. 65 (ई) (फ) एका महिलेविरुध्द गुन्हा दाखल करत या ठिकाणाहून 40, हजार रुपये किंमतीचे 800 लि. कच्चे रसायन 10 हजार रुपये किंमतीची 100 लि. तयार दारु नष्ट केली आहे.चौथ्या फिर्यादित श्रीरामपूर शहर ठाण्यात 992/2022 नुसार एका महिलेविरुध्द मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई) (फ)अन्वये गुन्हा दाखल करत पोलिसांनी 25 हजार रुपये किंमतीचे 500 लि. कच्चे रसायन 5,000/- रु.किची 50 लि. तयार दारु नष्ट केली आहे. या प्रकरणात एकुण 4 महिला आरोपीकडून 1,45,000/- रु. कि.ची 2300 कच्चे रसायन 300 लि. गावठी हातभट्टीची तयार दारु नष्ट करण्यात आली आहे.

मुंबई   ( विशेष प्रतिनिधी )वितरण व्यवस्थेतील सर्व त्रुटी लवकरच दुर करण्यात येणार असुन संबधीतांना प्रधानमंत्री मोफत धान्य वाटपाचे कमिशन तातडीने देण्याच्या सुचना देण्यात येतील तसेच नवीन फोर जी मशिन देण्यात येणार असल्यामुळे भविष्यात वाटपास अडचणी येणार नसल्याचा विश्वास  पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी व्यक्त केला                        राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या अडचणी संदर्भात पुरवठा विभागाचे प्रधान सचिव मा. विजय वाघमारे यांच्या समवेत आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनची  बैठक आयोजित  करण्यात आली होती . त्या वेळी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष  गणपतराव डोळसे पाटील म्हणाले की ऐन सणा सुदीच्या काळात राज्यात मशिन बंद पडल्या त्यामुळे धान्य असुनही दुकानदारांना त्याचे वितरण करणे अवघड झाले अनेक जिल्ह्यात वेळेवर धान्य उपलब्ध करुन दिले जात नाही त्यामुळे अनेक धान्य कोठा लँप्स होत आहे तसेच उशिरा धान्य आल्यामुळे ते मंशिनवर वेळेवर न टाकल्यामुळे वाटप करता येत नाही त्यामुळे गोदामातुन गाडी निघताच त्या दुकानाच्या मशिनवर धान्य साठा टाकला जावा तसेच तीन तीन महीने माल उशिरा मिळत असल्यामुळे कार्डधारकांचा रोष ओढवला जातो मोफत व रेग्युलर धान्य एकाच वेळी देण्यात यावे धान्य कोठा नसल्यामुळे लँप्स झालेल्या धान्य वाटपास मुदत वाढ देण्यात यावी कोरोना काळात मृत्यू पावलेल्या दुकानदारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी कमीशन वाढीबाबत कँबिनेट मंत्रीमंडळात चर्चा करण्यात यावी आय एस ओ मानांकनाबाबत सक्ती करण्यात येवु नये उशिरा आनंदाचा शिधा मिळालेल्या जिल्ह्यांना वाटपासाठी मुदतवाढ देण्यात यावी दुकानदारांना गँस सिलेंडर वाटपास अनुमती देण्यात यावी  अशा मागण्या फेडरेशनच्या वतीने मांडण्यात आल्या .त्या वेळी प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी दुकानदारांच्या सर्व अडचणी माननीय पुरवठा मंत्री महोदयांच्या बैठकीत ठेवुन त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करु असे अश्वासन दिले   या बैठकीला पुरवठा  विभागाचे उप. सचिव  नेत्रा मानकामे ,उपसचिव गजानन देशमुख , अवर सचिव कोळेकर  . दिपक आत्राम ,सागर कारंडे  यांच्य समवेत .ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर फेडरेशनचे राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील ,नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे जनरल सेक्रेटरी बाबुराव ममाणे ,विभागीय अध्यक्ष अशोक ऐडके शांताराम पाटील शंकर सुरोसे ,विवेक भेरे ,दिलीप नवले फारुख शेख सातारा जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब तोडकरी  आण्णा शेटे आदि उपस्थित  होते .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget