Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-"कांदे घ्या ,वांगे घ्या, बटाटे घ्या काहीही घ्या लई स्वस्त लावले आहेत काका काकु "अशी हाक बेलापुर मराठी शाळेत लहान मुलांनी भरविलेल्या बाजारात ऐकु आली अन पालकांनीही मनसोक्त खरेदी केली                                        विद्यार्थ्यांना बालपणीच व्यवहार ज्ञान अवगत व्हावे या करीता शाळेत बाजार भरविण्याची सांकल्पना पुढे आली त्याच संकल्पनेनुसार  बेलापुर जिल्हा परिषद मराठी मुले व मुलींच्या शाळेत चिमुरड्यांनी बाजार भरविला होता भाजी पाल्याच्या दुकानापासुन फळे तसेच खाऊचीही दुकाने लावण्यात आली होती लहान लहान मुले मुली आपला माल कसा चांगला आहे तो खरेदी कराच असा आग्रह करत होती पालकांनीही या बाजाराचा आनंद लुटत  खरेदी केली लहानग्यांच्या बाजाराचे उद़्घाटन शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष अजीज शेख यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी शालेय शिक्षिका मुख्याध्यापिका राजाबाई कांबळे संजय भालेराव शांताबाई गागरे ढुमणे देवढे यांनी बाजार भरविण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले या वेळी सौ रोशनी अजिज शेख ज्योती शेलार तबस्सुम सय्यद भाग्यश्री कुमावत भारती प्रधान मिनाक्षी दायमा रेश्मा पठाण जबीन शेख दिशा मोरे गौरी शेलार नंदीनी मगर अंजुम शेख राणी सोनवणे सना शेख शबाना शेख अनिल मोकाशी मास्टर हुडे किशोर खरोटे राजु शेख सुल्तान शेख मोसीन ख्वाजा रीजवान आतार ईरफान पठाण प्रकाश पवार मुक्तार सय्यद आदी उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )- जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शालेय व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षपदी अजिज अहमद शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे                             बेलापुर जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका लता बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पालक संघाची बैठक बोलविण्यात आली होती या बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अजीज अहमद शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या नावाची सूचना श्रीकांत कोटकर यांनी मांडली तर रमेश लगे यांनी त्यास अनुमोदन दिले या वेळी सुरेखा सोनवणे शितल गायकवाड लाता परदेशी आनिल मोकाशी मास्टर हुडे किशोर खरोटे राजु शेख सुल्तान शेख मोसीन ख्वाजा रिजवान आतार मोसीन शेख ईरफान पठाण प्रकाश पवार आदिसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उपमुख्याध्यापीका विजया दहीवाळ यांनी आभार मानले

श्रीरामपूर तालुका व परिसरातून ट्रॅक्टर चोरणार्‍या टोळीस काल श्रीरामपूर पोलिसांनी चार जणांना जेरबंद कले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ट्रॅक्टर, ट्रॉली, आर्मीचर व चार मोबाईल असा एकुण 12,90,000/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात राहाता तालुक्यातील तिघेजण असून चौथा हा वैजापूर तालुक्यातील बाबतारा येथील आरोपी आहेत.श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी, जबरी चोरी, दरोडा असे गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस अधीक्षक, मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, स्वाती भोर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग, संदीप मिटके यांनी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना सुचना दिल्या होत्या. त्यावरुन पोलीस निरीक्षक यांनी श्रीरामपूर शहर तपास पथकाला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. रघुनाथ नानासाहेब उघडे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर यांचा ट्रॅक्टर हा त्यांचे राहते घरासमोरुन दि. 24 जून 2022 रोजी रात्री चोरीला गेला होता, त्यावेळी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. 554 / 2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास श्रीरामपुर शहर पोलीस करत असताना, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर ट्रॅक्टर चोरणारी टोळी श्रीरामपूर परिसरात परत ट्रॅक्टर चारणारी टोळी येणार आहे, अशी माहिती पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांना सांगुन, त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे तपास पथक रवाना करण्यात आले.या पोलीस पथकाने सापळा लावुन यातील किरण शांताराम लासुरे-(वय 25) प्रल्हाद गोरक्षनाथ बरवंट (वय 45) दोघेही रा. शिंगवे, ता. राहाता, रामा बाळासाहेब यादव (वय 29) रा. 14 नं. चारी, राहाता, ता. राहता, मच्छिंद्र भाऊसाहेब गायकवाड, (वय 27) रा. बाबतारा, ता. वैजापुर, जि. औरंगाबाद यांना जेरबंद करुन त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करुन त्यांचेकडून पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली, आर्मीचर व चार मोबाईल असा एकुण 12 लाख 90 हजार इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील वावी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 229/2022 भादवि कलम 379, तसेच श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 386/2022 भादंवि कलम 379 असे गुन्हे उघडकीस आणले आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल रमिझराजा अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे, पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुर्गुळे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बढे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे, पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर यांनी केली असुन, दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे करीत आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर आतिक्रमण करुन अतिक्रमण काढण्यास गेलेल्या ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांना धक्काबुक्की करुन दमदाटी केल्याबद्दल गायकवाड वस्ती येथील सोमा दुशिंग,हर्षदा दुशिंग ,कांचन दुशिंग,रेखा दुशिंग या चार जणा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे                                      या बाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहीती अशी की गायकवाड वस्ती येथे बेलापुर ग्रामपंचायत मिळकत नंबर १३०४ मध्ये ५०बाय ५० मिटर जागा असुन त्या जागेत ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी विहीर अंगणवाडी समाज मंदीर पाच गाळे आहेत बेलापुर  श्रीरामपुर रस्ता रुंदीकरणाचे काम जोरात सुरु असुन रस्त्यावरील आतिक्रमण तातडीने हटविण्यात आली त्यात दुशिंग यांचेही अतिक्रमण होते त्याचे रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत जागेत अँगल गाडले ही बाब सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांच्या लक्षात येताच सौ रेखा फकीरा दुशिंग यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावुन समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही काहीही करा मी अतिक्रमण करणारच असे ठणकावुन सांगितले तसेच माझे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तर मी आत्महत्या करुन ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करील अशी धमकी दिली त्या नंतरही ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी सचिन साळूंके सचिन नगरकर किशोर झीने यांना गायकवाड वस्ती येथील अतिक्रमण केलेल्या ठिकाणी पाठवुन अतिक्रमण न करणे बाबत नोटीस देण्यास गेले असता त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांंनी ती नोटीस घरावर डकवीली  .                             *अतिक्रमण धारक महीलेच्या मुलीचे शोले स्टाईल आंदोलन*      त्याच वेळी सौ रेखा दुशिंग यांची मुलगी हर्षदा दुशिंग हीने जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीवर चढुन शोले स्टाईलने आंदोलन केले आमचे अतीक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तर टाकीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याची धमकी दिली त्या वेळी सर्वांना शोलेची आठवण झाली कारण त्या शोलेतही बेलापुर अन रामगड होते इथेही बेलापुर व रामगड आहे अखेर त्या मुलीची समजुत काढुन तीला खाली सुखरुप उतरविण्यात आले सोमा दुशिंग याने सरपंच महेंद्र साळवी यांना तलवारीने काटा काढील आशी धमकी दिली कुणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली  त्या वेळी ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यात आली त्यात त्यांना मुका मार लागला त्या नंतर सरपंच साळवी  उपसरपंच खंडागळे  व ग्रामविकास अधिकारी तगरे यांनी पोलीस निरीक्षक  हर्षवर्धन गवळी यांच्या कानावर हा प्रकार घातला दुशिंग परिवाराला समजावुन सांगण्याचा प्रयत्न सुरु असतानाच  दुशिंग परीवाराने तेथेही दादागीरी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ग्रामविकास आधिकारी राजेश तगरे यांच्या फिर्यादीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ९२५/२०२२ भा द वि कलम ३५३  ,३३२,३०९ ,५०४, ५०६ ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे हे करत आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-मुस्लीम धर्माचे संस्थापक मोहंम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात जश़्ने ईद मिलादुन्नबी मोठ्या उत्सहात संपन्न झाली   ईदगाह मैदान अ्लाउद्दीन बाबा चॉक पासून मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली मिरवणूक बेलापुरच्या मुख्य झेंडा चौकात येताच नागरीकांच्या वतीने जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड मा,सरपंच भरत साळूंके तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे  पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम आदिंनी केले या वेळी मिठाईचे वाटप करण्यात आले. तुळजा भवानी मंदीर चौकातही मिरवणूक आल्यानंतर तेथेही मुस्ली बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच खाऊचे वाटप करण्यात आले त्यानंतर मिरवणूक जामा मस्जिद येथे आली तेथे मिरवणूकीचे रुपांतर सभेत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामा मस्जिदचे मुख्य ट्रस्टी जाफरभाई आतार हे होते या वेळी विद्यार्थ्यांनी मोहंम्मद पैगंबर यांच्या जिवनावर भाषणे केली .या वेळी जिं प सदस्य शरद नवले ,जामा मस्जिदचे ट्रस्टी हाजी बहोद्दीन सय्यद सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे हाजी ईस्माईल शेख गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे पत्रकार देविदास देसाई भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रफुल्ल डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमाचे नियोजनजामा मस्जिद ट्रस्ट व अंजुमन कमीटी बेलापुर यांनी केले होते कार्याक्रम यशस्वीतेसाठी मोहसीन बहोद्दीन सय्यद जब्बार  आतार शफीक बागवान असीफ शेख शफीक आतार कौसर सय्यद जब्बार बागवाले अजीज शेख सर्फराज सय्यद जुबेर आतार कैफ काझी वसीम शेख समीर शेख सुलतान शेख मुख्तार सय्यद आदिंनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाजी ईस्माईल शेख यांनी केले तर सूत्रसंचलन मोहसीन सय्यद यांनी केले मुनीर बागवान यांनी आभार व्यक्त केले.

श्रीरामपूर-आगदी १५००ं वर्षांपूर्वी  रानटी -क्रुर-अमानवीय प्रथा- रितीरिवाजांनी व्यापलेला  वाळवंटातील व जगातील जनसमुदायाला एक अल्लाहा( ईश्वरा)ची शिकवण देत समस्त जगाने एका अल्लाहाची प्रार्थना करावी . त्यामध्ये कोणीही शुद्र-उच्च-नीच - काळा - गोरा नाही,  जगातील सर्व मानव जात ही एकच आदम ची लेकरे आहोत . 

म्हणुनच ती इस्लामी ज्ञान,शिक्षण घेवू शकते, ठराविक जाती जमातीत जन्माला तरच तुम्ही  शिकण घेऊ शकता हा चुकीचा समज  प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांनी नाकारला, त्यांनी प्रत्येक 

विद्वानांना जास्त महत्त्व दिले, उदा.विद्वान-ज्ञानी  फक्त धार्मिक ज्ञान हेच फक्त महत्त्वाचे नसून  सर्व समावेशक ज्ञान  महत्वाचे आहे उदा.अर्थ,रसायन, वैद्यकीय, क्रीडा,लष्कर ई. विविध क्षेत्रातील विद्वान , तत्वज्ञ, ज्ञानी असलेल्यांना  ज्ञानाची बंद कवाडे प्रेषित मुहम्मद स्व. यांनी सर्व मानवजातीला कायमची खुली केली. चीन हा जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या,ज्ञानाच्या,  क्षेत्रात पुर्वीही खुप प्रगत  होता, तेथील अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी " चीनला जावुन ज्ञान घेवा लागलं तरी,  ज्ञान घेण्यासाठी चिनला जा", असा पुरोगामी दुर-दृष्टीकोनाचा  सल्ला प्रेषित मुहम्मद स्व.नी दिला.

 ज्ञानाच्या, कौशल्याच्या , तंत्रज्ञानाच्या जोरावर कोणी-कितीही मोठा होवू शकतो . पुढे जावू शकतो.

त्यामध्ये , राज्य कारभार सांभाळण्यासाठी फक्त राजाच्याच पोटी जन्माला यावं लागतं हा विचारच हजरत मुहम्मद पैगंबरांनी नाहीसा करून टाकून प्रत्येक्षात आचरणातून दाखवून दिले. 

समतेचा संदेश देणारे पहिले क्रांतिकारक प्रेषित मुहम्मद स्व.नींआपल्या २३ वर्षांच्या प्रेषित कालावधीतच समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून माणसाला माणूस म्हणून माणसाप्रमाणे कसे वागवावे याचे उदाहरण समस्त जगाला दाखवून दिले . अरब देशात काळा - गोरा  भेदभाव मोठ्या प्रमाणात होता, गुलामगिरी च्या प्रथेने कळस गाठलेला .काळ्या निग्रो लोकांना माणूस म्हणून जगताना मान्यताच नव्हती , काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात केली जात असे,  गुलामगिरीला हद्दपार-नष्ट करून एका जैद नावाच्या काळया निग्रो  गुलामाशी आपल्या सख्ख्या आत्या बहीणी चा विवाह लावून काळ्या-गोऱ्यांचा भेदभाव नष्ट केला.

हजरत बिलाल रजि. (काळ्या  वर्णाचे) गुलाम म्हणून विकले गेलेल्यांना गुलामगिरीतून मुक्त करून  मक्का विजयी दिवशी पवित्र काबागृहावर चढून "अजान" देण्याचा आदेश देऊन  समस्त जगाला कोणीही अपवित्र नसते हे दृश्य दाखवून दिले. इस्लामच्या सिद्धांतानुसार एकाच अल्लाहा (ईश्वरा) ची , आदम ची संतान आहेत. सर्व रंगाचे-वर्णाचे- वंशाचे , सर्व एकच आहेत, हा भेदभाव इस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय,हक्क,संधी देतो,हा पुरोगामी क्रांतिकारी समतेचा विचार प्रेषितांनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिला.

जगातील स्त्रियांनाही आपल्या वारसाहक्कात, मालमत्तेत वाटा आहे. तो वारसा हक्क  मिळवून देणारा जगभरात पहिला  क्रांतीकारक विचार प्रेषित मुहम्मद स्व.यांनीच दिला. त्याकाळात किरकोळ कारणावरून  वादविवाद होऊन त्याचे भयंकर रूपांतर हत्या -खुन, सतत च्या  कुठेतरी लढाई यामुळे  विधवां व अनाथांचे प्रमाण प्रचंड  प्रमाणात असल्याने विधवांना अतिशय हाल-अपेष्टां -त्रासांना- कुप्रथांना तोंड द्यावे लागत असत व अनाथ मुलांना तर  आधारच मिळत नसतं . विधवांना वेगवेगळ्या नजरेतून पाहिलं जातं होतं . विधवा -घटस्पोटींचे शब्दात वर्णन करणे अवघड होते .     हे सर्व बघुन विश्वातील पहिला घटस्फोटीत-विधवा-महिला पुनर्विवाहची संकल्पना मांडून जैद हारिसा नावाच्या एका गुलामाच्या घटस्फोटीत महिलेशी स्वतः विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या घटस्फोटीत महिलेला प्रेषित मुहम्मद यांनी  स्वत:ची पत्नी बनवून बहुमान दिला. पैगंबरांनी आपले  विवाह घटस्फोटीत व विधवा  महिलांशीच करून प्रत्येकीला सम-समान पातळीवर ज्ञाय 

- हक्क स्वाधीन करून  काळाच्या प्रवाहात सामील करून मान -सन्मान - बहुमान प्राप्त करून समस्त जगाला दाखवले.

     🌺कन्यावध - स्री भ्रुणहत्या हे पाप आहे हे सांगणारे प्रेषित मुहम्मद स्व. पहीले  क्रांतिकारी पुरुष,

अरब जगात १५०० वर्षांपूर्वी स्त्री भृणहत्या मोठ्या प्रमाणात होत होत्या,समाजमनाच्या नसानसात ही कुप्रथा भिनलेली होती, जन्मलेल्या मुलीला अशुभ मानले जात असे,जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरण्याची क्रुर प्रथा होती,  स्थानिक पातळीवर ते प्रतिष्ठेचं प्रतिकं समजलं जातं होते. परंतु प्रेषित मुहम्मद स्व.यांनी कन्यावधाला समुळ नष्टच करण्यासाठी अल्लाहाचे भय दाखवत पारलौकिक जीवनाचे नरक - स्वर्ग प्राप्ती बक्षीसांची सत्यता दाखवली.

पवित्र कुराणात सांगितले की,"  जिवंत पुरलेल्या मुलीला जेव्हा (कयामतच्या दिवशी) विचारलं जाईल की कोणत्या अपराधाची शिक्षा तुला दिली गेली आहे ?" तर ती सांगेल की माझा काहीही दोष,गुन्हा नसताना विनाकारण माझी हत्या करण्यात आली आहे,हे या लोकांनी मोठे पातक केले आहे, दोषींना शिक्षा देऊन मला इन्साफ (न्याय) मिळावा" 

तेव्हा अल्लाहा च्या शिक्षेपासून तुम्ही वाचू शकणार नाही,हे ऐकल्यानंतर ज्या -ज्या व्यक्तींनी आपल्या कोमल मुलींना पुरलं होते,त्या प्रत्येक व्यक्ती पश्चाताप करत धायमोकळून ढसढसा रडू लागलीत ,हे आम्ही काय मोठे पातक -पाप केलीत म्हणून,

    प्रेषित मुहम्मद स्व.सांगितले की," ज्यांना एक अथवा अधिक मुली असेल त्या पालकांनी, प्रेमाने,आपुलकीने त्या मुलींचे व्यवस्थिरित्या पालनपोषण, शिक्षण करून  उत्तम वर ( नवरा)बघून त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले. तर ,त्या प्रत्येक व्यक्तीला जन्नतुल फिरदौस (स्वर्गात)मधे महाल भेटेल . तसेच ज्या व्यक्तींना दोन- तीन पेक्षाही अधिक मुली असेल, तर त्यांनी न कंटाळता त्या मुलींचे संगोपन व्यवस्थित करून उत्तम वर(नवरा) बघुन त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले तर जन्नत  (स्वर्गा)त  माझ्या शेजारी त्यांचं महाल असेल व त्याचा मोबदला त्यांना अत्यंत चांगलाच असेल..

अशाप्रकारे वास्तविकतेचे धडे देत  अल्लाहा (इश्वर) चे  प्रिय  होण्यासाठी सत्कर्म अपेक्षित असल्याचे  सांगितले.

प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांना १)हज.जैनब २)हज.रुकैयया,३) उममे कुलसूम ४) हज.फातिमा रजि.या चार मुलींचे संगोपन करुन त्यावेळच्या प्रतिष्ठित व्यापारी व घराण्यात लग्न करून दिलेत.त्यामध्ये " करबला युध्दातील जगाच्या कल्याणासाठी ७२ हौतात्म्य पत्करलेले हजरत इमाम हुसेन व हजरत इमाम हसन च्या आई हजरत फातिमा रजि. या सर्वांत छोट्या मुलीचा समावेश ही होतो .

हे स्वकर्तृत्वाने जगाला दाखवले.

यामुळे ज्यांच्या घरात मुली जन्माला  होत्या त्यांच्या चेहऱ्यांवर  चेहरे उजळून निघाले.

प्रेषित मुहम्मद स्व. यांनी लोकांकडून  जगप्रसिद्ध  आराफात च्या अंतिम संबोधनात  शपथेवर , "माझ्या जवळ प्रतिज्ञा (शपथ) घ्या की, अल्लाहा शिवाय इतर कोणालाही पुंजणार नाही , चोरी, व्यभिचार करणार नाही, मुलींची - कन्यावध करणार नाही.आपल्या वडिलांच्या संपत्तीतून मुलींचाही हिस्सा - वाटा आहेत. तो द्यावा.  बंधुंनो,पतीचे पत्नीवर हक्क आहे ,तसेच पत्नीचे आपल्या पतीवर हक्क आहे.  पत्नीला (बायकांना) प्रेमाने व सहानुभूतीने सांभाळा ,कठोर निष्ठुर होवू नये, त्यांच्या प्रती दयाळु रहा,  तुम्ही आपल्या अल्लाहाच्या  साक्षीने आपल्या पत्नीला स्विकारले आहे , तर तीची काळजी घ्यावी,  पत्नीचे जे काही आधिकर असतील ते सर्व तीला द्यावे,  तीने तुमच्यावर विश्वास टाकला आहे , तर तीच्या त्या विश्वासाचा विश्वासघात करू नका. तुम्हाला( महाप्रलया) कयामतच्या  दिवशी अल्लाहा समोर आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागेल,या दिवसाची कायम आठवण ठेवा,." ..🌹

असे प्रेषितांनी आपल्या महानिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक  वर्गातील समुहाची व विशेषतः महीलांची तळमळ व्यक्त केली,काळजी घेतली.

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या दुर्मिळ ग्रंथात ;"सार्वजनिक सत्य धर्म "मधे ,पैगंबरांवर पहिला पोवाडा लिहित स्तुती करत लिहीतात की, 

 अर्थ :- - " पैगंबरांनी श्रेष्ठ -कनिष्ठ हा भेद नाकारला,गुलामगिरी नाकारली,जातिभेद,जाती- पाती बुडासकट नष्ट केले,अधर्म आणि भेदाभेद मोडुन काढला,सर्वत्र अभेद-समता, बंधुभाव कायम केला !! 

पैगंबरांनी प्रस्थापित केलेल्या समतेवर जगप्रसिद्ध साहित्यिक व शायर डॉ.इक्बाल लिहीतात की, "एक ही सफ मे खडें हो गऐ मेहमूद और अयाज !! ना कोई बंदा रहा,ना बंदा नवाज !!"

अर्थात :- मस्जिदमधे नमाज अदा करताना एकाच रांगेत देशाचा बादशहा- राष्ट्रपतीच्या खांद्याला खांदा लावून एक गुलाम उभा राहु शकतो,यावेळी कोणं गुलाम नाहीत कोणं मालक नाही,अशी समता - समानता त्यांनी प्रस्थापीत केली.

प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व .यांना ,लिहीता-वाचता येत नव्हते,तरी सुद्धा सर्व अरब प्रदेशात साक्षरतेचे महत्व पटवून संपूर्ण प्रदेश साक्षर केला.

"न भूतो न भविष्यते" घडवलेल्या क्रांतीचे श्रेय स्वतः न घेता सर्व श्रेय हे जगत निर्मात्यां अल्लाहा ला दिलेत.असे म्हणत की, " मी हे सर्व अल्लाहाचेच काम करत आहेत"


लेखक- डॉ.सलीम सिकंदर शेख

बैतुश्शिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर

९२७१६४००१४.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-हज़रत मोहम्मद पैगंबर  जयंतीच्या ( ईद मिलाद )निमित्ताने  गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा मुले , बेलापुर, येथे विकलांग विद्यार्थ्यांना  शालेय साहित्य वाटप  करुन आगळ्या वेगळ्या पध्दतीने  पैगंबर जयंती साजरी करण्यात आली           या वेळी मां.जि प सदस्य शरद नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बेलापुर  सोसायटीचे चेअरमन  सुधीर नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामपंचायत सदस्य शफीक बागवान मुस्ताक शेख हाजी ईस्माईल शेख मोहसीन सय्यद हवालदार अतुल लोटके आदि मान्यवर उपस्थित होते  यावेळी पंचायत समिती सदस्य व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटिल नाईक आपल्या भाषणात म्हणाले की  मोहम्मद पैगंबरएक थोर समाज सुधारक होते यांनी समाजत असणाऱ्या  अनेक रूढी परंपरा स्री भ्रुण हत्या तसेच  महिलावर होणारे  अत्याचार यावर आळा घातला मोहम्मद पैगंबर यांनी जीवनात सर्वात जास्त शिक्षणाला महत्व दिले गौसे आजम ही सेवाभावी संस्थाही अशाच पध्दतीने सामाजिक कार्य करत आहे .अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहीले पाहीजे असेही नाईक म्हणाले  या वेळी जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे  चेअरमन सुधीर नवले आदिंनी मनोगत व्यक्त करताना  गौसे आजम सेवा भावी संस्थेच्या कामाचे कौतुक केले व पुढील कार्याकरीता शुभेच्छा दिल्या या वेळी मान्यवरांच्या हस्ते विकलांग विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले , मुस्ताक शेख, रमेश अमोलिक, मोहसिन सय्यद, बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटेके , जीना शेख,जिल्हा परिषद मराठी शाळा मुळे पालक समती अध्यक्ष राजू भाई सय्यद मुख्यधापक कांबले मैडम, व सर्व शिक्षक वर्ग,गौसे आजम सेवा भावी संस्था संस्थापक  मुख़्तार भाई सय्यद, अध्यक्ष सुल्तानभाई शेख, महा सचिव नौसाद भाई शेख, तालुका अध्यक्ष सोनू भाई शेख, सईद सय्यद, भीम गर्जना तालुका अध्यक्ष रफीक भाई शाह, मोहसिन ख्वाजा भाई शेख,इ उपस्थित होते गौसे आजम सेवा भावी संस्थचे संस्थापक अध्यक्ष मुख़्तार सय्यद यांनी  आभार व्यक्त केले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget