जि प मराठी शाळेत भरला चिमुकल्यांच्या बाजार
बेलापुर (प्रतिनिधी )-"कांदे घ्या ,वांगे घ्या, बटाटे घ्या काहीही घ्या लई स्वस्त लावले आहेत काका काकु "अशी हाक बेलापुर मराठी शाळेत लहान मुलांनी भरविलेल्या बाजारात ऐकु आली अन पालकांनीही मनसोक्त खरेदी केली विद्यार्थ्यांना बालपणीच व्यवहार ज्ञान अवगत व्हावे या करीता शाळेत बाजार भरविण्याची सांकल्पना पुढे आली त्याच संकल्पनेनुसार बेलापुर जिल्हा परिषद मराठी मुले व मुलींच्या शाळेत चिमुरड्यांनी बाजार भरविला होता भाजी पाल्याच्या दुकानापासुन फळे तसेच खाऊचीही दुकाने लावण्यात आली होती लहान लहान मुले मुली आपला माल कसा चांगला आहे तो खरेदी कराच असा आग्रह करत होती पालकांनीही या बाजाराचा आनंद लुटत खरेदी केली लहानग्यांच्या बाजाराचे उद़्घाटन शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष अजीज शेख यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी शालेय शिक्षिका मुख्याध्यापिका राजाबाई कांबळे संजय भालेराव शांताबाई गागरे ढुमणे देवढे यांनी बाजार भरविण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले या वेळी सौ रोशनी अजिज शेख ज्योती शेलार तबस्सुम सय्यद भाग्यश्री कुमावत भारती प्रधान मिनाक्षी दायमा रेश्मा पठाण जबीन शेख दिशा मोरे गौरी शेलार नंदीनी मगर अंजुम शेख राणी सोनवणे सना शेख शबाना शेख अनिल मोकाशी मास्टर हुडे किशोर खरोटे राजु शेख सुल्तान शेख मोसीन ख्वाजा रीजवान आतार ईरफान पठाण प्रकाश पवार मुक्तार सय्यद आदी उपस्थित होते
Post a Comment