गौसे आजम संस्थेने अनोख्या पध्दतीने साजरी केली पैगंबर जयंती
बेलापुर (प्रतिनिधी )-हज़रत मोहम्मद पैगंबर जयंतीच्या ( ईद मिलाद )निमित्ताने गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा मुले , बेलापुर, येथे विकलांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन आगळ्या वेगळ्या पध्दतीने पैगंबर जयंती साजरी करण्यात आली या वेळी मां.जि प सदस्य शरद नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बेलापुर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामपंचायत सदस्य शफीक बागवान मुस्ताक शेख हाजी ईस्माईल शेख मोहसीन सय्यद हवालदार अतुल लोटके आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी पंचायत समिती सदस्य व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटिल नाईक आपल्या भाषणात म्हणाले की मोहम्मद पैगंबरएक थोर समाज सुधारक होते यांनी समाजत असणाऱ्या अनेक रूढी परंपरा स्री भ्रुण हत्या तसेच महिलावर होणारे अत्याचार यावर आळा घातला मोहम्मद पैगंबर यांनी जीवनात सर्वात जास्त शिक्षणाला महत्व दिले गौसे आजम ही सेवाभावी संस्थाही अशाच पध्दतीने सामाजिक कार्य करत आहे .अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहीले पाहीजे असेही नाईक म्हणाले या वेळी जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे चेअरमन सुधीर नवले आदिंनी मनोगत व्यक्त करताना गौसे आजम सेवा भावी संस्थेच्या कामाचे कौतुक केले व पुढील कार्याकरीता शुभेच्छा दिल्या या वेळी मान्यवरांच्या हस्ते विकलांग विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले , मुस्ताक शेख, रमेश अमोलिक, मोहसिन सय्यद, बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटेके , जीना शेख,जिल्हा परिषद मराठी शाळा मुळे पालक समती अध्यक्ष राजू भाई सय्यद मुख्यधापक कांबले मैडम, व सर्व शिक्षक वर्ग,गौसे आजम सेवा भावी संस्था संस्थापक मुख़्तार भाई सय्यद, अध्यक्ष सुल्तानभाई शेख, महा सचिव नौसाद भाई शेख, तालुका अध्यक्ष सोनू भाई शेख, सईद सय्यद, भीम गर्जना तालुका अध्यक्ष रफीक भाई शाह, मोहसिन ख्वाजा भाई शेख,इ उपस्थित होते गौसे आजम सेवा भावी संस्थचे संस्थापक अध्यक्ष मुख़्तार सय्यद यांनी आभार व्यक्त केले
Post a Comment