!! जनकल्याणासाठी स्व- आचरणातून जागृती करणारे पुरोगामी क्रांतीदुत:- प्रेषीत मुहम्मद पैगंबर स्व..!!

श्रीरामपूर-आगदी १५००ं वर्षांपूर्वी  रानटी -क्रुर-अमानवीय प्रथा- रितीरिवाजांनी व्यापलेला  वाळवंटातील व जगातील जनसमुदायाला एक अल्लाहा( ईश्वरा)ची शिकवण देत समस्त जगाने एका अल्लाहाची प्रार्थना करावी . त्यामध्ये कोणीही शुद्र-उच्च-नीच - काळा - गोरा नाही,  जगातील सर्व मानव जात ही एकच आदम ची लेकरे आहोत . 

म्हणुनच ती इस्लामी ज्ञान,शिक्षण घेवू शकते, ठराविक जाती जमातीत जन्माला तरच तुम्ही  शिकण घेऊ शकता हा चुकीचा समज  प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांनी नाकारला, त्यांनी प्रत्येक 

विद्वानांना जास्त महत्त्व दिले, उदा.विद्वान-ज्ञानी  फक्त धार्मिक ज्ञान हेच फक्त महत्त्वाचे नसून  सर्व समावेशक ज्ञान  महत्वाचे आहे उदा.अर्थ,रसायन, वैद्यकीय, क्रीडा,लष्कर ई. विविध क्षेत्रातील विद्वान , तत्वज्ञ, ज्ञानी असलेल्यांना  ज्ञानाची बंद कवाडे प्रेषित मुहम्मद स्व. यांनी सर्व मानवजातीला कायमची खुली केली. चीन हा जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या,ज्ञानाच्या,  क्षेत्रात पुर्वीही खुप प्रगत  होता, तेथील अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी " चीनला जावुन ज्ञान घेवा लागलं तरी,  ज्ञान घेण्यासाठी चिनला जा", असा पुरोगामी दुर-दृष्टीकोनाचा  सल्ला प्रेषित मुहम्मद स्व.नी दिला.

 ज्ञानाच्या, कौशल्याच्या , तंत्रज्ञानाच्या जोरावर कोणी-कितीही मोठा होवू शकतो . पुढे जावू शकतो.

त्यामध्ये , राज्य कारभार सांभाळण्यासाठी फक्त राजाच्याच पोटी जन्माला यावं लागतं हा विचारच हजरत मुहम्मद पैगंबरांनी नाहीसा करून टाकून प्रत्येक्षात आचरणातून दाखवून दिले. 

समतेचा संदेश देणारे पहिले क्रांतिकारक प्रेषित मुहम्मद स्व.नींआपल्या २३ वर्षांच्या प्रेषित कालावधीतच समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून माणसाला माणूस म्हणून माणसाप्रमाणे कसे वागवावे याचे उदाहरण समस्त जगाला दाखवून दिले . अरब देशात काळा - गोरा  भेदभाव मोठ्या प्रमाणात होता, गुलामगिरी च्या प्रथेने कळस गाठलेला .काळ्या निग्रो लोकांना माणूस म्हणून जगताना मान्यताच नव्हती , काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात केली जात असे,  गुलामगिरीला हद्दपार-नष्ट करून एका जैद नावाच्या काळया निग्रो  गुलामाशी आपल्या सख्ख्या आत्या बहीणी चा विवाह लावून काळ्या-गोऱ्यांचा भेदभाव नष्ट केला.

हजरत बिलाल रजि. (काळ्या  वर्णाचे) गुलाम म्हणून विकले गेलेल्यांना गुलामगिरीतून मुक्त करून  मक्का विजयी दिवशी पवित्र काबागृहावर चढून "अजान" देण्याचा आदेश देऊन  समस्त जगाला कोणीही अपवित्र नसते हे दृश्य दाखवून दिले. इस्लामच्या सिद्धांतानुसार एकाच अल्लाहा (ईश्वरा) ची , आदम ची संतान आहेत. सर्व रंगाचे-वर्णाचे- वंशाचे , सर्व एकच आहेत, हा भेदभाव इस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय,हक्क,संधी देतो,हा पुरोगामी क्रांतिकारी समतेचा विचार प्रेषितांनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिला.

जगातील स्त्रियांनाही आपल्या वारसाहक्कात, मालमत्तेत वाटा आहे. तो वारसा हक्क  मिळवून देणारा जगभरात पहिला  क्रांतीकारक विचार प्रेषित मुहम्मद स्व.यांनीच दिला. त्याकाळात किरकोळ कारणावरून  वादविवाद होऊन त्याचे भयंकर रूपांतर हत्या -खुन, सतत च्या  कुठेतरी लढाई यामुळे  विधवां व अनाथांचे प्रमाण प्रचंड  प्रमाणात असल्याने विधवांना अतिशय हाल-अपेष्टां -त्रासांना- कुप्रथांना तोंड द्यावे लागत असत व अनाथ मुलांना तर  आधारच मिळत नसतं . विधवांना वेगवेगळ्या नजरेतून पाहिलं जातं होतं . विधवा -घटस्पोटींचे शब्दात वर्णन करणे अवघड होते .     हे सर्व बघुन विश्वातील पहिला घटस्फोटीत-विधवा-महिला पुनर्विवाहची संकल्पना मांडून जैद हारिसा नावाच्या एका गुलामाच्या घटस्फोटीत महिलेशी स्वतः विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या घटस्फोटीत महिलेला प्रेषित मुहम्मद यांनी  स्वत:ची पत्नी बनवून बहुमान दिला. पैगंबरांनी आपले  विवाह घटस्फोटीत व विधवा  महिलांशीच करून प्रत्येकीला सम-समान पातळीवर ज्ञाय 

- हक्क स्वाधीन करून  काळाच्या प्रवाहात सामील करून मान -सन्मान - बहुमान प्राप्त करून समस्त जगाला दाखवले.

     🌺कन्यावध - स्री भ्रुणहत्या हे पाप आहे हे सांगणारे प्रेषित मुहम्मद स्व. पहीले  क्रांतिकारी पुरुष,

अरब जगात १५०० वर्षांपूर्वी स्त्री भृणहत्या मोठ्या प्रमाणात होत होत्या,समाजमनाच्या नसानसात ही कुप्रथा भिनलेली होती, जन्मलेल्या मुलीला अशुभ मानले जात असे,जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरण्याची क्रुर प्रथा होती,  स्थानिक पातळीवर ते प्रतिष्ठेचं प्रतिकं समजलं जातं होते. परंतु प्रेषित मुहम्मद स्व.यांनी कन्यावधाला समुळ नष्टच करण्यासाठी अल्लाहाचे भय दाखवत पारलौकिक जीवनाचे नरक - स्वर्ग प्राप्ती बक्षीसांची सत्यता दाखवली.

पवित्र कुराणात सांगितले की,"  जिवंत पुरलेल्या मुलीला जेव्हा (कयामतच्या दिवशी) विचारलं जाईल की कोणत्या अपराधाची शिक्षा तुला दिली गेली आहे ?" तर ती सांगेल की माझा काहीही दोष,गुन्हा नसताना विनाकारण माझी हत्या करण्यात आली आहे,हे या लोकांनी मोठे पातक केले आहे, दोषींना शिक्षा देऊन मला इन्साफ (न्याय) मिळावा" 

तेव्हा अल्लाहा च्या शिक्षेपासून तुम्ही वाचू शकणार नाही,हे ऐकल्यानंतर ज्या -ज्या व्यक्तींनी आपल्या कोमल मुलींना पुरलं होते,त्या प्रत्येक व्यक्ती पश्चाताप करत धायमोकळून ढसढसा रडू लागलीत ,हे आम्ही काय मोठे पातक -पाप केलीत म्हणून,

    प्रेषित मुहम्मद स्व.सांगितले की," ज्यांना एक अथवा अधिक मुली असेल त्या पालकांनी, प्रेमाने,आपुलकीने त्या मुलींचे व्यवस्थिरित्या पालनपोषण, शिक्षण करून  उत्तम वर ( नवरा)बघून त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले. तर ,त्या प्रत्येक व्यक्तीला जन्नतुल फिरदौस (स्वर्गात)मधे महाल भेटेल . तसेच ज्या व्यक्तींना दोन- तीन पेक्षाही अधिक मुली असेल, तर त्यांनी न कंटाळता त्या मुलींचे संगोपन व्यवस्थित करून उत्तम वर(नवरा) बघुन त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले तर जन्नत  (स्वर्गा)त  माझ्या शेजारी त्यांचं महाल असेल व त्याचा मोबदला त्यांना अत्यंत चांगलाच असेल..

अशाप्रकारे वास्तविकतेचे धडे देत  अल्लाहा (इश्वर) चे  प्रिय  होण्यासाठी सत्कर्म अपेक्षित असल्याचे  सांगितले.

प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांना १)हज.जैनब २)हज.रुकैयया,३) उममे कुलसूम ४) हज.फातिमा रजि.या चार मुलींचे संगोपन करुन त्यावेळच्या प्रतिष्ठित व्यापारी व घराण्यात लग्न करून दिलेत.त्यामध्ये " करबला युध्दातील जगाच्या कल्याणासाठी ७२ हौतात्म्य पत्करलेले हजरत इमाम हुसेन व हजरत इमाम हसन च्या आई हजरत फातिमा रजि. या सर्वांत छोट्या मुलीचा समावेश ही होतो .

हे स्वकर्तृत्वाने जगाला दाखवले.

यामुळे ज्यांच्या घरात मुली जन्माला  होत्या त्यांच्या चेहऱ्यांवर  चेहरे उजळून निघाले.

प्रेषित मुहम्मद स्व. यांनी लोकांकडून  जगप्रसिद्ध  आराफात च्या अंतिम संबोधनात  शपथेवर , "माझ्या जवळ प्रतिज्ञा (शपथ) घ्या की, अल्लाहा शिवाय इतर कोणालाही पुंजणार नाही , चोरी, व्यभिचार करणार नाही, मुलींची - कन्यावध करणार नाही.आपल्या वडिलांच्या संपत्तीतून मुलींचाही हिस्सा - वाटा आहेत. तो द्यावा.  बंधुंनो,पतीचे पत्नीवर हक्क आहे ,तसेच पत्नीचे आपल्या पतीवर हक्क आहे.  पत्नीला (बायकांना) प्रेमाने व सहानुभूतीने सांभाळा ,कठोर निष्ठुर होवू नये, त्यांच्या प्रती दयाळु रहा,  तुम्ही आपल्या अल्लाहाच्या  साक्षीने आपल्या पत्नीला स्विकारले आहे , तर तीची काळजी घ्यावी,  पत्नीचे जे काही आधिकर असतील ते सर्व तीला द्यावे,  तीने तुमच्यावर विश्वास टाकला आहे , तर तीच्या त्या विश्वासाचा विश्वासघात करू नका. तुम्हाला( महाप्रलया) कयामतच्या  दिवशी अल्लाहा समोर आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागेल,या दिवसाची कायम आठवण ठेवा,." ..🌹

असे प्रेषितांनी आपल्या महानिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक  वर्गातील समुहाची व विशेषतः महीलांची तळमळ व्यक्त केली,काळजी घेतली.

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या दुर्मिळ ग्रंथात ;"सार्वजनिक सत्य धर्म "मधे ,पैगंबरांवर पहिला पोवाडा लिहित स्तुती करत लिहीतात की, 

 अर्थ :- - " पैगंबरांनी श्रेष्ठ -कनिष्ठ हा भेद नाकारला,गुलामगिरी नाकारली,जातिभेद,जाती- पाती बुडासकट नष्ट केले,अधर्म आणि भेदाभेद मोडुन काढला,सर्वत्र अभेद-समता, बंधुभाव कायम केला !! 

पैगंबरांनी प्रस्थापित केलेल्या समतेवर जगप्रसिद्ध साहित्यिक व शायर डॉ.इक्बाल लिहीतात की, "एक ही सफ मे खडें हो गऐ मेहमूद और अयाज !! ना कोई बंदा रहा,ना बंदा नवाज !!"

अर्थात :- मस्जिदमधे नमाज अदा करताना एकाच रांगेत देशाचा बादशहा- राष्ट्रपतीच्या खांद्याला खांदा लावून एक गुलाम उभा राहु शकतो,यावेळी कोणं गुलाम नाहीत कोणं मालक नाही,अशी समता - समानता त्यांनी प्रस्थापीत केली.

प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व .यांना ,लिहीता-वाचता येत नव्हते,तरी सुद्धा सर्व अरब प्रदेशात साक्षरतेचे महत्व पटवून संपूर्ण प्रदेश साक्षर केला.

"न भूतो न भविष्यते" घडवलेल्या क्रांतीचे श्रेय स्वतः न घेता सर्व श्रेय हे जगत निर्मात्यां अल्लाहा ला दिलेत.असे म्हणत की, " मी हे सर्व अल्लाहाचेच काम करत आहेत"


लेखक- डॉ.सलीम सिकंदर शेख

बैतुश्शिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर

९२७१६४००१४.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget