Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्यात यावी  प्राँव्हीडंट फंडाची रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी या मागणीसाठी बेलापुर ग्रामपंचायत कर्मचारी  धरणे आंदोलन सुरु केले असुन गटविकास अधिकारी अनंत परदेशी यांच्यासमोर कामगारांनी टोकाची भुमीका घेतल्यामुळे बोलणी फिसकटली वेतनवाढ करण्यात यावी पंधरा महीन्यापासुन थकीत असलेली प्राँव्हीडंट फंडाची रक्कम तातडीने जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य श्रमीक संघाचे काँ.जिवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु केलेले आहे .आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता .कामगार व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात तोडगा काढण्यासाठी गटविकास अधिकारी अनंत परदेशी हे ग्रामपंचायत कार्यालयात आले होते ते येण्यापुर्वी जि प सदस्य शदर नवले, भाजपाचे जेष्ठ नेते,सुनिल मुथा देविदास देसाई प्रफुल्ल डावरे,गावकरी पतसंस्थे चे चेअरमन साहेबराव वाबळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, हाजी इस्माईल शेख, पुरुषोत्तम भराटे,मोहसीन सय्यद,प्रभात कु-हे, शफिक बागवान, विशाल आंबेकर,शफिक आतार,जब्बार आतार  यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे व कामगारांचे नेते जिवन सुरुडे यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी ८००रुपये व २००रुपये अशी एक हजार रुपये पगारवाढ देण्याचे कबुल केले मात्र कामगार हे १२००रुपये पगारवाढ करण्यावर ठाम राहीले त्यामुळे बैठकीत एकमत होवु शकले नाही त्यामुळे बोलणी फिसकटली अन कर्मचारी आंदोलन  सुरुच ठेवण्यावर ठाम राहीले ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी देखील या पुढे आपण पगारवाढ देवु शकत नसल्याचे स्पष्ट केले त्या वेळी बोलताना उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारावर ३५% खर्च करण्याची तरतुद असतानाही बेलापुर ग्रामपंचायत पगारावर ७०% खर्च करते ५०लाख उत्पन्न असुन ३६ लाख रुपये त्याकरीता आगोदरच पगारावर खर्च होत आहे आणखी खर्ख वाढला तर इतर कामे करणे अवघड होईल हे सर्व ग्रामस्थाच्या नजरेसा आणून दिले आहे .८००+ २०० पगारवाढ देतानाही फार कसरत करावी लागणार असल्याचे सरपंच साळवी यांचे म्हणणे आहे तर कामगार नेते जीवन सुरुडे यांच्या मते कोरोनामुळे वसुली झाली नाही याचे निमित्त पुढे करुन कामगारांना पगारवाढ केलेली नाही महागाई भरमसाठ वाढल्यामुळे किमान पंधराशे रुपये  पगारवाढ देण्यात यावी आशी मागणी केली

बेलापूर |प्रतिनिधी|-बेलापूर येथून महाविद्यालयात शिकणार्‍या 17 वर्षांच्या एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीस फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुरी तालुक्यातील चांदेगाव परिसरात मोलमजुरी करणार्‍या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दि. 12 सप्टेंबर रोजी 7.45 ते सकाळी 11.30 च्या दरम्यान आपली 17 वर्षे 4 महिने वयाची बेलापूर येथील महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. लोटके करीत आहेत. नजीकच्या काळात बेलापुरातून अल्पवयीन मुलगी पळवून नेण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

श्रीरामपुर (प्रतिनिधी) १४/९: सोमय्या विद्या विहार प्रणितश्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव येथे १४ सप्टेंबर राष्ट्र भाषा हिंदी दिनानिमित्त राज्यस्तरीय हिंदी वकृत्व स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजने उत्तेजनार्थ तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.मागील दीड वर्षापासून अधिक काळ शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल प्रत्येक वर्षी तिन्ही भाषाची वकृत्व स्पर्धेचे आयोजन करते. यावर्षी हिंदी वकृत्व स्पर्धेसाठी अहमदनगर,नासिक पुणे व औरंगाबाद जिल्ह्यातून २५ शाळांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कुमारी हीरल नितीन जेठवा हिचा विषय होता "समय बडा बलवान " व कुमारी रश्मी मनोज गिडवाणी हिचा विषय होता "आझादी के ७५ साल " दोघींनीही उत्कृष्ट वकृत्व करून ५० स्पर्धकांमध्ये चतुर्थ क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे,सचिव कुमार प्रतिक्षित टेकावडे , प्रा डॉ योगेश पुंड ,पर्यवेक्षक श्री सोलंकी,पर्यवेक्षक सौ जेठवा,पर्यवेक्षक श्री त्रिपाठी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थिनींना ज्येष्ठ हिंदी शिक्षिका शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

वकृत्व_स्पर्धेचा_अंतिम_निकाल

प्रथम क्रमांक : श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव

द्वितीय क्रमांक: आत्मा मलिक स्पेशल इंटिग्रेटेड मिलिटरी स्कूल, कोकमठण 

तृतीय क्रमांक: प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर 

उत्तेजनार्थ पारितोषिक

 १) विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,अहमदनगर

२) सेवा निकेतन कॉन्व्हेन्ट स्कूल, कोपरगाव

३) न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज श्रीरामपूर


बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या अचानक वाढली असुन या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे                                गेल्या काही दिवसापासून गावात मोकाट कुत्रे गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत अज्ञात वहानातुन पहाटेच्या वेळेस टेम्पोतुन हे कुत्रे बाजार तळाजवळ सोडण्यात आल्याचे काही नागरीकांनी पाहीले आहे आता टेम्पोतुन आणलेले हेच कुत्रे टोळक्याने गावात फिरत आहे गावातील कुत्री व नव्यानेच गावात दाखल झालेली कुत्री एकमेकावर हल्ले करत आहे . या मोकाट कुत्र्यापासुन लहान मुले तसेच जनावरांना धोका आहे .मागे काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे प्रवरा पुलाजवळ कुत्रे सोडण्यात आले होते त्या वेळी नागरीकांच्या तक्रारीवरुन ग्रामपंचायतीने मोकाट कुत्री पकडून बाहेरगावी सोडली होती त्याच पध्दतीने पुन्हा मोकाट कुत्रे पकडून न्यावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे या बाबत नुकतेच बेलापुर ग्रामपंचायतीने श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिलेली असुन त्या तक्रारीतही अज्ञात वाहनातुन ही कुत्री सोडण्यात आली असल्याचे म्हाटले आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )-गाव संरक्षणात गणेश विसर्जन शांततेत पार पाडून बेलापूरगावाने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असुन अशा प्रकारे सर्वांनी कृती केल्यास पोलीस खात्यावरील वाढता ताण निश्चितच कमी होण्यास मदत होईल असा विश्वास पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला  बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतक महोत्सव व गणेशोत्सवाचे औचित्य साधुन देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न व्हावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे त्यामुळे त्यांना निमंत्रण देण्यासाठी गावातील शिष्टमंडळ अहमदनगर येथे गेले होते त्या वेळी गावाने आत्तापर्यत वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असुन सर्व धर्मिय प्रार्थना स्थळावरील भोंग्यावरुन राष्ट्रगीत लावण्यात आले होते पंधरा आँगस्टचे ध्वजारोहन सर्व धर्मिय संत महंताच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर गणेशोत्सवा दरम्यान जिवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता सर्व गणेश मंडळ व गणेश भक्तांच्या सहकार्यातुन कसलेही विघ्न न येता मिरवणूक शांततेत पार पडली .त्यामुळे आपण देखावा स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केली चांगले उपक्रम राबविणारे गाव म्हणून बेलापुरची ओळख असुन या कार्यक्रमास निश्चितच येईल असे अश्वासन पोलीसा अधिक्षक मनोज पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले या शिष्टमंडळात जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  पत्रकार देविदास देसाई गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे भाजपाचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे ,गांवकरी पतसंस्थेचे संचालक अजिज शेख मोहासीन सय्यद दादासाहेब कुताळ आदिंचा समावेश होता

श्रीरामपूर प्रतिनिधी-आरोपींना अटक होवून सात दिवस झाले तरी भोकर येथील अपहत दिपक बर्डेचा तपास पोलिसांकडून होवू शकला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासाबाबत आम्हाला शंका आहे. याप्रकरणाचा तपास चांगल्या वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत करावा. असंख्य हिंदू मुलींना गायब करुन त्यांचे धर्मांतर केले जाते. आम्ही किती सहन करायचे? सहन करण्याचे काँन्ट्रॅक्ट फक्त हिंदुंनी घेतले आहे का? यापुढे हिंदुवरील अन्याय सहन केले जाणार नाही, असा इशारा आ. नितेश राणे यांनी दिला.भोकर येथील दिपक बर्डे या तरुणाचे अपहरण करुन घातपात केल्याच्या निषेधार्थ काल सकाळी आ. नितेश राणे व माजीमंत्री आ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. सदरचा जनआक्रोश मोर्चा खा. गोविंदराव आदिक सभागृहापासून संगमनेर रोड, शिवाजी रोडवरुन मेनरोड व अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयात नेण्यात आला आहे. या मोर्चा दरम्यान नगरपरिषदेमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आ. राणे व आ. उईके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या मोर्चात शहर, तालुका तसेच अन्य तालुक्यातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिपक बर्डेचा तपास लावा, धर्मांतर थांबवा, हिंदुवरील अन्याय सहन करणार नाही अशा घोषणा घेत हातात भगवे झेंडे घेवून हा मोर्चा काढण्यात आला होता.अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयात मोर्चा आल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयात आ. नितेश राणे, आ. अशोक उईके यांच्यासह काही कार्यकर्ते जावून त्यांनी या तपासाबाबत शंका उपस्थित करुन इतके दिवस होवूनही हा तपास का लागला नाही? आरोपी अटक होवून सात दिवस झाले तरी पोलिसांना काहीच माहिती मिळाली नाही का? अशा प्रश्‍नांची सरबत्ती केली.आ. राणे यांनी सांगितले की, आजचा मोर्चा माहित असूनही पोलीस निरीक्षक रजेवर गेला आहे. त्याचा अर्थ असा की, या आरोपींशी त्यांचा सहभाग असू शकतो. अशा अधिकार्‍यांची एसआयटी अथवा सीआयडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी विधानसभेत करणार आहोत. असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील धर्मांतर थांबले पाहिजे, अन्यथा वेगळा मार्ग अवलंब करावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

बेलापुर (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलापुर गावाने विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडुन एक नवा इतिहास रचला असुन सन २००७ नंतर दुसऱ्यांदा असा उपक्रम राबविण्यात आला आहे              स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व बेलापुर ग्रामपंचायतीचा शतक महोत्सवाचे औचित्य साधुन बेलापुर  ग्रामस्थांनी पोलीस संरक्षणात नाही तर गाव संरक्षणात गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडण्याचा निर्णय घेतला तसे आश्वासन सर्व ग्रामस्थांनी शंतता कमीटीच्या बैठकीत पोलीस अधीकाऱ्यांना दिले होते त्या करीता पुर्व तयारी म्हणून बेलापुर पोलीस स्टेशन येथे दोन दिवस आगोदर सर्व गणेश मंडळ प्रमुख व नेते मंडळीच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीतही

विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन करण्याच्या निर्णयावर ग्रामस्थ ठाम राहीले .त्यामुळे बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके यांनी सर्व ग्रामस्थ व गणेश मंडळे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे वरीष्ठांना कळवीले तरीही खबरदारी म्हणून  नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बेलापुरातील मुख्य जाम मस्जिदसमोर बंदोबस्तासाठी आले असता मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोहसीन सय्यद यांनी पत्रकार देविदास देसाई यांना कळविले की आपण आपल्या संरक्षणात गणेश विसर्जन मिरवणूक करणार आहोत परंतू या ठिकाणी पोलीस आलेले आहेत पत्रकार देसाई यांनी तातडीने पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचेशी सांपर्क साधला व तेथुन पोलीस बंदोबस्त हटविण्याची विनंती केली त्यानंतर तातडीने सर्व पोलीस पोलीस स्टेशनला गेले.सकाळी जे.टी. एस.हायस्कुल च्या गणेशाची विसर्जन मिरवणुक संपन्न झाली.शाळेच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधले.सायंकाळी साडेचार वाजता गणेश विसर्जन मिरवणूकीस सुरुवात झाली बेलापुरातील मुख्य झेंडा चौकात सर्वात प्रथम मेहेत्रे वस्ती येथील गणराज मित्र मंडळाची मिरवणूक आली या मंडळाने झेंडा चौकाला वळसा घालुन नगररोडनेच मिरवणूक नेली त्यानंतर छत्रपती तरुण मंडळाची मिरवणूक आली झेंडा चौकात आल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली या आरतीसाठी सर्व ग्रामस्थ जमा झाले होते त्यांनतर हिंदु संघटक विर सावरकर मित्र मंडळाचा गणपती होता त्या पाठोपाठ श्रीराम हेल्थ क्लब ,लक्ष्मी नारायण नगर मित्र मंडळाचा गणपती ,सर्वात शेवटी रामराज्य मित्र मंडळाचा गणपती होता  झेंडा चौकात मिरवणूक आल्यानंतर मा  जिं प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड,माजी सरपंच भरत साळुंके,गावकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,हाजी ईस्माईल शेख,विलास मेहेत्रे,चंद्रकांत नाईक, मोहसीन सय्यद,बाबुलाल पठाण,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,मोहसीन ख्वाजा शेख अजिज शेख, पुरुषोत्तम भराटे,पोलिस पाटील अशोक प्रधान,शिवाजी वाबळे,पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम,महेश कु-हे,दादासाहेब कुताळ,विशाल आंबेकर,सचिन वाघ,अमोल गाडे आदि मान्यवरांच्या हस्ते   गणपती बाप्पाची पुजा करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. मिरवणूकीचे वैशिष्ट्य म्हणून प्रत्येक मंडळाने स्वतंत्र वाद्य लावले होते सर्व मंडळाची मिरवणूक वाजत गाजत बेलापुरच्या मुख्य जामा मस्जिद समोर आली असता मुस्लिम बांधवांच्या वतीने सर्व मंडळाच्या गणपती बाप्पांना पुष्पहार अर्पण करण्यात आले .दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा करण्यास मिळाल्यामुळे सर्व  मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मनसोक्त आंनद लुटला सर्व मंडळांनी वाजत गाजत रात्री दहा वाजता छत्रपती तरुण मंडळाच्या गणपतीचे विसर्जन झाले त्या पाठोपाठ सर्व मंडळांनी शांततेत गणेश विसर्जन केले कसलाही पोलीस बंदोबस्त न घेता गावाच्या संरक्षणात शांततेत मिरवणूक पार पाडण्याचा मान नगर जिल्ह्यात बेलापुर गावाने सर्व प्रथम मिळवीला .या पुर्वी सन २००७ मध्येही असाच उपक्रम राबविण्यात आला होता त्यानंतर सर्व ग्रामस्थ व मंडळाचे कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्यातुन गाव संरक्षणात कसलीही वादावादी न होता आनंदात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी देखील ग्रामस्थांच्या अवाहनाला प्रतिसाद देत मिरवणूक शांततेत पार पाडण्याकामी विशेष सहकार्य केले . अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी ग्रामस्थांचे तसेच सर्व गणेश मंडळाचे आभार मानले आहे .गणेश विसर्जन झाल्यानंतर सर्व मंडळाचे आभार व्यक्त करण्यात आले या वेळी मा जि प सदस्य शरद नवले पत्रकार देविदास देसाई पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल डावरे विष्णूपंत डावरे हाजी ईस्माईल शेख मोहसीन सय्यद भाजपाचे प्रफुल्ल डावरे आदिनी सर्व गणेश मंडळांना धन्यवाद दिले तसेच गावाकरीता आपले मतभेद बाजुला ठेवुन अशाच प्रकारे एक राहण्याचेही अवाहन करण्यात आले.बेलापुर ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभाग कामगारांनी निर्माल्य गोळा करण्याचे काम केले तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन स्थळी लाईट व सुरक्षा कठडे लावण्यात आले होते. त्याचप्रमाणाने पोहणारे तरुण देखील सज्ज ठेवण्यात आले होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget