Latest Post

श्रीरामपूर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष, दै.जय बाबा व विठ्ठल प्रभा वर्तमानपत्राचे संस्थापक,भारत सरकार नोटरी,ॲडव्होकेट श्री.शंकरराव बाळाजी आगे यांचे आज दि.०७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०८:४५ वा वृद्धापकाळाने वयाच्या ७७ व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी आज दि.०७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०४:००वा  अमरधाम,श्रीरामपूर येथे होईल.

- अंत्ययात्रा सप्तश्रृंगी निवास,बजरंगनगर,बेलापूर रोड,वार्ड नं-०७,श्रीरामपूर येथुन निघेल.

बेलापुर  ( वार्ताहर ) श्रीरामपुर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या टाकळीभान ग्रामपंचायतीचे एकाच वेळेस दहा सदस्य अपात्र ठरविण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असुन घुमनदेव नंतर टाकळीभानचे सदस्य  अपात्र झाले असुन आता तालुक्याबरोबरच जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे              घुमनदेव ग्रामपंचायतीचे तीन सदस्य सरकारी जागेत अतिक्रमण केल्यामुळे अपात्र झाल्यानंतर आता राजकिय प्रतिष्ठा असलेल्या व नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या १० सदस्यांवर सरकारी जागेत अतिक्रमण केल्याच्या कारणाने ग्रामपंचायत आधिनियमातील तरतुदी नुसार सदस्यपदी रहाण्यास अपाञ ठरवले आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमच एवढीमोठी कारवाई झाल्याने व सरपंच व उपसरपंच एकाच वेळी अपाञ झाल्याने ग्रामपंचायत कामकाजाचा गुंता वाढल्याने पुन्हा प्रशासकिय राज सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत.

           टाकळीभान ग्रामपंचायतीची १८ जानेवारी २०२१ ला मोठी चुरशीची निवडणुक झाली होती. जिल्हाभर या निवडणुकिची चर्चा रंगली होती.  माजी सभापती नानासाहेब पवार यांची एकहाती सत्ता मतदारांनी उलथुन टाकत निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या तरुण उमेद्वारांच्या बाजुने  कौल देत १७ पैकी १६ सदस्य विजयी करुन एकहाती सत्तेच्या चाव्या दिल्या होत्या. महाविकास आघाडीत माजी आ. भानुदास मुरकुटे गटाचे संख्याबळ जास्त असल्याने सरपंच व उपसरपंच निवडीत मुरकुटे गटाने बाजी मारली होती  माञ मुरकुटे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना व स्थानिक गावपुढार्यांना हा आनंद फार काळ पचवता आला आला नाही. गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायत कारभारात अंतर्गत धुसफुस सुरु झाल्याने कलह वाढत गेला.

           नुकत्याच निवडुन आलेल्या १० ग्रामपंचायत सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण करुन रहात असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ ( १ )( ज - ३ ) व १६ प्रमाणे या सदस्यांची झालेली निवड बेकायदेशिर असल्याने त्यांचे सदस्यत्व कायद्याने अपाञ झाले आहे टाकळीभान ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण  केले असुन त्याचे सदस्यपद रद्द करावे असा विवाद अर्ज २९ जुन २०२१ रोजी जेष्ठ शिवसेना नेते राधाकृष्ण वाघुले यांनी प्रभाग १ च्या सदस्या सविता पोपट बनकर, प्रभाग २ चे अशोक लालचंद कचे, सुनिल तुकाराम बोडखे व लता भाऊसाहेब पटारे, प्रभाग ३ चे संतोष अशोक खंडागळे व अर्चना शिवाजी पवार, प्रभाग ४ चे सरपंच अर्चना यशवंत रणनवरे व कल्पना जयकर मगर, प्रभाग ५ च्या कालिंदा बाबासाहेब गायकवाड व दिपाली सचिन खंडागळे यांच्या विरोधात विवाद अर्ज अहमदनगर येथील अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात दाखल केला होता.

      या दाखल विवाद अर्जाची वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात घेण्यात आली. गटविकास आधिकारी श्रीरामपुर यांनी या प्रकरणी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करुन जिल्हाधिकारी यांना आहवाल सादर केला होता. या सर्व पुराव्यांच्या कागदपञांची पडताळणी करुन जिल्हाधिकारी यांनी तक्रारदार राधाकृष्ण वाघुले यांचा विवाद आर्ज मंजुर करत वरील पैकि १० सदस्यांना सदस्यपदी रहाण्यास आपाञ ठरवत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे लेखी आदेश दिले आहेत. तर विभागिय आयुक्तांकडे अपिलासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.

         या निर्णयामुळे सतरा सदस्य आसलेल्या या ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचासह १० सदस्य आपाञ ठरवले गेल्याने व त्यांचे सदस्यपद रद्द झाल्याने  केवळ ७ सदस्य उरले आहेत. त्यामुळे या सदस्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याने व आर्थिक व्यवहार ठप्प होणार आसल्याने ग्रामपंचायतीवर पुन्हा प्रशासकाची नियुक्ति होवुन प्रशासकिय राज सुरु होणार का ? याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आसल्याने सरकारी जागेत अतिक्रमण करुन रहाणार्या सदस्यांचे धाबे दणानले आहे. जिल्हाधिकारी यांच्या या निकालामुळे विरोधी गटात माञ खुशी निर्माण झाली आहे.

 जिल्हाधिकारी यांनी केलेल्या या कारवाईमुळे ग्रामपंचायतीचा प्रभाग क्रमांक २ व ३ चे सर्व सदस्यांचे सदस्यपद रद्द झाल्याने हे दोन्ही प्रभाग पोरके झाले आहेत तर प्रभाग ४ मधील सरपंचासह दोन महीला, प्रभाग १ मधील एक महीला तर प्रभाग ४ मधील दोनमहीला आपाञ झाल्या आहेत. प्रभाग ६ माञ सुरक्षित राहीला आहे. या १० सदस्यांच्या अपाञञेत ७ महीला सदस्य अपाञ ठरल्या आहेत. सभासदत्व रद्द झालेल्या दहा सदस्यांनी निवडणुकित प्रतिज्ञा पञ सादर करताना चुकिची माहीती देवुन शासनाची फसवणुक केलेली असल्यामुळे हे सदस्य अपात्र करावेत अशी मागणी शिवसेनेचे राधाकृष्ण वाघुले यांनी केली होती

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-श्रीरामपुरातील एक तरूणी 40 दिवसांपासून बेपत्ता असूनही तिचा तपास लागला नाही. हा ‘लव जिहाद’चाच प्रकार असल्याने या प्रकरणाचा तपास करून आरोपीला शोधून त्याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज श्रीरामपुरात शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने तसेच समस्त हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. येत्या 4 दिवसात जर सदर आरोपीचा तपास लागला नाही तर शहरातील व्यापार्‍यांशी चर्चा करून श्रीरामपूर बंदचे आवाहन करण्यात येईल, असा इशारा शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पेालीस अधिकारी सूरजभाई आगे यांनी दिला आहे.

एका कॉलेज तरूण मुलीला मुस्लिम समाजाच्या एका तरूणाने पळवून नेलेले आहे परंतू, पोलीस ठाण्यात याबाबत फक्त मिसिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर प्रकार हा लव जिहादचा असल्याने सदर तरूणाचा शोध घेवून कारवाई करण्यासाठी मुलीच्या कुटूंबीयांनी अनेकदा निवेदनं दिले परंतू मुलीचा तपास न लागल्याने आज या प्रकरणी शिवप्रहार प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठया संख्येने तरूण सहभागी झाले होते. श्रीरामपूर शहरात लव जिहादचे प्रकार वाढत असून याला वेळीच आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. शहरात एका मुलीला पळवून नेले जाते, त्यांचे कुटूंबीय पोलीसांकडे निवेदन देवून मागणी करते. त्यांना न्याय मिळत नाही म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढतो तर आम्हालाच उलट नोटीसा दिल्या जातात. मग लोकशाही मार्गानेही न्याय मागायचा नाही का? अशाप्रकारे न्याय मागणार्‍यांना नोटीसा देवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न  केल्यास भविष्यात कोणी कोणाला न्याय मिळवून देण्यासाठी उभे राहणार नाही. हे लोकशाहीच्या आणि न्यायाच्या दृष्टीने चुकीचे आहे, असे सांगत सूरजभाई आगे म्हणाले, येत्या 4 दिवसात जर सदर प्रकरणाचा तपास न लागल्यास आणि आरोपीला अटक न झाल्यास शहरातील व्यापारी वर्गाशी विचारविनिमय करून श्रीरामपूर बंद बाबतचा निर्णय किंवा लोकशाही मार्गाने अन्य आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल, असे यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सूरजभाई आगे यांनी सांगितले. यावेळी पोनि. हर्षवर्धन गवळी, सपोनि. बोर्से यांना मागणीचे रितसर निवेदन देण्यात आले.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-शासनावर येणारा आर्थिक भार कमी होण्याच्या दृष्टीने तसेच योग्य व गरजु लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळावा या करीता सधन व्यक्तीनी अनुदानातुन बाहेर पडावे असे अवाहन श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे             शासनाने गरजु व्यक्तीना कमी दरात अन्नधान्य उपलब्ध करुन दिले असुन आजही बरेच लाभार्थी शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेपासुन दुर आहे गाव व शहर निहाय ठरवुन दिलेला ईष्टांक पुर्ण झाल्यामुळे गरजुंना लाभ देणे शक्य होत नाही . अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे कालांतराने उत्पन्न वाढले असेल तर त्यांनी या योजनेतुन बाहेर पडावे आपण असे केल्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याकरीता शासनावर येणारा आर्थिक भार कमी होणार आहे आपण आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे त्या निमित्ताने कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातील व्यक्ती शासकीय निमशासकीय स्तरावर नोकरी करत असेल कुणी व्यापारी उद्योजक असाल आपले उत्पन्न वाढलेले असेल आपण सधन असाल तर आपण स्वताःहुन अन्नधान्याचा लाभ सोडावा .आपले आधार कार्ड  सर्व ठिकाणी लिंक करण्यात आलेले आहे त्यामुळे कुणीही आपले उत्पन्न लपविण्याचा प्रयत्न करु नये. सधन व्यक्तीनी स्वेच्छेने अनुदानाचा लाभ सोडावा या करीता असणारा फाँर्म संबधीत स्वस्त धान्य दुकानदार श्रीरामपुर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग झेराँक्स सेंटर यांच्याकडे उपलब्ध आहेत.  शहरी भागाकरीता 59 हजार रुपये व ग्रामीण भागाकरीता 44 हजार रुपये उत्पन्नाची अट ठेवण्यात आलेली असुन या पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या सधन व्यक्तींनी  धान्याचा लाभ सोडावा असे अवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे .


औरंगाबाद प्रतिनिधी-माननीय श्री एचआय शेख सर यांची मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र

प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे व श्री के ए काजी यांची सीनियर

उपाध्यक्ष पदी महाराष्ट्र प्रदेश निवड करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत गिरी यांनी नियुक्ती पत्र देवून

यांचे अभिनंदन केले. हे सगठन सामान्य माणसाला

न्याय मिळवून देण्यासाठी व अन्याय अत्याचार च्या

विरुद्ध काम करेल असे महाराष्ट्र अध्यक्ष एच. आय. शेख

सर यांनी सांगितले व लवकरच मानव अधिकार परीषद ची महाराष्ट्र कार्यकारणी

जाहीर करण्यात येईल असे शेख सर यांनी सांगितले.

एच. आय. शेख सर

श्री के ए काजी

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नाचा स्रोत वाढावा म्हणून शासनाने अनेक व्यवसाय धान्य दुकानाच्या माध्यमातून सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असुन त्या करीता सर्व परवाना धाराकांनी आपली दुकाने आयएसओ मानांकनासाठी सज्ज ठेवावी असे अवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी केले                 आयएसओ मानांकन व विविध व्यवसाय प्रशिक्षण संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी म्हणाल्या की सर्व सामान्य नागरीकांचा स्वस्त धान्य दुकानदारांशी कायमचा संपर्क असतो त्यातच धान्य दुकानदारांना तुटपुंज्या प्रमाणात कमिशन मिळत असल्यामुळे  दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ व्हावी तसेच नागरीकांना चांगली सेवा मिळावी या हेतूने शासनाने सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काँमन सर्व्हिस सेंटरचा परवाना देण्याचा निर्णय घेतला असुन या माध्यमातून दुकानदारांना अनेक व्यवसाय करण्याची परवानगी मिळणार आहे मात्र त्याकरीता प्रत्येक दुकान हे आयएसओ मानांकन होणे आवश्यक आहे त्यामुळे दुकानदारांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दुकानाची स्वच्छता रंगरंगोटी करुन घ्यावी दुकानदारांना ठरवुन दिलेले फलक तातडीने दुकानात लावावेत दुकानात सीसीटीव्ही कँमेरे लावणे बंधनकारक आहे या सर्व बाबींची तातडीने पुर्तता करुन दुकाने आयएसओ मानांकनासाठी तयार ठेवावी असे अवाहनही माळी यांनी केले या वेळी स्टेशनरी पासून ते खात्यात पैसे भरणे पैसे काढणे रेशनकार्डात नाव दाखल करणे नाव कमी करणे दुबार रेशनकार्ड काढणे दोन चाकी चार चाकी गाडी बुक करणे आरोग्यविषयक माहीती घेणे  विमा उतरविणे गँस सिलेंडर मिळविणे विविध प्रकारचे दाखले मिळविणे या बाबत प्रात्याक्षीकासह विविध कंपन्यांच्या वतीने माहीती सादर करण्यात आली या वेळी मच्छिंद्र चितळे अशीष विर महेश वाघमारे विवेक कुलकर्णी विनोद अहीरे आदिंनी विविध योजनांची माहीती दिली या वेळी पुरवठा निरीक्षण अधिकारी राजेंद्र राऊत दत्तात्रय भावले कार्यालयीन प्रतिनिधी  मनिष सचदेव अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई सचिव रज्जाक पठाण तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले अनिल मानधना नगर तालुकाध्यक्ष विश्वासराव जाधव नगर शहरचे अध्यक्ष बाळासाहेब दिघे दिलीप गायके अजीज शेख बबलु गवारे एकनाथ थोरात आदिसह तालुका पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांनी केले तर पुरवठा निरीक्षण अधिकारी अभिजीत वांडेकर यांनी आभार मानले

श्रीरामपूर प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड शहरातील व्ही.आय.पी.गेस्ट हाऊस येथे पार पडलेल्या बैठकीत अध्यक्ष म्हणून अमितराज आहेर तर उपाध्यक्ष पदी सचिन पतंगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.*

फोटोग्राफर बंधूंच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन ची स्थापना करण्यात आलेली असल्याने येत्या काळात संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक फोटोग्राफर साठी योग्य ते कार्य करण्याचा प्रयत्न राहीन असा आत्मविश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष अमितराज आहेर यांनी व्यक्त केला.तर गेल्या 2-3 वर्षात फोटोग्राफर तसेच संघटनेची जी हानी झालेली आहे ती भरून काढून नवीन काळात झालेले बदल फोटोग्राफर ला समजावे या साठी विविध कार्यशाळेचे आयोजन देखील मी या काळात घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील आहेर यांनी सांगितले. तर उपाध्यक्ष पदी नियुक्त झालेले सचिन पतंगे यांनी अध्यक्ष यांची खांद्याला खांदा लावून संघटना वाढीसाठी मी माझे पूर्ण योगदान देईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.झालेल्या बैठकीत संघटना श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे नियम, काम करण्याची पध्दत, संचालक मंडळ निवड या बाबत ची माहीत संघटनेचे सचिव अतिष देसर्डा यांनी नवीन फोटोग्राफर सदस्यांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण जमधडे यांनी केलेयावेळी या बैठकीचे अध्यक्ष जेष्ठ फोटोग्राफर राजू भावसार यांनी उपस्थित फोटोग्राफर मित्रांना मार्गदर्शन केले.प्रसंगी सुशील रांका,तिलक डुंगरवाल,काका गुलाटी,भानुदास बेरड ,गौरव शेटे अभिषेक पंडुरे , सतिष गायकवाड , सचिन गायकवाड ,वैभव पुंगे ,  अक्षय कुमावत,शाहरुख शेख ,विपुल तोरणे , गणेश यादव , संतोष लोखंडे , सुनील बोर गे,वीरेंद्र बागडे , सचिन परदेशी ,अतुल सोनमाळी, लक्ष्मण दाभाडे, हरी शिरसाट, भाऊसाहेब भोसले , प्रवीण जमधडे , ललित गवारे , सागर बावस्कर,आदी*

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget