फोटोग्राफर बंधूंच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन ची स्थापना करण्यात आलेली असल्याने येत्या काळात संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक फोटोग्राफर साठी योग्य ते कार्य करण्याचा प्रयत्न राहीन असा आत्मविश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष अमितराज आहेर यांनी व्यक्त केला.तर गेल्या 2-3 वर्षात फोटोग्राफर तसेच संघटनेची जी हानी झालेली आहे ती भरून काढून नवीन काळात झालेले बदल फोटोग्राफर ला समजावे या साठी विविध कार्यशाळेचे आयोजन देखील मी या काळात घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील आहेर यांनी सांगितले. तर उपाध्यक्ष पदी नियुक्त झालेले सचिन पतंगे यांनी अध्यक्ष यांची खांद्याला खांदा लावून संघटना वाढीसाठी मी माझे पूर्ण योगदान देईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.झालेल्या बैठकीत संघटना श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे नियम, काम करण्याची पध्दत, संचालक मंडळ निवड या बाबत ची माहीत संघटनेचे सचिव अतिष देसर्डा यांनी नवीन फोटोग्राफर सदस्यांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण जमधडे यांनी केलेयावेळी या बैठकीचे अध्यक्ष जेष्ठ फोटोग्राफर राजू भावसार यांनी उपस्थित फोटोग्राफर मित्रांना मार्गदर्शन केले.प्रसंगी सुशील रांका,तिलक डुंगरवाल,काका गुलाटी,भानुदास बेरड ,गौरव शेटे अभिषेक पंडुरे , सतिष गायकवाड , सचिन गायकवाड ,वैभव पुंगे , अक्षय कुमावत,शाहरुख शेख ,विपुल तोरणे , गणेश यादव , संतोष लोखंडे , सुनील बोर गे,वीरेंद्र बागडे , सचिन परदेशी ,अतुल सोनमाळी, लक्ष्मण दाभाडे, हरी शिरसाट, भाऊसाहेब भोसले , प्रवीण जमधडे , ललित गवारे , सागर बावस्कर,आदी*
फोटोग्राफर संघटनेच्या अध्यक्ष पदी आहेर तर उपाध्यक्ष पदी पतंगे यांची निवड
श्रीरामपूर प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड शहरातील व्ही.आय.पी.गेस्ट हाऊस येथे पार पडलेल्या बैठकीत अध्यक्ष म्हणून अमितराज आहेर तर उपाध्यक्ष पदी सचिन पतंगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.*
Post a Comment