Latest Post

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नाचा स्रोत वाढावा म्हणून शासनाने अनेक व्यवसाय धान्य दुकानाच्या माध्यमातून सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असुन त्या करीता सर्व परवाना धाराकांनी आपली दुकाने आयएसओ मानांकनासाठी सज्ज ठेवावी असे अवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी केले                 आयएसओ मानांकन व विविध व्यवसाय प्रशिक्षण संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी म्हणाल्या की सर्व सामान्य नागरीकांचा स्वस्त धान्य दुकानदारांशी कायमचा संपर्क असतो त्यातच धान्य दुकानदारांना तुटपुंज्या प्रमाणात कमिशन मिळत असल्यामुळे  दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ व्हावी तसेच नागरीकांना चांगली सेवा मिळावी या हेतूने शासनाने सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काँमन सर्व्हिस सेंटरचा परवाना देण्याचा निर्णय घेतला असुन या माध्यमातून दुकानदारांना अनेक व्यवसाय करण्याची परवानगी मिळणार आहे मात्र त्याकरीता प्रत्येक दुकान हे आयएसओ मानांकन होणे आवश्यक आहे त्यामुळे दुकानदारांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दुकानाची स्वच्छता रंगरंगोटी करुन घ्यावी दुकानदारांना ठरवुन दिलेले फलक तातडीने दुकानात लावावेत दुकानात सीसीटीव्ही कँमेरे लावणे बंधनकारक आहे या सर्व बाबींची तातडीने पुर्तता करुन दुकाने आयएसओ मानांकनासाठी तयार ठेवावी असे अवाहनही माळी यांनी केले या वेळी स्टेशनरी पासून ते खात्यात पैसे भरणे पैसे काढणे रेशनकार्डात नाव दाखल करणे नाव कमी करणे दुबार रेशनकार्ड काढणे दोन चाकी चार चाकी गाडी बुक करणे आरोग्यविषयक माहीती घेणे  विमा उतरविणे गँस सिलेंडर मिळविणे विविध प्रकारचे दाखले मिळविणे या बाबत प्रात्याक्षीकासह विविध कंपन्यांच्या वतीने माहीती सादर करण्यात आली या वेळी मच्छिंद्र चितळे अशीष विर महेश वाघमारे विवेक कुलकर्णी विनोद अहीरे आदिंनी विविध योजनांची माहीती दिली या वेळी पुरवठा निरीक्षण अधिकारी राजेंद्र राऊत दत्तात्रय भावले कार्यालयीन प्रतिनिधी  मनिष सचदेव अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई सचिव रज्जाक पठाण तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले अनिल मानधना नगर तालुकाध्यक्ष विश्वासराव जाधव नगर शहरचे अध्यक्ष बाळासाहेब दिघे दिलीप गायके अजीज शेख बबलु गवारे एकनाथ थोरात आदिसह तालुका पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांनी केले तर पुरवठा निरीक्षण अधिकारी अभिजीत वांडेकर यांनी आभार मानले

श्रीरामपूर प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड शहरातील व्ही.आय.पी.गेस्ट हाऊस येथे पार पडलेल्या बैठकीत अध्यक्ष म्हणून अमितराज आहेर तर उपाध्यक्ष पदी सचिन पतंगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.*

फोटोग्राफर बंधूंच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन ची स्थापना करण्यात आलेली असल्याने येत्या काळात संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक फोटोग्राफर साठी योग्य ते कार्य करण्याचा प्रयत्न राहीन असा आत्मविश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष अमितराज आहेर यांनी व्यक्त केला.तर गेल्या 2-3 वर्षात फोटोग्राफर तसेच संघटनेची जी हानी झालेली आहे ती भरून काढून नवीन काळात झालेले बदल फोटोग्राफर ला समजावे या साठी विविध कार्यशाळेचे आयोजन देखील मी या काळात घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील आहेर यांनी सांगितले. तर उपाध्यक्ष पदी नियुक्त झालेले सचिन पतंगे यांनी अध्यक्ष यांची खांद्याला खांदा लावून संघटना वाढीसाठी मी माझे पूर्ण योगदान देईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.झालेल्या बैठकीत संघटना श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे नियम, काम करण्याची पध्दत, संचालक मंडळ निवड या बाबत ची माहीत संघटनेचे सचिव अतिष देसर्डा यांनी नवीन फोटोग्राफर सदस्यांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण जमधडे यांनी केलेयावेळी या बैठकीचे अध्यक्ष जेष्ठ फोटोग्राफर राजू भावसार यांनी उपस्थित फोटोग्राफर मित्रांना मार्गदर्शन केले.प्रसंगी सुशील रांका,तिलक डुंगरवाल,काका गुलाटी,भानुदास बेरड ,गौरव शेटे अभिषेक पंडुरे , सतिष गायकवाड , सचिन गायकवाड ,वैभव पुंगे ,  अक्षय कुमावत,शाहरुख शेख ,विपुल तोरणे , गणेश यादव , संतोष लोखंडे , सुनील बोर गे,वीरेंद्र बागडे , सचिन परदेशी ,अतुल सोनमाळी, लक्ष्मण दाभाडे, हरी शिरसाट, भाऊसाहेब भोसले , प्रवीण जमधडे , ललित गवारे , सागर बावस्कर,आदी*


भारतीय  लहुजी सेना  अहमद नगर जील्हा प्रमुख  रज्जाक  भाई  शेख यांच्या घरी पोळा हा सन साजरा करन्यात आला त्या प्रसंगी लहुजी सेने चे बाळासाहेब बागुल हानीफभाई  पठान  प्रशांत भाऊ सलून वाले अशपाक फीटर शींपी शेठ सुफीयान भाई दीलीप राव प्रकाश गायकवाड़  शेरू भाई आदी मान्यवर उपस्थित होते

श्रीरामपूर : ३ ते ४ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यां पासून, प्रशासन देखील तैयारीला लागले आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा या करिता पोलीस, महसूल,महावितरण,नगरपरिषद यासह तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील वाहतुक व्यवस्था, अखंडित विद्युप्रवाह,विसर्जन व्यवस्था, मोकाट जनावरे,सुरक्षा दृष्टीने पोलीस बंदोबस्त. यासह अनेक विषयांवर उपस्थित मान्यवरांनी आपले मत मांडले. यावेळी मांडलेल्या विविध विषय व प्रश्ना संदर्भात, सकारत्मक निर्णय घेण्यात येईल असावं असे आश्वासन, प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. प्रशासकीय इमारत याठिकाणी झालेल्या बैठकीस, प्रांताधिकारी अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, मुख्याधिकारी गणेश शिंदे ,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, आदी अधिका-यांसह, अहमदभाई जहागीरदार, कामगारनेते नागेशभाई सावंत,जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, नाऊरचे सरपंच संदीप शेलार,बेलापूरचे उपसरपंच अभिषेक, खंडागळे,समाजवादी पार्टीचे जोयफ जमादार ,आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, माजी नगरसेवक मुक्तार शाह, कुणाल करंडे,कैलास बोर्डे, सतीश सौदागर, रियाज पठाण, पत्रकार अस्लम बिनसाद, पत्रकार देविदास देसाई, आदींसह तालुक्यातुन मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

श्रीरामपूर प्रतिनिधी-Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की नगर ते औरंगाबाद जाणारे रोड वर वडाळा  बहिरोबा शिवारातील हॉटेल साई सबुरीचे पाठीमागे काही इसम हे अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत आहेत त्यानुसार त्यांनी लगेच आपले पथकातील अधिकारी, अंमलदार आणि नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांच्या समवेत पुरवठा विभागातील कर्मचारी यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी खालील वर्णनाचा व किमतीचा अवैध मुद्देमाल मिळून आला. -1) 5,00,000 रू कि चा .   एक अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो क्रमांक MH 16 CC 2488 जु.वा कि.अं.2) 2,08,000 रू.कि च्या भारत गँसच्या  अर्धवट निळ्या रंगाच्या कमर्शिअल मोकळ्या 87 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेच्या जु.वा .कि.अं3) 12,000रू कि.च्या नोझलला लावलेल्या इंडियन गँसच्या  कमर्शिअल मोकळ्या 5 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेच्या जु.वा .कि.अं. 4) 2500 रू कि.चा एक HP कंपनीची घरघुती गँस सिलेन्डर 14.5किलो क्षमतेचा अंदाजे 5किलो गँस असलेला जु वा कि.अं.5) 1,32,000रू किमतीचे टेम्पोमध्ये  भरलेल्या भारत गँसच्या  अर्धवट निळ्या रंगाच्या कमर्शिअल भरलेले 30 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेचे  जु.वा .कि.अं 6)22,000 रू.कि चे टेम्पोमध्ये  भरलेले इंडियन गँसचे अर्धवट निळ्या रंगाचे कमर्शिअल 05गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेचे  जु.वा .कि.अं 7)1200रू कि.चे निळ्या रंगाचा अंदाजे 5 फुट लांबीचा प्लास्टीक पाईप त्याला पांढ-या रंगाचे 06 नळ्या जोडलेल्या असुन प्रत्येक नळीला समोरील तोंडास नोझल जोडलेले जु.वा कि.अं. 8)1000 रू कि.चे एक 2इंच व्यासाचा लोखंडी पाईप त्याला काळ्या रंगाचे अंदाजे अर्धा इंचाचे व 5फुट लांबीचे काळ्या रंगाचे प्लास्टीकचे पाईप जोडलेले असुन त्यांना प्रत्येक पाईपला एक असे  05 नोझल जु.वा कि.अं. 9)2500रू कि.चे काळ्या रंगाचा अंदाजे दिड इंच व्यासाचा अंदाजे 25ते 30 फुट लांबीचा  रबरी पाईप जोडलेला असुन त्याच्या पुढील बाजुस लोखंडी साँकेट जोडलेले असा एकूण सुमारे नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानुसार आरोपी विरुद्ध पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांचे फिर्यादीनुसार शनिशिंगणापूर गु.र.नं -97/2022भादवी कलम 379,285,34 सह जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3,7 सह LPG पुरवठा वितरन आणि नियमन आदेश 2000 चे कलम 3,4,5,6,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली Dysp  संदीप मिटके , नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, पुरवठा अधिकारी रुपाली मोडसे, Api  रामचंद्र करपे,Asi  राजेंद्र आरोळे,Hc ज्ञानेश्वर माळवे, रमेश लबडे, संतोष वाघ,Pc नितीन शिरसाठ आदींनी केली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अधिवेशन संपल्यावर लवकरच जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या व रेशन कार्डधारकांच्या अडचणी समजुन घेवुन त्या सोडविण्याचा प्रयत्न करु असे अश्वासन महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा .यांनी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेला दिले अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवुन दुकानदारांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या .या वेळी  दुकानदारांच्या विविध अडचणी मांडताना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी सांगितले की जिल्ह्यात वेळेवर धान्य वहातुक न झाल्यामुळे अनेक दुकानदारांना महीना संपल्यावर धान्य उपलब्ध  होते. महीना बदलल्यामुळे ते धान्य मशिनवर दिसु शकत नाही. त्यामुळे धान्य असुनही कार्डधारकांना त्याचे वाटप करता येत नाही. पर्यायाने कार्डधारकांचे धान्य बुडते. त्यामुळे धान्य वहातुक सुरळीत करण्यात यावे गेल्या काही महीन्यापासून धान्य वाटप करण्याच्या पाँज मशिनला अनेक अडथळे येत असल्यामुळे दुकानदारांना धान्य वाटप करणे मुश्कील झाले आहे धान्य असुनही वाटप करता न आल्यामुळे दुकानदारांना कार्डधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे .माल आल्यानंतर तो वेळेवर मशिनवर टाकला जात नाही दुकानदारांनी मोफत धान्य वाटप केले परंतु त्याचे मार्जिन अद्यापही दुकानदारांना मिळालेले नाही राज्य शासनाने मे 2021मध्ये मोफत धान्य देण्याचे जाहीर केले त्याचे पैसे दुकानदारांनी भरलेले होते ते कमिशनसह परत मिळावे दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी अशा मागण्या दुकानदारांच्या शिष्टमंडळाने  नामदार राधाकृष्ण विखे पा यांच्याकडे केल्या. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, सचिव रज्जाक पठाण, प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरगे ,श्रीरामपुर धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, राहाता तालुकाध्यक्ष ज्ञानदेव वहाडणे, गणेश येलम ,श्रीकांत म्हस्के, कृष्णा गागरे, बाळासाहेब धनवटे ,अजीज शेख, किशोर चेचरे आदिंचा समावेश होता

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये अल्पवयीन मुलीस पळवून नेवून धर्मांतर करुन निकाह करत अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी मुल्ला कटर व त्याच्या टोळीला पुढे कोणतेही गुन्हे उघडकीस येवू नये म्हणून मदत केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेले श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी  निलंबीत केले आहे.श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मधील अहिल्यादेवीनगर भागात राहणार्‍या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेवून तिचे धर्मांतर करत तिच्याबरोबर निकाह करुन सलग तीन वर्षे तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुल्ला कटरसह आणखी तिघा जणांविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते पोलीस कोठडीत असून त्याप्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्याकडे होता.या प्रकरणाचा तपास करत असताना असेच आणखी काही गुन्हे उघडकीस येत असल्याचे पाहून मुल्ला कटर व त्यांच्या टोळीस पोलीस निरीक्षक संजय सानप हे मदत करत असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला होता. मात्र त्याची दखल श्रीरामपूरात घेण्यात आली नसल्याने फिर्यादी महिलेने याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली. त्यांनी याप्रकरणाची शहनिशा केली असता संजय सानप हे दोषी आढळून आले. त्यात त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. याप्रकरणातच दोन दिवसापूर्वी पोलीस नाईक पंकज गोसावी या पोलिसास निलंबित करण्यात आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच पोलीस निरीक्षक यांच्याविरुध्दची तक्रार पाहून त्यांना निलंबित केल्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget