श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक संजय सानप निलंबीत- जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी केली निलंबनाची कारवाई

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये अल्पवयीन मुलीस पळवून नेवून धर्मांतर करुन निकाह करत अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी मुल्ला कटर व त्याच्या टोळीला पुढे कोणतेही गुन्हे उघडकीस येवू नये म्हणून मदत केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेले श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी  निलंबीत केले आहे.श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मधील अहिल्यादेवीनगर भागात राहणार्‍या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेवून तिचे धर्मांतर करत तिच्याबरोबर निकाह करुन सलग तीन वर्षे तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुल्ला कटरसह आणखी तिघा जणांविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते पोलीस कोठडीत असून त्याप्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्याकडे होता.या प्रकरणाचा तपास करत असताना असेच आणखी काही गुन्हे उघडकीस येत असल्याचे पाहून मुल्ला कटर व त्यांच्या टोळीस पोलीस निरीक्षक संजय सानप हे मदत करत असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला होता. मात्र त्याची दखल श्रीरामपूरात घेण्यात आली नसल्याने फिर्यादी महिलेने याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली. त्यांनी याप्रकरणाची शहनिशा केली असता संजय सानप हे दोषी आढळून आले. त्यात त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. याप्रकरणातच दोन दिवसापूर्वी पोलीस नाईक पंकज गोसावी या पोलिसास निलंबित करण्यात आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच पोलीस निरीक्षक यांच्याविरुध्दची तक्रार पाहून त्यांना निलंबित केल्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget