Latest Post

राहुरी प्रतिनिधी-राहुरी शहरातील बारागाव नांदूर रोडलगत असलेल्या गोदामात ड्रग्जसदृश्य अंमली पदार्थ व औषधांचा सुमारे सव्वाकोटी रुपये किंमतीचा मोठा बेकायदा साठा आढळून आला. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस पथकाने बुधवारी (दि.03) रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई केली आहे.दरम्यान, घटनास्थळी अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक पथकाने येऊन संबंधित औषधांची तपासणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते. ही अंमली पदार्थांची तस्करी कोठे कोठे सुरू होती? या तस्करीत कोण कोण सामील आहेत? याचा शोध पोलीस पथकाकडून सुरू आहे. उशिरापर्यंत पोलीस अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून बसले होते. तर मुद्देमालाची पॅकिंग करून ताब्यात घेण्याचे काम सुरू होते. काल सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी जाऊन बेकायदा साठ्याची पाहणी केली.गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात अंमली पदार्थांची तस्करी सुरू होती.

याची खबर पोलीस पथकाला लागली. काल सकाळी राहुरी येथील चार ते पाचजणांची पोलीस पथकाने धरपकड केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवून माहिती घेतली. त्यानंतर श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, राहुरी येथील पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, अंमली पदार्थ निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले, पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा, महिला पोलीस उप निरीक्षक ज्योती डोके, आदींसह डीवायएसपी पथकातील फौजफाट्याने दुपारी तीन वाजे दरम्यान राहुरी शहरहद्दीतील बारागांव नांदूर रोड परिसरात असलेल्या शिवचिदंबर मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या एका पत्र्याच्या गाळ्यात धाड टाकली. त्याठिकाणी उत्तेजित करणार्‍या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, नशा आणणार्‍या गोळ्या तसेच ड्रग्जसारखा अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचा हा मुद्देमाल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

बेलापूर (प्रतिनिधी )-"ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे" असे ठणकावून सांगणारे, बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 102 वी जयंती येथील विजय स्तंभ चौकामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 याप्रसंगी रमेश शेलार, सुहास शेलार, तानाजी शेलार, विजय शेलार, भाऊसाहेब राक्षे, बाबासाहेब शेलार, उदय शेलार, बंटी शेलार आदि जेष्ठ समाज बांधवांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बेलापूर येथील अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध राजकीय पक्ष, संस्था-संघटना व ग्रामपंचायतिचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. सायंकाळी अण्णाभाऊंच्या प्रतिमेची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळीआमदार लहूजी कानडे, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण नाईक, बेलापूर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले, माजी जि प सदस्य शरद नवले, जनता विकास आघाडीचे रवींद्र खटोड, सरपंच महेंद्र साळवी, माजी सरपंच भरत साळुंके, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक, मुक्तार सय्यद, माजी उपसभापती दत्ता कुऱ्हे, विलास मेहेत्रे, पंडित बोंबले, प्रकाश कुऱ्हे, अनिल पवार, अय्याज सय्यद, पत्रकार विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, दीपक क्षत्रिय, किशोर कदम, अतिश देसरडा, भाऊसाहेब तेलोरे, अल्ताफ शेख, शशिकांत कापसे, बाळासाहेब दाणी आदी मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊंना जयंतीनिमित्त अभिवादीत केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहन शेलार, उपाध्यक्ष दिनेश सकट, रोहित शेलार, निखील शेलार, संकेत शेलार, तुषार शेलार, संदेश शेलार, अदित्य शेलार, सचिन खाजेकर, अतिश शेलार, निशिकांत शेलार, रामा उमाप, ऋतिक शेलार यांच्यासह बाळासाहेब शेलार, नंदू शेलार, सुभाष शेलार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 " ईस्लाम समजून घेताना " लेखक डॉ सलीम सिकंदर शेख-"🌹🌹  इस्लामी हिजरी नये १४४४ साल (वर्ष) मुबारक हो '"🌹🌹

 ईस्लामी कालगणना नुसार " मोहररम " हा पहिला महीना, "हिजरी "  कालगणने, कॅलेंडर नुसार .अल्लाह च्या( सत्यधर्माचा)ईसलाम चा प्रचार प्रसार मकके मध्ये करीत असताना तेथील स्वधर्मियांनी आतोंनात छळ यातना प्रेषित मुहम्मद स्व. व त्यांच्या अनुयायींना देत होते,खुपदा  संघर्षाची थिंनगी विरोधी करत , तीन वर्ष सामुदायिक बहिष्कृत- बहिष्कार घातला गेला, छळ कपटाला आकरा वर्ष तोंड देत देत शेवटी हजरत प्रेषित मुहम्मद स्व  यांनी स्वदेश सोडून दुसऱ्या देशात राहुन सर्व जगात अल्लाह च्या सत्यधर्माचा प्रचार प्रसार करण्याचा निश्चिय करून मक्का पासून चारशे किलोमीटरहून जास्त असलेले तेव्हाचे " यसरब " व आजचे " पवित्र मदीना " शहर निवडून तेथे " स्थलांतरित " होण्याचे ठरविले . प्रेषित मुहम्मद स्व. हे १६ जुलै ६२२ रोजी पवीत्र मक्का हुन पवित्र मदीना साठी स्थलांतर करण्यात आलेल्या प्रवासाला - प्रयाणाला आरबी भाषेत " हिजरत '" म्हणतात . त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून त्यांच्या खास जवळील मित्र इस्लामिक एतिहासातील पहीले खलिफा हजरत अबु-बकर सिददीक रजि. दुसरे खलिफा हजरत उमर व असंख्य मित्रमंडळी ( सहाबा) च्या सल्लागार मंडंळीच्या एकत्र सल्ला मसलतीने  त्या वर्षी हिजरी साल म्हणुन मान्यता दिली गेली त्याला आज १४४३ वर्ष पुर्ण झालीत.यालाच " हिजरी " हिजरा Hirahसाल ही म्हणतात.

प्रत्येक वर्षी च्या संख्येच्या शेवटी ' H ' म्हणजे हिजरा Hijrah " ला संक्षिप्त स्वरूपात, भाषेत इंग्रजी   एच'   H '  लावले जाते. 

  " AH  " लॅटिन वर्णमालेमधील, भाषेत ANNO HIJRI" अन्नो हिजरा" लिहिले जाते. 

परंतु प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या प्रवासाच्या, स्थलांतर च्या अगोदर  "  BH ' '' before Hijarat ' हा शब्द, प्रयोग वापरला जातो. म्हणजेच प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या जन्म तारखेला 53 BH   असा लिहिले जाते.. अर्थात सध्याच्या घडीला ला हिजरी 1443 वर्ष पूर्ण होउन.. 1444 वर्षात पदार्पण झालेले आहेत. 

                  हिजरी इस्लामी कालगणना चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील परस्परसंबंधावर आधारित आहे.चांद्रमासाचा कालावधी सुमारे २९.५३ दिवसांचा असुन त्यानुसारच आपण १२ महिन्यात गुणल्यास वर्षांचे ३५४ दिवस होतात . 

         परंतु हिंदू कालगणना ही सौर म्हणजे सुर्य पृथ्वीच्या परस्परसंबंधावर असल्याने त्यांचे ३६५ दिवस  व १ जानेवारी ही जगातील सर्व देशांनी मान्य केलेली ग्रेगोरियन कॅलेंडर लॅटिन ANNO Domino ग्रेगोरियन कॅलेंडर ,हे येशू ख्रिस्ताच्या जन्मावर्षीपासून करतात .त्यांचे ही ३६५-६६ होतात .

        तर सौर व चंद्र वर्ष यांच्यामधे १०-११ दिवसांचा फरक होत असतो ,तर हिंदू मधील सौर कालगणनेतील १०-११ दिवसांच्या फरक , तफावत भरून काढण्यासाठी भारतीय पंचांग करत्यांनी त्यामधे " आधीकमासा' ची ' क्ष' चापास ची योजना केली आहे .

    ""  गुढीपाडवा " हिंदू नववर्ष आरंभ म्हणजे " चैत्र " महीना पहिला.. हिंदू कालगणना ही सातवाहन राजा शालिवाहन राजाने त्यांच्या जन्मप्रारंभापासून " शालिवाहन शक किंवा शालिवाहन संवत्सर" सुरू केले . सध्या शालिवाहन शके १९४४ चालू आहे. 


ईस्लाम कालगणना नुसार  मोहररम हा इस्लामी पहिला महीना व प्रत्येक महीन्याच्या सुरुवात ही चांदरात  ने होत असते . त्यामुळे प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात की, " मुहररम हा अल्लाह चा महीना आहे.."'( सहीह मुस्लिम शरीफ हा. न. ११६३) 

  प्रेषित मुहम्मद पैगंबरांनी सांगितले की, " तुम्ही अल्लाह जवळ जे शुभ शुभ चिंतन, करुणा, दया,शांती मगफीरत,जन्नत ,माफी ,चांगले आरोग्य, हलाल रोजी,चांगले जे मागता येईल ,ज्या ईच्छा असतील,त्या सर्व गोष्टींची याचना करा.तो अल्लाह, ईश्वर, परमेश्वर आहे त्यांच्या खजिन्यात काहीही कमी नाही तो कायम देणाराच आहे "'

सर्वांना हिजरी नवीन १४४४ वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. अल्लाह यावर्षी सर्वांच्या अकाक्षा,ईच्छा पुर्ण करो... आमीन.... 


  🌷डॉ सलीम सिकंदरशेख .

  🌷बैतुशशिफा हॉस्पिटल 

  🌷श्रीरामपूर ९२७१६४००१४ 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌷🌷

राजूर वार्ताहर-कोल्हार-घोटी रोडने एक इसम चारचाकी वाहनातून दारुचे बॉक्स घेवून जात असतांना हे वाहन पोलिसांनी पकडले. यामध्ये 16 हजार रुपयांची दारु व चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.पोलिसांनी कोल्हार-घोटी रोड वर केळुगंण फाटा येथे नाकाबंदी केली होती. दरम्यान एक व्यक्ती मारुती कंपनीची अल्टो गाडी क्रमांक एम. एच. 04 -सीएम. 8666 घेवून समोरुन आला. सदर गाडी थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये 16,800 रुपये किमतीच्या बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारुच्या 240 सिलबंद बाटल्या प्रत्येकी 180 मिली, व 1,50,000 रुपये किमतीच्या मारुती कंपनीची अल्टो गाडी असा एकुण 1 लाख 66 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दारुची वाहतूक करणारा किसन सोना बांडे (वय 45 वर्ष, रा. खडकी खुर्द, ता. अकोले) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 162/2022 मुंबई पोलीस अ‍ॅक्ट कलम 65 (अ), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक वाडेकर करत आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रकाश भैलुमे, पो. हवालदार विजय मुंढे, पो. कॉ. अशोक गाढे, पो. कॉ. अशोक काळे, पो. कॉ. आकाश पवार, राकेश मुलाने यांनी ही कारवाई केली.

श्रीरामपूर : शहरातील अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल बँकेच्या आवारात, आज दुपारी १२:४५ वाजेच्या सुमारास.अशोक सहकारी साखर कारखाना चे अधिकारी, सुरक्षा रक्षकासह कॅश काढण्यासाठी आले होते. दरम्यान सुरक्षा रक्षक, दशरथ कारभारी पुजारी हे, बँके बाहेरील एटीएम समोर बसलेले असतांना. अचानक पणे त्यांच्या जवळील रायफल मधील गोळी सुटल्याने, बॅंकेत कामासाठी आलेल्या. ४२ वर्षीय अजित विजय जोशी या इसमास सुटलेली गोळी लागल्याने दुर्दैवी मुत्यु झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल

झाले असून. सदरची दुर्घटना कशी झाली याबाबत त्यांनी कसून चौकशी सुरू केली आहे. सदरची घटना शहर मध्यवर्ती ठिकाणी झाल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या घटने नंतर पोलिसांनी सुरक्षा रक्षकास विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असून. मयत अजित जोशी हे प्रगत शेतकरी असून, ते वार्ड नंबर ७ मधील सार्वमत रोड परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदनगर प्रतिनिधी - संत तुकाराम साखर कारखाना, मुळशी, जिल्हा पुणे येथुन ऊस तोड मुकादम मजुरीची रोख रक्कम मोटार सायकलवर घरी घेवुन जात असतांना रात्रीचे वेळी करंजीघाटात वाहन आडवुन, मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी ५,००,०००/- रु. रोख रक्कम व इतर मुद्देमालासह जेरबंद केली आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हेशाखेने केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २८/०६/२०२२ रोजी फिर्यादी संतोष शहादेव बर्डे वय ३६, धंदा ऊसतोड मुकादम व शेती, रा. भिलवडे, ता. पाथर्डी, जिल्हा नगर हे त्यांचे भाऊ साक्षीदार बबन असे संत तुकाराम साखर कारखाना, मुळशी, जिल्हा पुणे येथुन त्यांचे कामकाजाचे ५,७०,०००/- रु. रोख व अजिनाथ कारभारी मिसाळ यांचे कामकाजाचे २,००,०००/- रु. रोख असे एकुण ७,७०,०००/- रु. रोख रक्कम मोटार सायकलवर घेवुन घरी येत असतांना करंजीघाट, ता. पाथर्डी येथे दर्ग्याजवळ त्यांचे पाठीमागुन एक स्कॉर्पीओ गाडी येवुन मोटार सायकलला कट मारुन स्कॉर्पीओ आडवी लावुन गाडीतील अज्ञात तीन इसमांनी मारहाण करुन, धाक दाखवुन मोटार सायकलचे डिकीमध्ये ठेवलेली वरील रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली आहे. सदर घटने बाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं. ६५३ / २२ भादविक ३९४, ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. डॉ. बी. जी. शेखर पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी व मा. मनोज पाटील, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन आरोपींचा तात्काळ शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत पोनि. अनिल कटके यांना सुचना व मार्गदर्शन केले.सुचनेप्रमाणे अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपासा बाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने मोटार सायकल आडवुन, मारहाण करुन जबरी चोरी करणा-या आरोपीतांची माहिती घेत असतांना पोनि/कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा पप्पु दराडे याने केला असुन, तो आता पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी येथे त्याचे राहते घरी आलेला आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थागुशा पथकातील पोसई/सोपान गोरे, सफौ/ मनोहर शेजवळ, पोहेकॉ संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/संतोष लोढे, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, दिपक शिंदे, विश्वास बेरड, पोकॉ/ योगेश सातपुते, सागर ससाणे व चापोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळुन पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी येथे जावून मिळालेल्या माहिती वरुन आरोपीचे घरा जवळ सापळा लावुन थांबलेले असतांना एक संशयीत इसम येतांना दिसला त्यास शिताफीने ताब्यात घेवुन नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १) प्रविण ऊर्फ पप्पु दिलीप दराडे, वय ३२, रा. पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वरील नमुद गुन्हयाबाबत चौकशी केली असता तो सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, त्यास अधिक विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने नमुद गुन्हा हा त्याचा साथीदार आंबादास नागरे, तात्याबा दहिफळे व दत्तु सातपुते असे सोबत मिळुन केल्याची कबुली दिली. पथकाने नमुद आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी जावुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव २) आंबादास नारायण नागरे, वय ३१, रा. पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी, ३) तात्याबा पोपट दहिफळे वय ३३, रा. महिंदा, ता. आष्टी, जिल्हा बीड व ४) दत्तु बाबादेव सातपुते वय ३४, रा. निपाणी जळगांव, ता. पाथर्डी असे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यात चोरीस गेलेली ५,००,०००/- रु. रोख तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली १२,००,०००/- रु. किंची महिंद्र स्कॉर्पीओ व ४०,०००/-रु. किं.चे चार मोबाईल फोन असा एकुण १७,४०,०००/- रु. किंचा मुद्देमाल काढुन दिल्याने तो जप्त करुन आरोपींना मुद्देमालासह पाथर्डी पो.स्टे.ला हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही पाथर्डी पो.स्टे. करीत आहेत.सदरची कारवाई मा. मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व सुदर्शन मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

श्रीरामपूर : शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरीकांना, मागील निवडणूकिवेळी विकासाच्या नावाखाली दिलेले आश्वासने फौल ठरल्याने. आता नागरिक मूलभूत सुविधांसाठी आवाज उठविण्यास सुरवात झाली आहे. अशाच प्रकारे शहरातील वार्ड नंबर २, प्रभाग क्रमांक १० मधील बिफ मार्केट व नवीन घरकुलाच्या मागील परिसरातील नागरिकांना, चिखलाने बरबटलेले आणि खड्डेयुक्त रस्ते, भागातील नाल्यांवरील चैंबरचे फुटलेल्या ढाप्यांमुळे, परिसरातील नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरत आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. प्रभागातील या परिस्थितीमुळे लहानांपासून, वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने. जरीया फाऊंडेशनच्या वतीने मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जावेद अहमद शेख, इम्रान अजिज शेख, सद्दाम ईस्माईल कुरेशी ,इम्रान भिकन पठाण,जावेद खालीद मलिक,गणेश प्रकाश शेवाळे, शाहरूख शफिक शेख,इम्रान ईस्माईल कुरेशी आदींसह जरीया फाऊंडेशनचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थितीत होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget