राजूर वार्ताहर-कोल्हार-घोटी रोडने एक इसम चारचाकी वाहनातून दारुचे बॉक्स घेवून जात असतांना हे वाहन पोलिसांनी पकडले. यामध्ये 16 हजार रुपयांची दारु व चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.पोलिसांनी कोल्हार-घोटी रोड वर केळुगंण फाटा येथे नाकाबंदी केली होती. दरम्यान एक व्यक्ती मारुती कंपनीची अल्टो गाडी क्रमांक एम. एच. 04 -सीएम. 8666 घेवून समोरुन आला. सदर गाडी थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये 16,800 रुपये किमतीच्या बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारुच्या 240 सिलबंद बाटल्या प्रत्येकी 180 मिली, व 1,50,000 रुपये किमतीच्या मारुती कंपनीची अल्टो गाडी असा एकुण 1 लाख 66 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दारुची वाहतूक करणारा किसन सोना बांडे (वय 45 वर्ष, रा. खडकी खुर्द, ता. अकोले) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 162/2022 मुंबई पोलीस अॅक्ट कलम 65 (अ), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक वाडेकर करत आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रकाश भैलुमे, पो. हवालदार विजय मुंढे, पो. कॉ. अशोक गाढे, पो. कॉ. अशोक काळे, पो. कॉ. आकाश पवार, राकेश मुलाने यांनी ही कारवाई केली.

Post a Comment