ईस्लामी कालगणना नुसार " मोहररम " हा पहिला महीना, "हिजरी " कालगणने, कॅलेंडर नुसार .अल्लाह च्या( सत्यधर्माचा)ईसलाम चा प्रचार प्रसार मकके मध्ये करीत असताना तेथील स्वधर्मियांनी आतोंनात छळ यातना प्रेषित मुहम्मद स्व. व त्यांच्या अनुयायींना देत होते,खुपदा संघर्षाची थिंनगी विरोधी करत , तीन वर्ष सामुदायिक बहिष्कृत- बहिष्कार घातला गेला, छळ कपटाला आकरा वर्ष तोंड देत देत शेवटी हजरत प्रेषित मुहम्मद स्व यांनी स्वदेश सोडून दुसऱ्या देशात राहुन सर्व जगात अल्लाह च्या सत्यधर्माचा प्रचार प्रसार करण्याचा निश्चिय करून मक्का पासून चारशे किलोमीटरहून जास्त असलेले तेव्हाचे " यसरब " व आजचे " पवित्र मदीना " शहर निवडून तेथे " स्थलांतरित " होण्याचे ठरविले . प्रेषित मुहम्मद स्व. हे १६ जुलै ६२२ रोजी पवीत्र मक्का हुन पवित्र मदीना साठी स्थलांतर करण्यात आलेल्या प्रवासाला - प्रयाणाला आरबी भाषेत " हिजरत '" म्हणतात . त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून त्यांच्या खास जवळील मित्र इस्लामिक एतिहासातील पहीले खलिफा हजरत अबु-बकर सिददीक रजि. दुसरे खलिफा हजरत उमर व असंख्य मित्रमंडळी ( सहाबा) च्या सल्लागार मंडंळीच्या एकत्र सल्ला मसलतीने त्या वर्षी हिजरी साल म्हणुन मान्यता दिली गेली त्याला आज १४४३ वर्ष पुर्ण झालीत.यालाच " हिजरी " हिजरा Hirahसाल ही म्हणतात.
प्रत्येक वर्षी च्या संख्येच्या शेवटी ' H ' म्हणजे हिजरा Hijrah " ला संक्षिप्त स्वरूपात, भाषेत इंग्रजी एच' H ' लावले जाते.
" AH " लॅटिन वर्णमालेमधील, भाषेत ANNO HIJRI" अन्नो हिजरा" लिहिले जाते.
परंतु प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या प्रवासाच्या, स्थलांतर च्या अगोदर " BH ' '' before Hijarat ' हा शब्द, प्रयोग वापरला जातो. म्हणजेच प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या जन्म तारखेला 53 BH असा लिहिले जाते.. अर्थात सध्याच्या घडीला ला हिजरी 1443 वर्ष पूर्ण होउन.. 1444 वर्षात पदार्पण झालेले आहेत.
हिजरी इस्लामी कालगणना चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील परस्परसंबंधावर आधारित आहे.चांद्रमासाचा कालावधी सुमारे २९.५३ दिवसांचा असुन त्यानुसारच आपण १२ महिन्यात गुणल्यास वर्षांचे ३५४ दिवस होतात .
परंतु हिंदू कालगणना ही सौर म्हणजे सुर्य पृथ्वीच्या परस्परसंबंधावर असल्याने त्यांचे ३६५ दिवस व १ जानेवारी ही जगातील सर्व देशांनी मान्य केलेली ग्रेगोरियन कॅलेंडर लॅटिन ANNO Domino ग्रेगोरियन कॅलेंडर ,हे येशू ख्रिस्ताच्या जन्मावर्षीपासून करतात .त्यांचे ही ३६५-६६ होतात .
तर सौर व चंद्र वर्ष यांच्यामधे १०-११ दिवसांचा फरक होत असतो ,तर हिंदू मधील सौर कालगणनेतील १०-११ दिवसांच्या फरक , तफावत भरून काढण्यासाठी भारतीय पंचांग करत्यांनी त्यामधे " आधीकमासा' ची ' क्ष' चापास ची योजना केली आहे .
"" गुढीपाडवा " हिंदू नववर्ष आरंभ म्हणजे " चैत्र " महीना पहिला.. हिंदू कालगणना ही सातवाहन राजा शालिवाहन राजाने त्यांच्या जन्मप्रारंभापासून " शालिवाहन शक किंवा शालिवाहन संवत्सर" सुरू केले . सध्या शालिवाहन शके १९४४ चालू आहे.
ईस्लाम कालगणना नुसार मोहररम हा इस्लामी पहिला महीना व प्रत्येक महीन्याच्या सुरुवात ही चांदरात ने होत असते . त्यामुळे प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात की, " मुहररम हा अल्लाह चा महीना आहे.."'( सहीह मुस्लिम शरीफ हा. न. ११६३)
प्रेषित मुहम्मद पैगंबरांनी सांगितले की, " तुम्ही अल्लाह जवळ जे शुभ शुभ चिंतन, करुणा, दया,शांती मगफीरत,जन्नत ,माफी ,चांगले आरोग्य, हलाल रोजी,चांगले जे मागता येईल ,ज्या ईच्छा असतील,त्या सर्व गोष्टींची याचना करा.तो अल्लाह, ईश्वर, परमेश्वर आहे त्यांच्या खजिन्यात काहीही कमी नाही तो कायम देणाराच आहे "'
सर्वांना हिजरी नवीन १४४४ वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. अल्लाह यावर्षी सर्वांच्या अकाक्षा,ईच्छा पुर्ण करो... आमीन....
🌷डॉ सलीम सिकंदरशेख .
🌷बैतुशशिफा हॉस्पिटल
🌷श्रीरामपूर ९२७१६४००१४
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌷🌷
Post a Comment