Latest Post

श्रीरामपूर : शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरीकांना, मागील निवडणूकिवेळी विकासाच्या नावाखाली दिलेले आश्वासने फौल ठरल्याने. आता नागरिक मूलभूत सुविधांसाठी आवाज उठविण्यास सुरवात झाली आहे. अशाच प्रकारे शहरातील वार्ड नंबर २, प्रभाग क्रमांक १० मधील बिफ मार्केट व नवीन घरकुलाच्या मागील परिसरातील नागरिकांना, चिखलाने बरबटलेले आणि खड्डेयुक्त रस्ते, भागातील नाल्यांवरील चैंबरचे फुटलेल्या ढाप्यांमुळे, परिसरातील नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरत आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. प्रभागातील या परिस्थितीमुळे लहानांपासून, वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने. जरीया फाऊंडेशनच्या वतीने मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जावेद अहमद शेख, इम्रान अजिज शेख, सद्दाम ईस्माईल कुरेशी ,इम्रान भिकन पठाण,जावेद खालीद मलिक,गणेश प्रकाश शेवाळे, शाहरूख शफिक शेख,इम्रान ईस्माईल कुरेशी आदींसह जरीया फाऊंडेशनचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थितीत होते.

अहमदनगर प्रतिनिघी -पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनीची इलेक्ट्रीक टॉवरची ॲल्युमिनिअम तार चोरी करणारी टोळी पकडली. चोरट्यांकडून १ लाख ३ हजार ३९० रु. कि.चे मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई नगर स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. श्रीकांत ऊर्फ शिरक्या फकिरा मनतोडे (वय २०, रा. आश्वी खु, ता. संगमनेर), फारुख युसूफ सय्यद ( वय २८, रा. जुने जोर्वे रोड, ता. संगमनेर ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दि. २२ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनीचे कल्पतरु टॉवर्स पॉवर ट्रान्समिशन लि. कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरीस आहे. दि. १९ जुलै २२ रोजी सहकारी सुमो वाहनातून पेट्रोलिंग करत असतांना वासुंदे, ता. पारनेर जवळील टॉवर नं. १७६-१७७, १७८.१७९ या टॉवरमधील AAAC 6405q mm conductor मध्ये असलेली २६९० मीटर २,००,०००/- रू किं.ची इलेक्ट्रीक तार अज्ञात इसमांनी चोरून नेली होती. या विभाष कुमार भोलाप्रसाद महतो ( रा. ओमसाई कॉम्प्लेक्स, लक्ष्मी चौक, नारायणगांव, ता. जुन्नर, जिल्हा-पुणे) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५८२ / २०२२ भादविक ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोनि श्री. अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमणूक करुन कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले. आदेशाप्रमाणे स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपीची माहिती घेऊन शोध घेत असतांना पोनि श्री कटके यांना माहिती मिळाली की, गुन्हा हा श्रीकांत मनतोडे (रा. आश्वी, ता. संगमनेर) याने केला आहे. तो आता त्याचे राहते घरी आलेला आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थागुशा पथकाने आश्वी (ता. संगमनेर) येथे जाऊन आरोपी श्रीकांत मनतोडे हा त्याचे साथीदारा सोबत घरी झोपलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने पथकाने पहाटे ४ वाचे सुमारास आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकला असता आरोपीस पोलीस पथकाची चाहुल लागताच अंधाराचा फायदा घेऊन ऊस शेतामधून पळून जाऊ लागले. पथकाने आरोपींचा पाठलाग करुन एकास ताब्यात घेतले. व इतर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन ऊसाचे शेतामध्ये पळून गेले. त्यांचा ऊसाचे शेतामध्ये जाऊन शोध घेतला असता ते पोलिसांना मिळून आले नाहीत. ताब्यात घेतलेल्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव श्रीकांत ऊर्फ शिरक्या फकिरा मनतोडे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा त्याच्या पळून गेलेले साथीदार शरद ऊर्फ गोट्या हरीभाऊ पर्वत (रा. दाढ, ता. राहाता) व नरेंद्र ऊर्फ न-या पंढरीनाथ इंगळे (रा. आश्वी, ता. संगमनेर) यांच्यासोबत मिळून केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात चोरी केलेली टॉवरची इलेक्ट्रीक तार बाबत विचारपूस करता त्याने ती अकोले नाका (संगमनेर) येथील फारुख सय्यद भंगार दुकानदार यास विक्री केली आहे, अशी माहिती दिली. माहितीचे अनुषंगाने पथकाने आरोपी श्रीकांत मनमोडे यास सोबत घेऊन संगमनेर येथील भंगाराचे दुकानामध्ये जाऊन दुकानात असलेल्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्यांचे नाव फारुख युसूफ सय्यद (वय २८, धंदा भंगार दुकान, रा. जुने जोर्वे रोड, ता. संगमनेर) असे असल्याचे सांगितले. पथकाने त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेली टॉवरची इलेक्ट्रीक तार बाबत विचारपूस केली असता त्याने ४९० किलो वजनाची टॉवरची इलेक्ट्रीक तार आरोपीकडून भंगारामध्ये घेतल्याची कबुली दिली. इलेक्ट्रीक तार पथकासमक्ष काढून दिल्याने पोलिसांनी १ लाख ३ हजार ३९० रु. किंचे मुद्देमालासह दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पारनेर पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील कारवाई पारनेर पोलीस करीत आहे.आरोपी श्रीकांत ऊर्फ शिरक्या फकिरा मनतोडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द आश्वी पोलीस ठाण्यात दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे चार गुन्हे दाखल आहेत. दि. १२ नोव्हेंबर २९ पासून १८ महिन्याकरीता अहमदनगर, पुणे व नाशिक अशा तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे.<br>आरोपी फारुख युसूफ सय्यद हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर संगमनेर शहर व आश्वी पोलिस ठाण्यात जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल व संगमनर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि गणेश इंगळे, सफौ बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ मनोज गोसावी, देवेंद्र शेलार, सखाराम मोटे, पोना शंकर चौधरी, विजय ठोंबरे, सुरेश माळी, सचिन आडबल, रवि सोनटक्के, पोका रोहित येमुल व चापोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

अहमदनगर प्रतिनिधी-पुण्यात  रिक्षा चोरून नगर शहरात  विक्रीसाठी आणलेल्या दोन रिक्षा कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सोन्या ऊर्फ सुरज शिवाजी शिंदे (वय 28, रा. बुरूडगाव रस्ता, नगर) याला अटक करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली की, नालेगावातील  अमरधाम मागील बाजूस एकजण दोन चोरीच्या रिक्षा विक्री करण्याकरिता घेऊन आलेला आहे. कोतवाली पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे शुक्रवारी (ता. 23) सकाळी 8 वाजता छापा  टाकला. या ठिकाणी सोन्या ऊर्फ सुरज शिवाजी शिंदे हा दोन रिक्षासह मिळून आल्या. त्याच्याकडे रिक्षाचे कागदत्रविषयी विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने रिक्षावर असलेले क्रमांक खोटे असल्याबाबत खात्री झाली. रिक्षाचे चेसी नंबर व इंजिन नंबर यावरुन माहिती घेतली असता, पुणे जिल्ह्यातील  एमआयडीसी भोसरी पोलिस ठाणे  (पिंपरी चिंचवड) व चिखली पोलिस ठाणे हद्दीतून रिक्षा चोरीला गेल्या होत्या. साडे चार लाख रूपये किंमतीच्या दोन्ही रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी सुरज शिंदे यास पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शोध पथकातील शरद गायकवाड, योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, अमोल गाडे, सुजय हिवाळे, सोमनाथ राउत, तान्हाजी पवार, हेमंत थोरात, अभय कदम, अतुल काजळे, सतीश भांड, प्रशांत बोरुडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

श्रीरामपूर प्रतिनिधी-भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा झेंडा’ उपक्रमाअंतर्गत शहरात सुमारे 20 हजार तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी सोमवार दि.25 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वा. नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात तसेच देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार दि.11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानात श्रीरामपूर शहरातील नागरिक, दुकानदार यांनी आपल्या घरावर, इमारतीवर, खाजगी आस्थापनेवर किंवा आपल्या संस्थेवर स्वखर्चाने भारतीय राष्ट्रध्वज उभारणे अपेक्षित आहे. या अभियानात श्रीरामपूर नगरपालिका क्षेत्रात नागरिक, दुकानदार, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आदींच्या सहभागातून अंदाजे 20 हजार तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर झेंडा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोमवार दि.25 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वा. नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित बैठकीस नागरिक, व्यापारी, सामाजिक व सेवाभावी संस्था पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-दोन मोटारसायकल व एक टँकरच्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन पोलीसांनी टँकर ताब्यात घेतला आहे मयत हे नायगाव नाऊर येथील असुन नायगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले   या बाबत मिळालेली माहीती अशी की नायगाव येथील बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड  वय ४५वर्ष त्यांचा मुलगा अजीत बाळासाहेब गायकवाड वय २० वर्ष त्यांची मुलगी वय वर्ष १८ हे तिघे एम एच १७ ७१३१या बजाज सीटी १०० या मोटार सायकलवर बेलापुरकडे चालले होते .ते गायकवाड वस्ती नजीक असताना श्रीरामपुर कडे जाणाऱ्या एका मोटारसायकलचा डँश त्यांना लागला तसे ते तीघेही रस्त्यावर पडले अन दुर्दैवाने श्रीरामपुर हुन बेलापुरकडे मळीचा टँकर एमएच ४३यू ३३३६ हा भरधाव वेगाने चालला होता मोटारसायकलचा डँश लागल्यामुळे हे तिघेही रस्त्यावर फेकले गेले अन एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे भरधाव टँकरने तिघांनाही चिरडले दिपाली बाळासाहेब गायकवाड हीचा जागेवरच मृत्यू झाला तर बाळासाहेब गायकवाड यांच्या पोटावरुन टँकरचे चाक गेले होते त्यांना साखर कामगार दवाखान्यात हलविण्यात आले होते परंतु उपचारा पूर्वीच त्यांचा  मृत्यू झाला अजित  गायकवाड अत्यवस्थ असताना पुढील उपचारासाठी नगरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला घटना घडली त्याच वेळेस बेलापुरचे पोलीस हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे तेथुन चालले होते त्यांनी तातडीने जखमींना दवाखान्यात हलविले या वेळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती ती गर्दी हटविताना पोलीसांना मोठी कसरत करावी लागली अनेकानी अपघातात मदत करण्याऐवजी मोबाईल मध्ये फोटो काढण्यात धन्यता मानली  घटनेची माहीती नायगाव नाऊर परिसरात समजताच नायगाव परिसरावर शोककळा पसरली शोकाकुल वातावरणात तिघावरही अंत्यसंस्कार करण्यात आले या बाबत पोलीसांनी टँकर ताब्यात घेतला असुन एका मोटारसायकलचा पोलीस शोध घेत आहे

येवला {प्रतिनिधी} येवला येथील मिल्लत नगर भागातील रहिवाशी राजनीति समाचार वृत्तपत्र व न्यूज पोर्टल चे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते अबुजर उस्मान शेख यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या येवला शहर संघटक पदी निवड करण्यात आली असून याबाबतचे नियुक्तीपत्र व ओळखपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी प्रदान केल्याची माहिती नाशिक जिल्हा अध्यक्ष उस्मान के. शेख यांनी दिली

या निवडीबद्दल अबुजर शेख यांचे पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, महासचिव शेख फकीर महंमद, प्रदेश उपाध्यक्ष  बी. के. सौदागर, युवा प्रदेश कार्याध्यक्ष संदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष नासिर खान( नाशिक), प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण (चांदवड), नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान भाई शेख, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव केदारे, येवला तालुका अध्यक्ष श्रीकांत गोसावी, चांदवड तालुका सचिव रवींद्र केदारे, चांदवड तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड, पाटोदा सचिव दादा भाऊ मोरे, पाटोदा उपाध्यक्ष मुजम्मिल शेख, येवला शहराध्यक्ष हाजी शकील भाई शेख, येवला शहर सचिव कालिदास अनावडे, पत्रकार प्रकाश मालवकर, पत्रकार माधव सोळशे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विजय खरात, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष अस्लम बिनसाद, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख, उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष कासम भाई शेख, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज भाई सय्यद, अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्ष सौ. समीना रफिक शेख, महिला जिल्हा सदस्य सौ. कल्पना काळे, आदींनी त्यांचे अभिनंदन केले

श्रीरामपूर : शहरातील वार्ड नंबर २ परिसरात राहत असलेल्या. एका अल्पवयीन दलित मुलीचे ३ वर्षांपूर्वी शाळेत जातांना अपहरण करून. तिला धर्मांतरासाठी अल्पवयीन मुलीच्या इच्छे विरोधात शारिरीक मानसिक छळ करून, बळजबरीने तिच्याशी निकाह केला. यासंदर्भात १९ जुलै रोजी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या, इरफान कुरेशी उर्फ मुल्ला याच्या विरुद्ध. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहरातील अहिल्यादेवी नगर परिसरात मुल्ला व त्याच्या गुन्हेगारी टोळीची प्रचंड दहशत असून. सदरचा गुन्हा दाखल झाल्या नंतर, पीडित अल्पवयीन मुलगी त्याच परिसरात राहत असल्याने. दाखल गुन्ह्यातील तडजोडसाठी, पीडित कुटुंबावर दाबाव आणण्याचा प्रयत्न मुल्ला टोळीकडून केला जात असल्याने. त्या मुलीला त्वरीत,अहिल्यादेवीनगर परिसरातून काढून बालसुधार गृहात पाठविण्यात यावे,पीडीत मुलीचे बळजबरीने धर्मांतरण करून. तिचे मुल्लापाजीशी लग्न लावणा-या मोलानाला दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे. पीडीत अल्पवयीन  मुलगी गरोदर असून, तीची डिलेव्हरी पुर्व डि.एन.ए. चाचणी करण्यात यावी. या गुन्ह्यात मुल्लाला मदत करणा-या त्याच्या टोळीतील गुन्हेगार सदस्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे. या गुन्हेगारांचा कायम स्वरूपी बंदोबस्त होण्यासाठी, मुल्ला व त्याच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. या करिता हिंदू रक्षा कृती समितीच्या वतीने, शहर पोलीस ठाण्यात शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून निवेदन दिले. सदरचे आंदोलन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते,मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे,माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,,विश्व हिंदू परिषदेचे डॉक्टर दिलीप शिरसाठ, शशिकांत कडूसकर, शिवप्रतिष्ठानचे किसन ताकटे,श्रीराम सेवा संघाचे कुणाल करंडे ,अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीचे प्रवीण फरगडे,देविदास चव्हाण,संजय यादव सोमनाथ कदम , विजय लांडे, सिद्धार्थ साळवे,महेश विश्वकर्मा आदींसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget