पोलीसांची कारवाई एकाला अटक,पुण्यात चोरलेल्या रिक्षा जप्त.

अहमदनगर प्रतिनिधी-पुण्यात  रिक्षा चोरून नगर शहरात  विक्रीसाठी आणलेल्या दोन रिक्षा कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सोन्या ऊर्फ सुरज शिवाजी शिंदे (वय 28, रा. बुरूडगाव रस्ता, नगर) याला अटक करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली की, नालेगावातील  अमरधाम मागील बाजूस एकजण दोन चोरीच्या रिक्षा विक्री करण्याकरिता घेऊन आलेला आहे. कोतवाली पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे शुक्रवारी (ता. 23) सकाळी 8 वाजता छापा  टाकला. या ठिकाणी सोन्या ऊर्फ सुरज शिवाजी शिंदे हा दोन रिक्षासह मिळून आल्या. त्याच्याकडे रिक्षाचे कागदत्रविषयी विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने रिक्षावर असलेले क्रमांक खोटे असल्याबाबत खात्री झाली. रिक्षाचे चेसी नंबर व इंजिन नंबर यावरुन माहिती घेतली असता, पुणे जिल्ह्यातील  एमआयडीसी भोसरी पोलिस ठाणे  (पिंपरी चिंचवड) व चिखली पोलिस ठाणे हद्दीतून रिक्षा चोरीला गेल्या होत्या. साडे चार लाख रूपये किंमतीच्या दोन्ही रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी सुरज शिंदे यास पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शोध पथकातील शरद गायकवाड, योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, अमोल गाडे, सुजय हिवाळे, सोमनाथ राउत, तान्हाजी पवार, हेमंत थोरात, अभय कदम, अतुल काजळे, सतीश भांड, प्रशांत बोरुडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget