श्रीरामपूर प्रतिनिधी-भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा झेंडा’ उपक्रमाअंतर्गत शहरात सुमारे 20 हजार तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी सोमवार दि.25 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वा. नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात तसेच देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार दि.11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानात श्रीरामपूर शहरातील नागरिक, दुकानदार यांनी आपल्या घरावर, इमारतीवर, खाजगी आस्थापनेवर किंवा आपल्या संस्थेवर स्वखर्चाने भारतीय राष्ट्रध्वज उभारणे अपेक्षित आहे. या अभियानात श्रीरामपूर नगरपालिका क्षेत्रात नागरिक, दुकानदार, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आदींच्या सहभागातून अंदाजे 20 हजार तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर झेंडा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोमवार दि.25 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वा. नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित बैठकीस नागरिक, व्यापारी, सामाजिक व सेवाभावी संस्था पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment