Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-आज दि. १५/७/२०२२ रोजी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहिती नुसार विभागाने गणेशनगर व नांदूर शिवार ता. राहाता जि.अहमदनगर येथे संयुक्त मोहीम राबवून हातभट्टी गावठी दारू बनवण्याची चार अड्डे उद्धवस्त कारवाईत एकूण ०४ गुन्हे नोंदविण्यात आले असून हातभट्टी तयार करण्याचे ६२५५ लिटर कच्चे रसायन नाश केले तयार हातभट्टी गावठी दारू ९० लिटर व इतर भट्टीचे साहित्त्य असा एकूण १,६५,५००/- किंमतीचा मुद्देमाल नाश करण्यात आला आहे. सदर कारवाई मध्ये अज्ञात इसमां विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हे नोंद करून कारवाई करण्यात आली आहे.

सदरील कारवाई श्री गणेश पाटील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर,यांचे मार्गदर्शनाखाली श्री गोपाल चांदेकर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र २ श्रीरामपूर,व श्री. संजय कोल्हे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कोपरगाव विभाग यांनी केली. सदर कारवाईत दुय्यम निरीक्षक श्री. व्ही. एम. आभाळे, श्री. धवल गोलेकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री.के.के.शेख, श्री. दिगंबर ठुबे महिला जवान श्रीमती. स्वाती फटांगरे, श्रीमती. वर्षा जाधव वाहन चालक श्री.एन.एम. शेख दफेदार श्री. विजु पाटोळे इत्यादी सहभागी झाले होते .

बेलापूर प्रतिनिधी- आपले कोण परके कोण यात तफावत न करता प्रामाणिक पणे न्यायाची बाजू मांडणाऱ्या महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघ गेल्या तीस वर्षापासून कार्य करीत असून पत्रकार संघाचे अध्यक्ष बरकत अली यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रभर पत्रकार संघाचा विस्तार झाला असून जनतेत पत्रकार संघाची चांगली छबी निर्माण झाली आहे असे प्रतिपादन बेलापूर येथील जि. प. सदस्य शरद राव नवले पाटील यांनी केले

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या बेलापूर शाखेचे वर्धापन दिन व कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दिनांक 14/7/2022 रोजी दुपारी तीन वाजता बेलापूर येथील नगर रोड लगत आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य शरद राव नवले पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली पत्रकार संघाचे प्रदेश सचिव अभयजी बाफना, बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहसिन सय्यद, पत्रकार दायमा, पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, युवा प्रदेश कार्याध्यक्ष संदीप पवार, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख, उत्तर नगर जिल्हा कार्याध्यक्ष कासम भाई शेख, उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाष राव गायकवाड, चांदवड तालुकाध्यक्ष सुखदेव केदारे, येवला तालुका अध्यक्ष सूर्यकांत गोसावी, सिन्नर तालुका अध्यक्ष मधुकर मुठाळ, राहता तालुका अध्यक्ष विजय खरात, राहता तालुका सचिव राहुल कोळगे, पाटोदा कार्याध्यक्ष दादा भाऊ मोरे, पाटोदा उपाध्यक्ष मुजम्मिल शेख, पुणतांबा शहराध्यक्ष मयूर मलठणकर, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पत्रकार कासम शेख यांनी केले यावेळी बेलापूर शाखा कार्यालयाची फित कापून शरद नवले पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमात आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा पुष्पहार देऊन बेलापूर शाखा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला 


आपल्या अध्यक्षीय भाषणात शरद  नवले पाटील पुढे म्हणाले की एक वर्षापूर्वी बेलापूर गावात पत्रकार संघाची स्थापना करण्यात आलि असून येथील नवोदित पत्रकारांच्या खांद्यावर कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती त्यानुसार या शाखेच्या पत्रकारांनी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करून पत्रकार संघाचे नावलौकिक वाढविले आहे त्यांनी गावातील बातम्यांचा पाठपुरावा करूनच बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत याच बरोबर कोरोना रुग्णांना मदत करणाऱ्या गावातील नेते, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे, पोलिस प्रशासनाच्या उत्कृष्ट कार्यप्रणाली बद्दल येथील अधिकारी व पोलिसांचा सत्कार केला, दिवाळीच्या काळात जाती एकता दृढ होण्याच्या उद्देशाने राम गड येथे फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते अशा विविध क्षेत्रामध्ये पत्रकारांनी उत्कृष्ट असे काम केले आहे त्यांच्या कामाचे व विशेष म्हणजे पत्रकार संघाचे आपण जि. प. सदस्य या नात्याने कौतुक करीत आहोत असे ते म्हणाले


आपल्या प्रमुख भाषणात पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली म्हणाले की आपण गेल्या तीस वर्षापासून पत्रकार संघाच्या माध्यमातून नवोदित पत्रकार घडविण्याचे व त्यांना पत्रकारितेचे प्रशिक्षण देण्याचे कार्य केले असून याच उद्देशाने बेलापूर येथील पत्रकारांना पत्रकार संघ बरोबर काम करण्याची संधी प्राप्त करून दिली ती उपयोगी ठरली असून आज या ठिकाणी बेलापूर शाखेचे वर्धापन दिन व शाखा कार्यालयाचे उद्घाटन करताना आपल्याला स्वाभिमान वाटत आहे पत्रकारांनी कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्याअगोदर बातमीची सत्यता पडताळून पहावी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पत्रकारावर येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम पत्रकार संघाने आजवर केले आहे यापुढेही करणार आहे त्यामुळे पत्रकारांनी निर्भीडपणे व प्रामाणिकपणे काम करीत राहावे असे शेख यांनी सांगितले पत्रकार संघाचा तीस वर्षाचा प्रवास पूर्ण झाला असल्याने येत्या ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आपण पत्रकार संघाचा रौप्य महोत्सव साजरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले


यावेळी अभयजी बाफना, सुखदेव केदारे, मधुकर मुठाळ, गुलाब भाई शेख, एजाज सय्यद, मुसा भाई सय्यद, सुभाष राव गायकवाड आदींनी शुभेच्छा पर भाषणे केली कार्यक्रमास  राहुरी येथील पत्रकार गणेश पवार, बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, सार्थक साळुंके, इमरान शेख, अकबर भाई शेख यांच्यासमवेत इतर पत्रकार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार एजाज सय्यद यांनी मानले

बेलापुर (प्रतिनिधी ) - वडीलांचे अंत्यसंस्कार मुलानेच करण्याची परंपरा समाजात प्रचलीत आहे मुलगा नसेल तर पुतण्या सर्व विधी करतो परंतु श्रीरामपुरात एका मुलीने सर्व रुढी परंपराचे जोखड बाजुला सारुन आपल्या वडीलाच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पाडले                  याबाबतचे वृत्त असे की, श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावालगत असलेल्या नेहरूवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुभाष साळूंके हे गेल्या काही वर्षापासून श्रीरामपूर शहरातील वार्ड नं.7 मधील रामचंद्रनगर येथे राहतात. त्यांना एक मुलगी आहे. , तीने उच्च शिक्षण घेतले तसे उच्च विचारही अंगीकारले तिचे वडील सुभाष साळूंके यांचे अचानक निधन झाले त्यांना एकच अपत्य ते ही मुलगी असल्यामुळे सर्व विधी कोण करणार? हा प्रश्न उभा राहीला अन वडीलांच्या अचानक जाण्याचे अपरिमीत दुःख असतानाही तिने सर्व विधी करण्याचा धाडसी निर्णय घेतला  माझ्या पित्याचे अग्निदहन , शिकाळी मीच धरणार, पाणी मीच पाजणार सर्व विधी मलाच करु द्या मीच त्यांची मुलगी अन मीच त्यांचा मुलगा असे सर्वांना सांगितले अन सर्व विधी स्वतःच केले आजही समाजात  मुलगा व मुलगी असा भेदभाव केला जातो अशा लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न रुपाली हीने केला

शिर्डी ( प्रतिनिधी)सर्वच न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे न्यायदानास विलंब होत आहे.अशा परिस्थितीत, लोक न्यायालयामध्ये वादपूर्व , प्रलंबित खटले निकाली काढणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळेनागरिकांचा वेळ, पैसा, श्रम या तिन्ही बाबींची बचत होत असते. न्यायालयीन खटला लढवण्यासाठी लागणारा पैसाव श्रम या दोघांचाही वापर विधायक कार्यासाठी करण्याची संधी पक्षकारांना मिळते. म्हणूनचजिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर जिल्हा न्यायालयातील दोन्हीवकील संघाच्या सहकार्याने आणि अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मागील तीन लोक अदालतमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे.त्यामुळे, अहमदनगर या ठिकाणी झालेल्या लोक अदालतीपैकी मागीलतीन लोक अदालत ह्या संस्मरणीयठरलेल्या आहेत. या यशाचे शिल्पकारहे माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर व्ही.यार्लगड्डाहे असून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, विधीज्ञ ,पक्षकार व कर्मचाऱ्यांचे ह्या यशामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा न्यायालय अहमदनगर व सर्व तालुका न्यायालयामध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लोक अदालतीमध्ये तडजोड योग्य प्रकरणे, अर्थात चोरीची प्रकरणे, किरकोळ मारहाणीची प्रकरणे, बँकेची व वित्तीयसंस्थेशी संलग्न प्रकरणे, धनादेशाचीम्हणजे चेकची प्रकरणे, यांचा समावेशहोतो. महानगरपालिका, नगरपंचायत ग्रामपंचायत यांच्याकडील मालमत्ता कर,पाणीपट्टी, घरपट्टी आणि महावितरण यांचे कडील प्रलंबित विज देयके, अशा स्वरूपाची प्रकरणे, लोक अदालतमध्ये तडजोडीने निकाली काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे.. बँकेकडील व पतसंस्थेकडील प्रकरणांमध्ये व्याजदरात सूट अथवा व्याजदरात माफी मिळून काही प्रमाणात फायदा होतो. पर्यायाने प्रलंबित व वाद पूर्व खटल्यांची संख्याकमी होऊन न्यायव्यवस्थेवरील ताण कमी होतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून दिनांक १३ ऑगस्ट २२रोजी होणाऱ्या लोक अदालत मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून फायदा

घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर यार्लगड्डा व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या नवनियुक्त सचिव

भाग्यश्री पाटील यांनी केलेले आहे.चौकशीसाठी जिल्हा विधी सेवाप्राधिकरण या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीरामपूर : राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय जाहीर केला आहे.भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेड ए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षण, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असल्याने. राज्यातील ९२ नगर परिषदा व ४ नगरपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम -२०२२ जाहीर केलाय. यामध्ये  पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून. ज्यात श्रीरामपूर नगरपालिकाच्या ३४ जागेंकरिता  गुरुवार दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार असून.  १९ ऑगस्ट २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. अचानकपणे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या जाहीर केल्याने, इच्छूक उमेदवारांना तैयारी करिता ३८ दिवस मिळणार असल्याने, सर्वच इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तैयारीला लागले असून. प्रत्येक चौका चौकात चर्चेला उधाण आले आहे. या निवडणुकी संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने अहमदनगर सह सर्व १६ जिल्हाधिका-यांना याबाबत लेखी सूचना दिल्या आहेत.

अहमदनगर प्रतिनिधी-जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, संघटीत गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडित काढण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून प्रयत्न केले जात आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या दीड वर्षात सुमारे 120 सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. संघटीत गुन्हे करणार्‍या टोळ्यांतील गुन्हेगार, वैयक्तीक गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार. तसेच गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्यानंतर गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.सप्टेंबर 2020 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मनोज पाटील यांनी पदभार हाती घेतल्या. यानंतर ऑक्टोबरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्वीकारला. अधीक्षक पाटील व निरीक्षक कटके यांनी गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सराईत गुन्हेगारांची पोलीस

दप्तरी नोंद असावी यासाठी मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. यामध्ये सराईत गुन्हेगारांची माहिती भरलेली असते.मालाविरोधी व शरिराविरोधी दोन पेक्षा जास्त गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांसाठी ‘टू-प्लस’ योजना अधीक्षक पाटील यांनी आणली. दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचा यामध्ये समावेश केला जातो. खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, वाळूतस्करी, चोरी, विनयभंग, शिवीगाळ, मारहाण असे गंभीर गुन्हे संघटीतपणे करणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात सक्रीय आहेत. या टोळ्यांविरोधात हद्दपार, मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा धडाका जिल्हा पोलिसांनी लावला आहे.गेल्या दीड वर्षामध्ये अधीक्षक पाटील, निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये 16 टोळ्यांतील 79 सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा 56 अन्वये 39 सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. कोणत्याही गुन्ह्यामध्ये दोन वर्ष शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा गुन्हे केल्यास त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा 57 अन्वये हद्दपार करण्यात येते.गेल्या दीड वर्षामध्ये जिल्ह्यातील अशा दोन गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. वारंवार गुन्हे करून त्या परिसरात आपली दहशत निर्माण करू पाहणार्‍या सराईत गुन्हेगार, टोळ्यांना पोलीस अधीक्षक पाटील यांनी वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

श्रीरामपूर प्रतिनिधी-लोणी येथून गायी विकून त्याचे पैसे सोबत घेऊन जात असलेल्या एका जणास रस्त्यात अडवून त्यास मारहाण करून त्याच्याकडून रोख रक्कम 70 हजार रुपये व मोबाईल हिसकावून घेऊन जाणार्‍या पाच जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीस काल श्रीरामपूर शहर पोलीस पथकाने जेरबंद केले. आरोपींकडून मोबाईल, दोन मोटारसायकल, एक चाकू व कंबरेचा बेल्ट असा एकुण 63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील बालम हसन पठाण यांनी लोणी येथील जनावरांच्या बाजारात गायी विकल्या. त्यातून मिळालेले पैसे सोबत घेऊन ते बाभळेश्वर, श्रीरामपूर, अशोकनगर मार्गे कारेगाव येथे जात असताना श्रीरामपूर-नेवासा रोडवरील ओव्हर ब्रिजच्या दक्षिणेकडील महामंडळाचे मोकळ्या शेतातून जाणारे कच्च्या रोडवरून जात असताना फिर्यादी यांच्या मागून अचानक दोन मोटारसायकल वरील इसमांनी येऊन फिर्यादी तसेच त्याच्यासोबत असलेले दोघेजण यांना अडवून आमच्या गाडीला कट का मारला असे म्हणून कंबरेच्या बेल्टने मारहाण केली व त्यांच्या अंगावर मिरची पावडर टाकून शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या खिशातील 70 हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल बळजबरीने चोरून नेला.या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. 468/2022 प्रमाणे भादंवि कलम 395,394,34 प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यासंदर्भात पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सापळा रचून संदेश नवनाथ मिरपगार (वय 22) रा. लोहगाव, प्रवरानगर ता. राहाता, आवेज फिरोज शेख (वय 21) रा. बर्तनगल्ली, म्हसोबा नगर, बाभळेश्वर, ता. राहाता, मनोज ज्ञानदेव भालेराव (वय 22), अफजल अब्दुल मुलानी (वय 25), असिफ अनिस सय्यद (वय 21), या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदर आरोपीकडून फिर्यादी यांचा बळजबरीने काढून घेतलेला विवो कंपनीचा मोबाईल, दोन मोटारसायकल, एक चाकू व कंबरेचा बेल्ट असा एकूण 63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर स्वाती भोर, व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे, पोलीस नाईक, रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल रमीज आत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, पोलीस कॉन्स्टेबल कातखडे, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुर्गुळे, पोलीस नाईक फुरकान शेख यांचे पथकाने केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget