
पाच दरोडेखोरांच्या टोळीस श्रीरामपूर शहर पोलीस पथकाने केले जेरबंद,63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
श्रीरामपूर प्रतिनिधी-लोणी येथून गायी विकून त्याचे पैसे सोबत घेऊन जात असलेल्या एका जणास रस्त्यात अडवून त्यास मारहाण करून त्याच्याकडून रोख रक्कम 70 हजार रुपये व मोबाईल हिसकावून घेऊन जाणार्या पाच जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीस काल श्रीरामपूर शहर पोलीस पथकाने जेरबंद केले. आरोपींकडून मोबाईल, दोन मोटारसायकल, एक चाकू व कंबरेचा बेल्ट असा एकुण 63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील बालम हसन पठाण यांनी लोणी येथील जनावरांच्या बाजारात गायी विकल्या. त्यातून मिळालेले पैसे सोबत घेऊन ते बाभळेश्वर, श्रीरामपूर, अशोकनगर मार्गे कारेगाव येथे जात असताना श्रीरामपूर-नेवासा रोडवरील ओव्हर ब्रिजच्या दक्षिणेकडील महामंडळाचे मोकळ्या शेतातून जाणारे कच्च्या रोडवरून जात असताना फिर्यादी यांच्या मागून अचानक दोन मोटारसायकल वरील इसमांनी येऊन फिर्यादी तसेच त्याच्यासोबत असलेले दोघेजण यांना अडवून आमच्या गाडीला कट का मारला असे म्हणून कंबरेच्या बेल्टने मारहाण केली व त्यांच्या अंगावर मिरची पावडर टाकून शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या खिशातील 70 हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल बळजबरीने चोरून नेला.या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. 468/2022 प्रमाणे भादंवि कलम 395,394,34 प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यासंदर्भात पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सापळा रचून संदेश नवनाथ मिरपगार (वय 22) रा. लोहगाव, प्रवरानगर ता. राहाता, आवेज फिरोज शेख (वय 21) रा. बर्तनगल्ली, म्हसोबा नगर, बाभळेश्वर, ता. राहाता, मनोज ज्ञानदेव भालेराव (वय 22), अफजल अब्दुल मुलानी (वय 25), असिफ अनिस सय्यद (वय 21), या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदर आरोपीकडून फिर्यादी यांचा बळजबरीने काढून घेतलेला विवो कंपनीचा मोबाईल, दोन मोटारसायकल, एक चाकू व कंबरेचा बेल्ट असा एकूण 63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर स्वाती भोर, व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे, पोलीस नाईक, रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल रमीज आत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, पोलीस कॉन्स्टेबल कातखडे, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुर्गुळे, पोलीस नाईक फुरकान शेख यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment