श्रीरामपूर : राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय जाहीर केला आहे.भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेड ए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षण, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असल्याने. राज्यातील ९२ नगर परिषदा व ४ नगरपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम -२०२२ जाहीर केलाय. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून. ज्यात श्रीरामपूर नगरपालिकाच्या ३४ जागेंकरिता गुरुवार दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार असून. १९ ऑगस्ट २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. अचानकपणे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या जाहीर केल्याने, इच्छूक उमेदवारांना तैयारी करिता ३८ दिवस मिळणार असल्याने, सर्वच इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तैयारीला लागले असून. प्रत्येक चौका चौकात चर्चेला उधाण आले आहे. या निवडणुकी संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने अहमदनगर सह सर्व १६ जिल्हाधिका-यांना याबाबत लेखी सूचना दिल्या आहेत.
Post a Comment