शिर्डी ( प्रतिनिधी)सर्वच न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे न्यायदानास विलंब होत आहे.अशा परिस्थितीत, लोक न्यायालयामध्ये वादपूर्व , प्रलंबित खटले निकाली काढणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळेनागरिकांचा वेळ, पैसा, श्रम या तिन्ही बाबींची बचत होत असते. न्यायालयीन खटला लढवण्यासाठी लागणारा पैसाव श्रम या दोघांचाही वापर विधायक कार्यासाठी करण्याची संधी पक्षकारांना मिळते. म्हणूनचजिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर जिल्हा न्यायालयातील दोन्हीवकील संघाच्या सहकार्याने आणि अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मागील तीन लोक अदालतमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे.त्यामुळे, अहमदनगर या ठिकाणी झालेल्या लोक अदालतीपैकी मागीलतीन लोक अदालत ह्या संस्मरणीयठरलेल्या आहेत. या यशाचे शिल्पकारहे माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर व्ही.यार्लगड्डाहे असून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, विधीज्ञ ,पक्षकार व कर्मचाऱ्यांचे ह्या यशामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा न्यायालय अहमदनगर व सर्व तालुका न्यायालयामध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लोक अदालतीमध्ये तडजोड योग्य प्रकरणे, अर्थात चोरीची प्रकरणे, किरकोळ मारहाणीची प्रकरणे, बँकेची व वित्तीयसंस्थेशी संलग्न प्रकरणे, धनादेशाचीम्हणजे चेकची प्रकरणे, यांचा समावेशहोतो. महानगरपालिका, नगरपंचायत ग्रामपंचायत यांच्याकडील मालमत्ता कर,पाणीपट्टी, घरपट्टी आणि महावितरण यांचे कडील प्रलंबित विज देयके, अशा स्वरूपाची प्रकरणे, लोक अदालतमध्ये तडजोडीने निकाली काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे.. बँकेकडील व पतसंस्थेकडील प्रकरणांमध्ये व्याजदरात सूट अथवा व्याजदरात माफी मिळून काही प्रमाणात फायदा होतो. पर्यायाने प्रलंबित व वाद पूर्व खटल्यांची संख्याकमी होऊन न्यायव्यवस्थेवरील ताण कमी होतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून दिनांक १३ ऑगस्ट २२रोजी होणाऱ्या लोक अदालत मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून फायदा
घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर यार्लगड्डा व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या नवनियुक्त सचिव
भाग्यश्री पाटील यांनी केलेले आहे.चौकशीसाठी जिल्हा विधी सेवाप्राधिकरण या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment